संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...
danger bhut
काही कुप्रथा, राजघराण्यांनी मंदिराला दिलेला उदार राजाश्रय यामुळे संपत्तीचा संचय किमान हजार वर्षांपासून होत गेला आहे.
त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपली भव्यता, स्थापत्य कला आणि ग्रॅनाईटमधील स्तंभांची दीर्घ श्रृंखला यासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर अतिशय वैभवशाली आहे. नुकतेच या मंदिराच्या तळघरातून एक टन सोने काढण्यात आले आहे. 1 लाख कोटी रुपयाची संपत्ती इतके दिवस कोणालाच माहीत नव्हती. भारताच्या प्राचीन वैभवाची साक्ष देणारे हे मंदिर आहे. मंदिराच्या तळघरातील 2 खोल्या 1880 साली उघडण्यात आले होते. तेव्हावी अशीच कुबेराची संपत्ती आढळून आली होती. आता पुन्हा एकदा हे मंदिर चर्चेत आले आहे. या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंड वर्मा यांनी केली होती. आता या मंदिराचे कामकाज राजघराण्याकडे आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिरातील तळघराच्या जिन्याने खाली ग्रेनाइटच्या खोल्यापर्यंत हे पथक गेले. श्वास घेणेही तेथे अशक्य होते. त्यामुळे आॅक्सिजनचा कृत्रिम पुरवठा करण्यात आला. उजेडाचीही व्यवस्था करण्यात आली. दार उघडल्यानंतर खोलीत जसा उजेड टाकला, तसे साºयांचेच डोळे दिपून गेले. खजिना लख्ख चमकत होता!
अडीच किलोंची सोन्याची चेन, सोन्याच्याच दो-या, हिरे आणि नीलमने भरलेले घडे, हिरेजडित आभूषणांनी भरलेली पात्रे पाहून सारेच आवाक् झाले. महागड्या रत्नांनी सजविण्यात आलेले मुकुटही तळघरातून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी आणि कालही खोलीलगत खजिन्याचा एक हिस्सा आढळला तेव्हा थक्क व्हायला झाले होते.
संपत्ती जमली कशी...?
इतिहासतज्ज्ञ सांगतात, की त्रावणकोर राजांनी कररूपाने जमविलेली, पद्मनाभ मंदिराला दान स्वरूपात आलेली आणि "काळं सोनं' मानल्या जाणाऱ्या मीरीसह मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून मिळालेला महसूल म्हणजे ही संपत्ती. अरेबियन, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून त्रावणकोर राजांना मोठी संपत्ती मिळाली.
काय आहे खजिन्यात?
सोन्याच्या विटा, सोन्या-चांदीची आभूषणे, जडजवाहीर, देवदेवतांच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती, विष्णू देवाच्या नवरत्नांतील मूर्ती, सोने, चांदी, तांबे तसेच पितळेची भांडी, नाणी आदी खजिना मंदिराच्या तळघरांमध्ये सापडला आहे. 18 फूट लांबीचा सोन्याचा साखळदंडही त्यात असल्याचे सांगितले जाते. हा सर्व खजिना इसवीसनपूर्व एक हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास थेट महाभारताशी नातं सांगतो. परिक्षीत राजाचा तक्षक नागाच्या दंशामुळे मृत्यू झाला. तो परिक्षीत या त्रावणकोरचा राजा होता. परिक्षीताच्या मृत्युनंतर या मंदिराच्या परिसरातील वनाला आग लावून अगस्तींनी नागांचा समूळ नाश केला. महाभारताच्या कालखंडाला ऐतहासिक आधार नाही. अलीकडे दहाव्या शतकात या मंदिराचा उल्लेख आढळतो. त्रावणकोरच्या राजाने मंदिराचा कारभार पाहण्यासाठी अष्ट पुजाऱ्याचं मंडळ नेमल होतं. राजा मंदिराचे अर्थिक व्यवहार पाहात असे. तेव्हाही हे मंदिर आजच्या एवढचं श्रीमंत होतं. पूजेचा मान आणि अर्थिक व्यवहारावरुन राजा आणि पूजाऱ्यामध्ये अनेक वेळा वाद झाले.
