संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : भविष्यकथानाची सिद्धी 2
danger bhut
त्या दिवशी खरोखरच तात्री साडेआठच्या सुमारास तो 'कॉल' आला. एक दिवस मी जोशीबुवांना म्हटले,"का हो जोशीबुवा, तुम्हाला हे सगळ काळात तरी कस ?"
त्यावर एकदा खळखळून जोशीबुवा म्हणाले,"त्यासाठी मी बारा वर्ष खडतर साधना केली आहे. त्यायोगे पुढे होणाऱ्या घटनांची दृश्ये मला सिनेमा पाहावा त्याप्रमाणे आगपेटीच्या आकाराएवढ्या काल्पनिक पडद्यावर स्पष्ट दिसतात. ती पाहून मी तुम्हाला भविष्य सांगतो."
"आपण साधना तरी काय केलीत?"
या प्रश्नावर मात्र जोशीबुवा नुसतेच हसले.आजतागायत त्यांनी मला त्या साधनेच पत्त लागू दिलेला नाही.
थोड्याच दिवसापूर्वी कोल्हापूर येथे असेच एक गृहस्थ भेटले. त्यांचा आणि फडक्यांचा परिचय नव्हता;
ते पुढे लिहितात " अश्या गूढ शास्त्राशी संबंधित असलेल्या लोकांची आणि माझी आपोआप गाठ पडते. माझ्या कुंडलीतच तसा योग आहे ! हे लोक एकतर माझ्या घरी चालत येतात किंवा कोणीतरी मला या लोकांकडे घेऊन जातो; पण महिन्या-दोन महिन्यांनी अशी माणसे मला हमखास भेटणार हे अगधी ठरलेले !
तू गृहस्थाचे नाव नाईक.
त्यांचा माझा कुणीतरी परिचय करून दिल्यानंतर त्यांना एकेकी तंद्री लागली आणि त्यांनी एकदम विचारले, "काय हो, तुमची कुलदेवता जोगेश्वरी आहे का ?"
"होय."मी चकित होऊन मान हलवली. आजपर्यंत अनेक ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक व चेहरा पाहून भविष्य सांगणारे मला भेटले; परंतु माझी कुलदेवता इतक्या अचूकपणे कुणीच सांगितलेली नव्हती.
त्यानंतर जोशीबुवांनी पूर्वी विचारलेलाच प्रश्नच त्यांनी पुनः विचारला. फक्त तपशील अधिक होता.
त्यांनी विचारले तुमच्या मुलाच्या पाठीवर जन्मखुणेचा पंधरा डाग आहे का?"
"होय. आहे."
"तुमची खात्री पटावी म्हणून सांगतो, तुमच्या मुलाला शंकराच्या भक्तीची विशेष आवड असणार !"
"अगदी खर आहे तुमचे म्हणण. आमच्या घरात दत्त आणि राम यांची उपासना आहे: परंतु हा एकटाच शंकराची उपासना करतो.
मध्यंतरी 'कल्याण' मासिकातले शंकराचे पाच पन्नास फोटो कापून त्याने घरभर लावले होते. तो गळ्यात 'रुद्राक्ष' देखील मोठ्या आवडीने घालतो."
"तुमचे आजोबा शिवलिंगाची 'पार्थिवपूजा' करीत होते. त्यांची ती उपासना या जन्मीही पुढे चालू आहे." त्यांनी खुलासा केला.
त्यानंतर बोलण्याच्या ओघात मी त्यांना म्हणालो, " काही दिवसांपूर्वी मी दत्ताच्या चांदीच्या खडावा तयार करून पूजेत ठेवल्या आहेत. तत्पूर्वी त्या गाणगापूरला नेऊन, तेथल्या निर्गुण पादुकांना स्पर्श करवून व त्यावर अभिषेक करून मी आणल्या आहेत."
त्यावर ते चटकन म्हणाले, " पण तुम्ही त्यांची अजून ' प्राण-प्रतिष्ठा ' केलेली नाही!"
"होय. हे अगदी खर! काही अडचणींमुळे 'प्राणप्रतिष्ठा करण्याचे राहून गेले! मी कबुली दिली.
त्या नुकतीच ओळख झालेल्या गृहस्थांनी माझ्या आयुष्यातील या घटना इतक्या अचूक कशा सांगितल्या?
मी त्या गोष्टीवर खूप विचार केला.
पुढे एकदा नाईकांनी च त्याचा खुलासा केला. ते म्हणाले, "पुज्य श्रीनृहसिंहसरस्वती हे माझे गुरु व
' श्रीगुरुचरित्र ' वाचन हि माझी उपासना. पूर्वी मला पडद्यावर चित्रपट पाहावा त्याप्रमाणे भाव घटनांची चित्रे स्पष्ट दिसायची. काही दिवसांनी ते बंद होऊन कानात संदेश येऊ लागले.
