प्रसाद सुधीर शिर्के
Updated: 15 April 2021 07:30 IST
नागमणी एक रहस्य : अपहरणाचे रहस्य ४
नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.
नागलोकात जे काही घडले होते, ते प्रकाशच्या बुद्धीपलिकडचे होते. त्यावेळी त्याला नागतपस्वींनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या मनात इच्छा धरुन नागमणीला स्पर्श करताच, त्याच्या मनातील इच्छा नागमणीने पूर्ण केली होती. ज्यावेळी त्याने नागमणीला स्पर्श केला त्याचवेळी त्याच्या स्पर्शामुळे त्यातील दिव्य शक्ती जागृत झाली आणि त्यामुळेच प्रकाश नागलोकातून बाहेर पडू शकला होता.
जागृत नागमणीचे तेज इतके होते की, त्याने सर्वांचे डोळे दिपले होते. त्या दिव्य प्रकाशामुळे तेथील इतर नागांबरोबरच प्रकाशचेही डोळे आपोआपच मिटले गेले. ज्यावेळी त्याने आपले डोळे उघडले त्यावेळी तो पृथ्वीवर पोहोचला होता. पण पृथ्वीवर पोहोचताच त्याच्या मस्तकावरील नागमणीचे तेज आपोआपच कमी होऊन, त्यातुन प्रकाश किरणे निघणे बंद झाले. नागमणी जागृत झाल्याने प्रकाशच्या शरीरातील सर्व उर्जा नष्ट झाली होती. याचाच अर्थ, नागमणीला सक्रीय होऊन प्रकाशच्या इच्छापूर्तीसाठी, प्रकाशच्या शरीरातील उर्जेची गरज होती. जेव्हा प्रकाश पृथ्वीवर पोहोचला तेव्हा त्याला खूप थकवा जाणवू लागला. अशक्तपणामुळे त्याला भोवळ येऊ लागली त्यामुळे आपोआपच त्याचे डोळे मिटले गेले. त्यानंतर जेव्हा त्याने पुन्हा आपले नेत्र उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता.

. . .