पंधराव्या शतकात राजा मार्कंडेय वर्माने मंदिराच्या सात मजली गोपूराची उभारणी केली. द्रविडी-मल्याळम स्थापत्य शैलीच्या या मंदिराला ९०३ राजांनी वेळोवेळी मोठ्या देणग्या दिल्या. पण काही कुप्रथातूनही मंदिरात संपत्ती जमा होत गेली आहे. मल्याळी स्त्रियांना शरीराच्या वरचा भाग म्हणजेच वक्ष स्थळ झाकण्याची परवानगी नव्हती. वस्त्र परिधान करणाऱ्या स्त्रियांना त्यासाठी राजाकडे कर भरावा लागतं असे. असा कर पद्मनाभ स्वामींच्या हुंडीत जमा केला जायचा. त्रावणकोरचा राजा आजही दररोज सकाळी सात ते साडेसात वाजता देवाच्या दर्शनाला येतो. कोणत्याही कारणामुळे राजा आला नाही तर राजालाही दंड म्हणून देणगीची रक्कम हुंडीत टाकावी लागायची. मल्याळी भाविकांचं हे तिर्थक्षेत्र स्थळ आहे. भाविकांनी सढळ हस्ते दिलेल्या देणग्यातून कोट्यावधीचा संचय जमा झाला आहे.
मंदिरातील तळघरांची तिथल्या अमाप संपत्तीची त्रवणकोरच्या राजघराण्यातल्या सदस्यांना माहिती होती. मंदिरातली तळघर उघडण्याचा यापूर्वीही दोन वेळा प्रयत्न झाला आहे. १९३१ साली त्रावणकोर राज्यावर दुष्काळाचं सावट आलं होत. शेतीचं उत्त्पन्न घटलं होत. त्रावणकोर दिवाळखोर झालं होतं. त्यावेळचा राजा श्री चित्र थिरुनल बलराम वर्माने एका तळघरात प्रवेश केला होता. तळघराचं कुलूप तेव्हाही उघडता आलं नव्हतं. त्यामुळे राजा दरवाजा तोडून तळघरात गेला. त्यासाठी परदेशातून मोठ्या विजेऱ्या विषारी वायू बाहेर फेकला जावा यासाठी पंखा आणण्यात आला होते. तळघरातली काही संपत्ती घेऊन राजा परत गेला. त्याआधीदेखील आठ वर्षांपूर्वी राजघराण्यातील सदस्यांनी तळघरात जाण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र तळघरातून फुत्कार टाकत साप निघाल्यामुळे सदस्य पळून गेले होते.. (सापाची हि एक फक्त दंतकथा आहे)
त्रावणकोर राजघराण्याचा वारसा -
केरळमधील त्रावणकोर राजघराण्याने या मंदिराची उभारणी केली होती. सहस्रमुखी भुजंगावर आरूढ भगवान श्रीविष्णूची मूर्ती या मंदिराचे वैभव आहे. त्रावणकोर घराण्यातील लोकांकडेच मंदिराचा विश्वस्त म्हणून ताबा आहे. आपसांतील वादांतून प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. अखेर सर्वोच्च् न्यायालयाने उच्च् न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या उपस्थितीत मंदिराची तळघरे उघडण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई सुरू झाल्यानंतर खजिना उजेडात येत आहे.
तळघराचं कुलूप पुरातन आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या कुलूपाला तीन कळ्या आहेत. त्या उघडण्याची क्लृप्ती सापडत नाही. त्यामुळे "बी" तळघराचा दरवाजा तोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तळघराच्या दरवाज्यावर नागाचं शिल्प आहे. त्रावणकोरच्या राजाला महाभारत कालखंडात नागानेच दंश केला होता. आणखी एक प्रवाद आहे. "बी" तळघराच्या दरवाजा थेट समुद्राच्या तळाशी उघडतो. तळघर उघडलं की समुद्राचं पाणी मंदिरात घुसेल हाहाकार उडेल. सध्या तरी पद्मनाभस्वामी मंदिरापासून समुद्र १० किलोमीटर अंतरावर आहे. अजुनही खजिन्याची मोजदाद चालु आहे २०११ पासून ...
(पुढे काय ते कळेल ..ते येणा-या काळात ....)
. . .