पुढे तेही बंद पडले. आत्ता व्यक्ती समोर आल्यावर एखादा विचार तीव्रतेने मनात येतो. तो विचारच मी त्या व्यक्तीला सांगतो आणि तो खरा असतो"
माझे कुलकर्णी नावाचे असेच एक स्नेही आहेत. ' नवनाथ ' आणि ' श्रीनृसिंहसरस्वती महाराजा ' हि त्यांची आराध्य दैवते.
यानाही आशाच प्रकारची थोडीफार सिद्धी आहे.
एखादा आम्ही एका ज्योतिषीबुवांच्या घारी गेलो. त्यांनी सर्वांच्या कुंडल्या पाहून काही भाकिते वर्तविल्यानंतर कुलकर्णी त्यांना विचारले, " तुमच्या घरात ताईबाई (एक देवता) चे स्थान आहे का
हो?"
ज्योतिषी बुवा चमकलेच. कारण आम्ही बसलो होतो तेथे ताई बाईंचा फोटो किंवा मूर्ती काहीच नव्हते! मग हे त्यांना कसे समजले? कुलकर्णी पुढे म्हणाले, "तीच काही करायचं राहून गेलाय ते करून टाका." ज्योतीशबुवांनी हि गोष्टही मान्य केली. कारण तिच्या काही गोष्टी करायच्या खरोखरच राहून गेल्या होत्या. परवा त्यांनी एकाला मध्येच विचारल, "तुम्ही रोज 'गीता' च वाचता का हो?" त्या गृहस्थाने ती गोष्ट लगेच काबुल केली. माझ्या मेहुणीला त्यांनी एकदा विचारल, "तुम्ही पूर्वी कधी सुवासिनींना चुडे भरले होते का?" मेहुनीने "हो" म्हटले. "त्यातले काही चुडे घरातच शिल्लक आहेत.ते भरून टाका. "हि गोष्टही तंतोतंत खरी होती. एका गृहस्थाने वर्षातून एक - दोनदा ' फिट्स ' येत असत. त्या गृहस्थाना कुलकर्णींनी विचारले, " तुमचे कधी कपडे चोरीला गेले होते का? " "होय". तो म्हणाला, "माझ्या अंडरपानटस" दोन तीन वेळा चोरीला गेल्या." " त्यांच्याच कापडांच्या वाती करून त्या जळत ठवून तुमच्यावर प्रयोग चालू आहेत. तुम्हाला याबाबत ज्यांचा संशय येतो त्यांच्या घराच्या पाठीमागे बाभळीची खूप झाड आहेत का? " " होय. आहेत. " त्या गृहस्थांनी काबुल केले.
एकदा एक व्यापारी मित्राला घेऊन मी कुलकर्णीच्या घरी गेलो . कुलकर्णींनी त्यांना विचारले ,
" तुमच्या घरी चांदीच्या भांड्याची चोरी कधी झाली होती का? "
"होय."
"मग ते पैसे बुडीत खात्यात जमा करा." कुलकर्णी म्हणाले.
आणि वस्तुस्थिती तशीच होती. ते पैसे परत येण्याची शक्यताच नव्हती. असो. मी या ठिकाणी, केवळ बरोबर ठरलेल्या गोष्टीचीच नोंद केली आहे. या व्यक्तींना भूत व भविष्यकाळातील सर्वच गोष्टी अचूक सांगता आल्या असे नाही; परंतु त्यांनी ज्या थोड्याफार गोष्टी तरी अचूक कशा काय सांगता आल्या? मी हा प्रश्न या व्यक्तींनाच विचारल. त्यांनी दिलेल्या उत्तराचा सारांश असा, कि 'या गोष्टी अशाच असाव्यात' असे आम्हाला त्या वेळी ' तीव्रतेने ' वाटले व म्हणून आम्ही तसे सांगितले व ते बरोबर आले. येथे 'तीव्रतेने वाटणे' याचाच अर्थ ' त्या विशिष्ठ स्पंदाची जाणीव होणे ' असा केला पाहिजे.
त्यांच्या ज्या गोष्टी चुकल्या त्य त्या घटनांचे विशिष्ठ स्पंद त्यांना योग्य प्रकारे ग्रहण ( receive ) करता आले नाहीत किंवा त्यांच्या नेमका अर्थ त्यांना लावता आला नाही!
" आत्ता या ठिकाणी स्पंद म्हणजे नेमके काय? ! " असा प्रश्न काही जिज्ञासू वाचक विचारतील. या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे थोडे अवघड आहे. कारण ' स्पंद ' हि काही उचलून दाखविता येण्यासारखी वस्तू नाही. ती हवेप्रमाणे अदृश्य आहे. आता एक उदाहरण देतो, म्हणजे ' स्पंदा ' ची थोडीशी कल्पना येईल. समजा एखाद्या व्यक्तीचे डोळे बांधले व त्याला एखाद्या पवित्र देवालयात आणून बसविले तर आपणास कोठे आणले आहे हे ठाऊक नसूनही देवालयातील विशिष्ठ प्रसन्न लहरींमुळे त्या व्यक्तीचे मनही प्रसन्न होईल.नंतर त्या व्यक्तीला तशाच स्थितीत एखाद्या स्मशान भूमीत आणून बसविले तर तेथिल अपवित्र, अशुद्ध लहरींमुळे त्या व्यक्तीचे मन थोड्याच वेळात औदासीन्याचे भरून जाईल. हा फरक परस्परविरोधी अशा अदृश्य लहरींमुळे घडून आला.
