संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : १९२१ सालची गोष्ट
danger bhut
कर्नल सी के हॉवर्ड हिमालयावर सर करायला गेले होते . २१ हजार फुटाच्या उंचीवर त्यांना महाकाय पावलांचे ठसे आढळले .
त्यांच्यासोबत असलेले पोर्टर्स त्यांना म्हणाले " हे पावले मेंचकांगमी ची आहेत. "
त्यानंतर कर्नल ने त्या मेंचकांगमी चा भरपूर शोध घेतला . पण तो प्राणी त्यांना काही केल्या भेटला नाही .
हा मेंचकांगमी म्हणजे दुसरा कोणी नसून येटीच............ हिममानव....
अशा प्रकारे हिममानवाच्या अस्तित्वाची निशाणी प्रथमच जगासमोर आली .
या हिममानवाला हिमालयात अनेक नाव आहेत . बँग , बँगा याक्री , बन ह्वानस , ह्वोन मानस ,,,,,,, भूतान मध्ये त्याला येटी म्हणतात .
१९६६ साली भूतान सरकार ने येटी च्या स्मरणार्थ पोस्त स्टेम्प सुद्धा काढला आहे . भुतान चा तर हा राष्ट्रीय प्राणी आहे .
हिमालय तसेच रशियन कौकेशास , मंगोलिया , तिबेट , चीन , ब्रिटीश कोलंबिया , केलिफोर्निया ह्या प्रदेशात देखील याचा मागमूस आहे .
रशियन इतिहासकार प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह आणि मान्गोलीयाचे प्रो. जे . आर . रीन्चेन यांनी या येटी चा शोध घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत .
प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह यांची शिष्य प्रो.. जीन कोफ मन हिने तर काफेशस पर्वत रांगेमध्ये ह्या हिम मानवाचा आज अनेक वर्षे शोध चालू ठेवला आहे .
आज पर्यंत त्यांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत . तिथल्या काही माल्यान्मधून आणि बगिच्यान्मधून ह्या हिम मानवाने चोरलेले - पळवलेले फळफळावळ, ह्या बाईच्या पथकाला उंच उंच अशा गवतामध्ये लपवून ठेवलेले आढळून आले . त्यांच्या निष्कर्षानुसार ' हे हिममानव एकांत प्रिय असतात , आपल्याला कुणी बघू नये म्हणून अंधाराचा फायदा घेऊन ते विहार करतात .
केनडाच्या जंगलामध्येही अशा प्रकारचे पुरावे काही संशोधकाच्या हाती आलेले आहेत . केनडामध्ये त्याला sasruatch तर अमेरिकेत त्याला biefoot म्हणून ओळखतात .
गोबी वाळवंटात आणि मंगोलियात प्रो . बोरिस पोर्शेनेव्ह यांना इतिहासपूर्व काळातील जनावरांसारख्या आलमास नावाचा प्राणी पळताना आढळलेला होता . अर्धवट माणूस अर्धवट जनावर असा काहीसा तो प्राणी होता .
येटी च्या तीन जाती असाव्यात असा तर्क आहे .
१) मोठा थोरला येटी - हा प्राणी भूक लागली नसेल तेव्हा शाकाहारीच असतो .
२) दुसरा हा त्याच्यापेक्षा लहान . पण हा प्राणी हल्लेखोर प्रवृतीचा असतो .
३) रक्शीबोम्पो - हा सर्वात लहान पण खूप खट्याळ . हा शेतातील पिकांवर हल्ला करतो . माणसाची चाहूल लागल्यावर धूम ठोकतो . यालाच हिम मानव म्हणतात .
प्रत्यक्ष दर्शी असे सांगतात की हि मानव वानारासारखा आणि दोन पायाचा आहे . त्याच्या अंगावर काळ्या करड्या पिंगट - ताम्ब्रात अशा रंगाचे अगदी भरपूर केस असतात . परंतु त्याला शेपटी मात्र नाही . त्याचा चेहरा मात्र केस रहित असतो . चिंचोळे डोळे . त्याच्या जवळून जाताना त्याच्या अंगाचा घाणेरडा असा वास येतो .
ह्याच्या पावलांचे सुस्पष्ट असे फोटो एरिक शिफ्तार्ण यांनी १९५१ सालीच घेतलेले आहे .
बावीस हजार फुटाच्या उंचावर हिमालयात मेंग्लुग ग्लेसियार्मध्ये हे पावलांचे ठसे आढळून आले .. त्याचे मोजमाप केले तेव्हा ते माप १२ X ६ इंच एवढे मोठे भरले .
१९२५ साली ए. एम तोम्बासी यांनी सिक्कीम मध्ये एक येटी पहिला होता अशी नोंद आहे .
नेपाळच्या दक्षिणेला अन्नपूर्णा या हिम शिखरावर चढाई करायला गेलेल्या एका पथकाने उपप्रमुख डॉन ह्विकंस यांनी एका पाऊलवाटेचे बरेच फोटो घेतले .
प्रश्न असा होतो कि हिमालयाच्या त्या एवढ्या उंचीवर तसली पायवात आलीच कशी ??
ते स्वतः आणि दग्लन हेस्टन असे दोघे तेथे जाईपर्यंत दुसरा कुणीही तेथे गेलेला नव्हता . मग ही पाउलवाट तयार तशी कशी झाली ?
त्यांनी दुर्बीण लाऊन पाहिले तेव्हा त्यांना दोन पायांचा एक काळसर प्राणी धूम ठोकताना दिसून आला .आर्ध्या तासाने तो प्राणी त्या तिथल्या झाडीमध्ये दिसेनासा झाला होता .
या स्थानाला नेपाळमध्ये प्लेस ऑफ ग्रेट एप असे म्हणतात .
शोध दैवी शक्तींचा - In The Search of God's photo.
. . .