संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : तबकड्या बहुधा पाण्यावर
danger bhut
ह्या उडत्या तबकड्या बहुधा पाण्यावरच उतरत असतात. परंतु कधीकधी त्या तबकड्या समुद्रातूनही वर येत असतात. कधीकधी ह्या तबकड्या भिंतीमाधुनही जातात. पाहणार्याच्या नजरेसमोर त्या तबकड्या आपला आकार बदलू शकतात. आपला आकार लहान मोठा करू शकतात. लंडनच्या स्टेथम इथे एका इसमाने त्या तश्या उडत्या तबकडीचा फोटो पण घेतला आहे.
हेरॉल्ड चिंबेट, हे परानोर्माल फिनोमिननचे एक मोठे संशोधक आहेत. त्यांनी एका मध्यास्थावर हिप्नोटीक्साचा प्रयोग केला. तेव्हा त्या तशास्थितीतच उडत्या तबकडीवरील पाहुण्यांशी ' भयानक ' अशी भेट झाली.
दोन उदाहरणे अशी आहेत कि, तेथे त्या उडत्या तबकडीतील पाहुण्यांशी प्रत्यक्ष भेट झालेली आहे. त्या भेटीमुळे रोगव्याधी एखाद्या चमत्काराप्रमाणे नष्ट झालेली आहे. काही वेळा त्यांनी आपले असमाधानी प्रगत केलेले आहे.जे लोक आपल्या अनुभावासंबंधीची पुस्तके लिहित नाहीत अशा लोकांशी त्या पाहुण्यांच्या भेटी झालेल्या आहेत.
न्यू गीनिमाढल्या एका मागासलेल्या भागात बयोनाय मिशनजवळ एक वाटोळी परंतु पाय नसलेली वस्तू, घरघरत करायला लागली. फादर वुईल्यम जेम्स ह्यो मिशानार्याने ती वस्तू चांगली पहिली. फादरच्या बरोबर कॉग्रीगेशनमध्ये असलेल्या आणखी छत्तीस इसामांनीसुद्धा ती वस्तू पहिली. त्या वस्तूच्या माथ्यावर काही प्राणी हालचाल करीत असलेले दिसत होते. खाली जमलेल्या छत्तीस सदतीस लोकांनी जोराचा आरडओरडा केला.आपले हात हलविले. तेव्हा त्या एका प्राण्याने उत्तरादाखल आपले हात हलवलेले सुद्धा पाहण्यात आले.
फ्लाईरा सोसर्स रिव्हू ह्या पत्रिकेत १९६६ मध्ये ह्या विषयासंबंधी एक पुस्तक प्रकाशित केलेले आहे, त्या पुस्तकाचे नाव "द ह्युमनाईड" त्यात एक असा सिद्धांत मांडलेला आहे कि ते विलक्षण प्राणी म्हणजे पाहणाऱ्यांच्या मनातले प्रोजेक्शन्स (प्रतिमा) आहेत. मग त्या उडत्या तबकड्या अंतराळामधून, कुठल्या अज्ञान अशा विश्वामधून का आलेल्या असेनात त्या विलक्षण प्राण्यांच्या आकृती, काही वेळा 'घन' दिसलेल्या आहेत तर काही वेळा त्यांच्या आक्र्त्या पारदर्शक दिसलेल्या आहेत.कधी त्यांची सर्व आकृती घन असते, परंतु त्यांचे पाय तेवढे पारदर्शक असतात. काही वेळा तर त्यांच्या आगमनाबरोबर पृथ्वीच्या त्या प्रेक्षकाला समाधी लागलेली दिसून आली.
इव्हन टी. सदरसन यांनी अशी पृच्छा केली आहे कि, लपलेल्या विश्वातून अथवा अज्ञान विश्वामधून आलेली हि केवळ प्रतिबिंबे तर नव्हते ?