दुसरे एक उदाहरण देतो. काही सत्पुरुषांची समधिस्थाने 'जागृत' म्हणून प्रसिद्ध असतात.अशा ठिकाणी जाऊन उभे राहिल्यावर जणू एखाद्या शक्तीसंपन्न असा अदृश्य प्रवाह अंगावर आल्यासारखे वाटते. हे देखील स्पंद्च; परंतु ते शक्तिस्पन्द असतात. भूत व भविष्यकालीन अशा एखाद्या स्पंदाची अशीच जाणीव काही विशिथ्ह लोकांना होते. कारण हे विशीठ स्पंद ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्या तरल मानस असते. सर्व सामान्य मनुष्यालाही काही वेळा अशी जाणीव होते. नि म्हणूनच, एखाद्या आजारी मनुष्यास पाहिल्यावर त्याला उगाचच वाटते, कि " हा आता फार दिवसांचा सोबती नाही." आणि चार आठ दिवसातच त्याच्या मृत्यूची वार्ता समजते. मनुष्याची उपासना जसजशी वाढत जाईल तसतसे अदृश्य सृष्टीतील हे स्पंद त्याला स्पष्टपणे जाणवू लागतील व भूत भविष्यकालीन घटना त्याला आपोआप समजू शकतील. "
सतत रामनामाचा जप करणाऱ्या माझ्या एका स्नेह्याला याच मार्गाने भूत भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली होती; परंतु पुढे उपासना कमी झाली. कारण तो सिद्धी मुले त्याला सोडून गेली. अखंड जप, गणेश अथर्वशीर्षाची सतत पारायणे, शुद्ध सात्विक आहार, पवित्र वागणूक आणि त्याच्याच जोडीला त्राटकाचा शास्त्रशुद्ध आभ्यास यांच्या योगे हि शक्ती किंवा सिद्धी मनुष्याला प्राप्त करता येते.
श्री गणेश अथर्वशीर्ष बाबतचा माझा स्वतःचा अनुभव येथे मुद्दाम सांगण्यासारखा आहे.
मला स्वतःला ज्योतिष शास्त्राचा थोडाफार नाद आहे. धंदा म्हणून नव्हे तर छंद म्हणून मी पत्रिका पाहतो. माझा अनुभव असा आहे कि मी ज्या ज्या वेळी अथर्वशिर्षाची सहस्त्रावर्तने करतो,त्या विशिष्ट काळात,म्हणजे त्या दहा दिवसात मी सांगितलेली भविष्ये सहसा चुकत नाहीत. मी सहस्त्रावर्तने रोज शंभर याप्रमाणे दहा दिवसात संपवतो. जेवढी आवर्तने तेवढ्याच दुर्वा रोज श्री गणेशाला वाहतो. या काळात रोज वेगवेगळ्या फळांच्या रसाचा श्री गणेशाला अभिषेकही करतो. आमच्या कडे उजव्या सोंडेच्या श्रीगणेशाची एक लहानशी पितळी मूर्ती आहे. त्या मूर्तीवर हे अभिषेक होतात. या दहा दिवसात भविष्य कथनाची सिद्धी मला प्राप्त झाल्यासारखी वाटते. पुष्कळदा तर असा अनुभव येतो कि समोरच्या माणसाचा प्रश्नही मला आगोदरच समजतो.! अर्थात हा आश्चर्यकारक अनुभव दहा दिवसानंतर हळू हळू कमी होत जातो,हेही तितकेच खरे.! असे का होते?
मला आसे वाटते कि या श्री गणेश अथर्व शिर्षात बुद्धीला विशिष्ट धार निर्माण करण्याचे काहीएक विलक्षण सामर्थ्य आसवे. त्यायोगे बुद्धी अचूक निर्णय घेण्यास समर्थ होत असावी. बुद्धीप्रमाणेच वाचेलही काही एक आगळे सामर्थ्य प्राप्त होत असले पाहिजे. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी सत्य होत असल्या पाहिजेत. तसेच,पुढे होणार्या घटनांचे स्पन्दहि नकळत जाणवत असले पाहिजेत;परंतु हा परिणाम सहस्त्रावर्तने संपल्यानंतर हळू हळू कमी होतो, हे हि विसरता कामा नये. रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतर आन्हिके सांभाळून रोज शंभर आवर्तने करणे मला जमत नाही .
त्यामुळे हे स्पंद मला नेहमीच जाणवत नाहीत हेही तितकेच खरे .
क्रमशः
. . .