संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : कोकणेश्वर महादेव
danger bhut
अनेक त्रषि , मुनी , साधु संत सांगुन गेले व सिध्दही करुन गेलेँ. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते , तेव्हा धर्मासाठी जे पुरुष वेगळेपणातुन जगत असतात . असामान्य विचारातुन वावरत असतात यांच्या त्या कर्तबगारीतुन जे अवतारी पुरुष आहेत ते सिध्द होते . ते म्हणत " मानवा जन्म म्हणजे मरण नव्हे "
सहसा याचा विचार कोण करतो ? अनेकांनी ऐकविले अहो वाचनात पण पाहिले आहे . वाचले आहे , म्रुत्यु हेच अंतिम सत्य आहे . परंतु त्यांनी त्यापलिकडे जाऊन , जन्म म्हणजे मरण नव्हे हा सिध्दांत म्रुत स्वरुपात सिध्द केला आहे . आपल्या लेखणीतुन प्रत्यक्ष शिल्पाक्रुतीतून हि सिध्दता . हि निर्मिती हीच त्यांच्या "अवतारी पुरुष जन्माची खुण गाठ होय "
अशा या अवतारी पुरुषाचा जन्म कश्यप गोत्रे श्रावण मास . शुक्रवार मुळ नक्षत्र शुध्द नवमीस पहाटे साडेतीन वाजता झाला. मुळ नक्षत्री जन्म म्हणुन माता पित्याकडुन दुर्लक्षित पणा झाले. त्यांचे नाव दत्ताराम . त्यावेळी लहान पणी त्यांना दत्तु म्हणुन हाक मारत असत
तसा त्यांचा सांभाळ त्याच्या आत्यानेच केला . आत्येकडुन मिळालेल्या बोधाम्रुतातुन एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे कोकणेश्वर । जो दाता आहे त्याची भक्ति केली तर कोणी त्रास देवु शकणार नाही . ह्या मिळालेल्या उपदेशाचे रुपांतर म्हणजेच कोकणेश्वराबद्दल त्यांना वाटलेले तीव्र प्रेम
दत्तु दादांना ७ व्या वर्षी शाळेत घातले . शाळेत जात असताना वाटेतच कोकणश्वर मंदिर. जाता येता मंदिराला प्रदिक्षणा घालणे कोकणेश्वर मंदिराच्या मागुन वहाणार्या ओहोळाचे पाणी पिंडीवर अभिषेक म्हणुन घालणे हि गोडी वाढत गेली. त्यावेळी इतरांनी म्हणजे भंडारी वगैरेनी त्याची पुजा करणे अयोग्य मानीत . हा पाणी घालतो म्हणजे काय ? या विषयी भांडणे होऊ लागले. घरच्याकडे इतरांची तक्रार येऊ लागली म्हणुन त्यांची शाळा बंद केली . हा कालावधी १ ते २ वर्षाचा नंतर कार्य आले ते गुरे राखणे.
वाडीतील अन्य ७/८ जण सुध्दा गुरे राखीत . त्याच्या बरोबर गुरे राखण्याचे काम सुरु झाले. एकदा काय झाले गुरे चारावयास सोडुन दत्तु दादा कोकणेश्वर दर्शनास गेले . प्रदक्षिणा घालणे व दर्शण घेऊ येणे यात बराच वेळ गेला. तो पर्यत सर्व गुरे अन्य लोकांच्या शेतात गेली. त्यांचे शेत खाल्ले . फार मोठा वादंग झाला . चुलत काकाने मारले सुध्दा व रागाने त्यांना दुपारच्या वेळी गुरे राखीत तेथील वडाच्या पारंब्याला बांधुन ठेवले. उपाशी पोटी . त्यावेळी त्याचे वय होते अवघे १२ वर्ष. फार वाईट झाले. देवाच्या दर्शनाला जाण्याबाबत जो मार मिळाला , जी शिक्षा मिळाली , त्यामुळे ते अती व्याकुळ झाले. मनात धावा केला. पण एवढ्या दुपारचे त्या भागात कोणी जात नसत. दत्तुदादा ची खात्री होती कि माझा कोकणेश्वर मला सोडवीलच. तेवढ्यात एक म्हातार ग्रुहस्थ त्या ठिकाणी आला व दत्तु दादांना म्हणाला काय रे पोरा काय झाल ? त्यांना कोण कि व्यक्ती समझले नाही. पण कोणीतरी विचारतो त्यास काही सांगावे . त्याप्रमाणे त्यांनी घडलेली घटन सांगितली . तो म्हातारा ग्रुहस्थ म्हणतो . इतक्याच मां ! अरे मोठ्या लोकांचो रा करुंचो न्हय . कोकणेश्वरांक मेळाक थंयच जाउंचा ह्या कोणी सांगला ? तो हयं येवचो नाय ? आपुन मनापासुन बोलवुक होयो समजलां ? अशा प्रकारे समजुतीच्या गोष्टी सांगत दोरीचे बंध सोडले . हाताला वळ उठले होते. त्यावर त्यांनी फुंकरही मारली. थोड बरें वाटले. दत्तुदादानी त्यांना विचारले आज्या तुजां नाव काय ? तो म्हातारा म्हणाला मी महादेव तेली . तु भाकरी खाललयं ? असे विचारुन त्यांनी दत्तुदादाना त्यावेळी आपल्या घोंगडीतुन भाकरी काढुन दिली . ती दत्तुदादानी खाल्ली .
हि दत्तुदादा व शिवांची प्रथम भेट
आणि तो म्हातार ग्रुहस्थ म्हणजे कोकणेश्वर ( शिव शंकर ) होय.
. . .