१९६५ सालच्या जुलै महिन्याच्या एका तारखेला फ्रान्समधील लव्हेंडरची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला एक अंडाकृती जमिनीवर उतरत.असताना दिसली. त्या वस्तूचा मोटरकार एवढा होता. आणि त्या वस्तुला पाय दिसत होते. मासे ह्या नावाचा तो शेतकरी हळूच चोर पावलांनी त्या वस्तुजवळ गेला. आणि त्या लव्हेंडर शेतात शिरलेल्या वस्तूतल्या चोरांच्या समोर उभा राहिला. एकदा त्याला वाटले त्यांव्ह्या डोक्यावर काही नसावे. ती मनसे फार लहान होती. परंतु त्यांचे कपाळे मात्र भव्य होती. त्यांचे डोळे तिरकस भासले. त्यांचे गळ गुबगुबीत दिसले. त्या लोकांना तोंड होते. त्यंची हनुवटी चिंचोळी टोकदार होती. (अशाच वर्णनाची मनसे, ब्राझीलमधाल्या ए.व्ही. बोआस यांनी पहिली. शिवाय बेटी आणि बार्नी हील यांनी पण पाहिलेले होती.)
मासे ह्या शेतकऱ्याला त्या लोकांनी आपल्या जवळची काठी दाखवली. आणि तो शेतकरी मंतार्ल्यासारखा झाला. ते लोक क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी आपल्या वस्तूवर प्रकाश झोत टाकला.त्यांच्या त्या वस्तूचे पाय आवरले गेले. आणि ती वस्तू वीस मीटर तरंगत गेली आणि मग ती दिसेनाशी झाली.
ज्या जागेवर ती वस्तू उतरली होती, ती जागा प्रथम सुकीटाक होती. परंतु ती वस्तू निघून गेल्यावर त्या जमिनीवर एक ओलसर भोक पडलेले होते. त्या वस्तूच्या पायाच्या निशाण्या तेथे उमटलेल्या होत्या, त्या जागेजावालाची लव्हेंडरची सारी रोपटी जळून गेलेली आढळून आली आणि त्यानंतर त्या जागेवर नवीन लव्हेंडरची रोपटी कधीच उगवली नाहीत.
आयमे मायकेल यांनी ह्याबद्दलची एक वार्ता प्रसिद्ध केली आहे ती असी
१९५८ साली, आल्जिरीयाने एका फ्रेंच डॉक्टराला जखम झाल्यामुळे त्याला काहीसा पक्षाघात झालेला होता.
२ नोव्हेंबर १९६८ च्या भल्या पहाटे, त्यला त्याच्या छोट्या मुलाने जागे केले. मुलाला पाणी प्यायला हवे होते. मुलाला पाणी आणून देण्यासाठी, तो आपल्या स्वयंपाकघरात गेला. आणि स्वयंपाकघराच्या खिडकीतून घराबाहेर पडलेला प्रकाशझोत त्याला दिसून आला. तो गोंधळला. तो प्रकाश कसला आहे ते पाहण्यासाठी तो घराच्या गच्चीवर गेला. तेथे त्याला दोन उडत्या तबकड्या जवळ येत असलेल्या दिसल्या. त्याच्या डोळ्यांसमोर त्या दोन तबकड्यांची एक तबकडी झाली.आणि एक भला मोठा प्रकाश झोत त्यावर पडला गेला आणि टी.व्ही.मधले चित्र जसे नाहीसे होते तशीच तबकडी नाहीशी झाली. आपल्या बेडरूम मध्ये जाऊन, तो सारी हकीकत आपल्या पत्नीला सांगू लागला. तिला आश्चर्य वाटले. आपला पक्षाघात झालेला पती तिला चांगला धावताना आढळून आला. त्याच्या त्या अपघात झालेल्या पायाची जखम साफ बरी झालेली होती.
दुसऱ्या दिवशी त्याचा पक्षाघात कुठच्या कुठे पळून गेलेला होता. हॉस्पिटलांत राहून बड्या-बड्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही त्यांच्या तो पक्षाघात कधी बारा झालेला नव्हता. मात्र त्या दिवसांपासून, त्या डॉक्टरच्या कमरेजवळच्या भागात अधून मधून एक त्रिकोणात्मक रंग उमटलेला आढळून येऊ लागला.
-पण मग ह्या अशा विलाक्ष्ण दिसणाऱ्या, विलक्षण परिणाम कारामार्या उडत्या तबकड्या कोणत्या दूरच्या ग्रहावरून येतात कि परलोकांतून येतात ?
ह्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच देता येत नाही.
शोध दैवी शक्तींचा - In The Search of God's photo.
. . .