संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : मयंग : आसाम
danger bhut
तंत्र आणि मंत्र
गुवाहाटीजवळील एका लहानशा गावात पारंपरिक जादूचा अजूनही बराच प्रभाव आहे.
जादू आणि आसाम (किंवा पूर्वीच्या काळी म्हटले जायचे त्याप्रमाणे प्रगज्योतिषपूर) यांचे दृढ नाते आहे. मिर्झा नाथन, इब्न-बतुता आणि सहाबुद्दिन अशा पंडितांनी आपल्या लिखाणात प्रगज्योतिषपूर येथील तंत्र-मंत्राविषयी उल्लेख केलेला आहे. हिंदू पुराणानुसार भगवान कृष्णाने भगदत्ताचे वडील नरकासुरासोबत मायायुद्ध केले. त्याला अध्यात्मिक ताकद मिळाली होती. प्राचीन काळी आसाममधील शक्तीपीठ कामखया हे तांत्रिझमचे मुख्य केंद्र होते. तिथे बौद्ध धर्मगुरू तंत्राचा सराव करण्यासाठी येते. काळानुसार हे बौद्ध धर्मगुरू आसामच्या विविध भागांत विखुरले गेले. पण तरी त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने हजो आणि मयंग येथे राहिले.
मयंग येथील तांत्रिझमचा उदय एडी ८ ते ९ व्या शतकाच्या काळात असल्याचे दिसते. १२ व्या शतकात बौद्ध धर्मगुरूंनी त्यास आकार देण्यात योगदान दिले. त्यामुळे मयंग येथील तांत्रिझममध्ये हिंदू व बौद्ध गुप्तविद्येचे अनोखे मिश्रण दिसते. हा काळया जादूचा पाया आहे.
गुवाहाटीपासून जवळ असूनही आजच्या काळात मयंग जगापासून कोसो दूर आहे. मयंग एच. एस. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि तांत्रिझमचे अभ्यासक मंथिर सैकिया सांगतात की, मणिपूरच्या मैबाॅग राजपुत्राने येथे कचरी राज्य स्थापन केले. मयंग हे नाव राजपुत्राच्या नावावरून पडले. प्राचीन काळापासून मयंगमध्ये तांत्रिझमचा वापर केला जायचा. त्यामुळे अहोम राज्यकर्ते आणि त्यानंतर ब्रिटिश यांना कचरी राज्याला आव्हान देण्याचे धाडस झाले नाही. शत्रूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तांत्रिक वशीकरणाचा अवलंब करायचे.
मयंग येथील काळी जादू करणारे तिलक हजारिका सांगतात की, शब्दांच्या उच्चारातून जादूची ताकद निर्माण होते. प्रत्येक शब्दामध्ये विशिष्ट ताकद दडलेली असते. एखाद्याने स्तुती केली की तुम्हाला आनंद होते. एखाद्याने दोष दिला की तुम्हाला दु:ख होते. शब्द म्हणजे ब्रम्ह असते. त्यामुळे प्राचीन काळातील मंत्र मौखिक स्वरूपात होते. काळी जादू करणारी मंडळी (बेझ आणि कबीराझ) ही काळजी घ्यायचे की ते मंत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार नाहीत. त्यामुळे हे मंत्र लेखी स्वरूपात जतन करण्याची गरज भासली नाही. पण कचरी राजांनी हे मंत्र लिहून ठेवण्यासाठी जादूगारांना प्रोत्साहन दिले. आज त्यांच्याकडे मंत्रांच्या ३०० मॅन्युुस्क्रिप्ट आहेत. त्या या परिसरातील संचीपत आणि तुलिपत याविषयी आहेत.
मयंग येथे विविध प्रकारच्या मंत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी काही म्हणजे - मोहिनी बन, सर्पबिशंसख, बातीश, तेकेली बान, बाघ बोंधा, बिख बान, झोर बान, जुई निबरानी, पाश आणि काम बान मंत्र. प्रत्येक मंत्रात खास अशी शक्ती आहे. उडान मंत्र वापरून एखादी व्यक्ती हवेत उडू शकते, तर लुकी मंत्राने एखाद्याला हवेत नष्ट करून टाकता येते. बिख बान मंत्राने शत्रूला मारून टाकता येते, तर काम बान मंत्रामुळे लैंगिक क्षमता वाढवता येते. इतकेच नाही, तर पानांचे रूपांतर माश्यामध्ये करणारा मंत्रही उपलब्ध आहे.
मयंग येथील अन्य रहिवाशांप्रमाणे मंथिर सैकिया यांच्याकडे जादूविषयी अनेक आठवणींचा खजिना आहे. ते सांगतात, मी लहान होतो तेव्हा माझे वडील खास प्रकारचा भात बनवण्यासाठी तांदूळ शिजवत होते. पण तीन दिवस वाफ काढूनही तांदूळ शिजलाच जात नव्हता. माझ्या वडिलांना संशय आला की, कुुणीतरी तांदूळ शिजण्यावर बंधन घातले असणार. त्यांनी कबिराझना बोलावले आणि त्यांनी या घडल्या प्रकाराविषयी सांगितले. कबिराझने माझ्या वडिलांना कपडे उतवायची सूचना केली. माझ्या वडिलांनी त्यानुसार केले आणि त्यानंतर लागलीच तांदूळ शिजला.
प्रणब बेझबरुआ हे कबिराझ आहेत. त्यांच्याकडे जादूई ताकद असल्याचे म्हटले जाते आणि ते त्याची ताकदीचे प्रात्यक्षिक करताना दिसतात. आम्हाला आमचे हात बाजूला घ्यायला सांगितले जाते. बेझबरुआ मूठभर वाळू हातात घेतात आणि त्यावर काही मंत्र पुटपुटतात. ही वाळू आमच्या हातांवर फेकली जाते आणि ती फेकल्याबरोबर हातावर विचित्र असे टोचल्याचे, खाजल्याचे जाणवू लागते. आमच्यावर बॅरल बॅन लावला असल्याचे आम्हाला सांगितले जाते. आणखी मूठभर वाळू वेगळा मंत्र म्हणून आमच्या हातांवर टाकली जाते. ती टाकल्यावर टोचल्याचे, खाजल्याचे मात्र थांबते. सराव आणि जतन करण्याचा अभाव यामुळे मयंग येथील तंत्रविद्येचा अस्त होत आहे. ही कला अवगत असलेले अगदी मूठभर लोक उरले आहेत.
मयंग येथील रहिवासी लोकेंद्रनाथ हजारिका सांगतात की, ही पारंपरिक कला जतन करण्याचे आणि तिला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यांच्या ज्यांच्याकडे याविषयी लेखी माहिती आहे ती संकलित करत आहोत. या कलेला आधार देेईल अशा पुरातन साहित्याची जमवाजमवही आम्ही करत आहोत. रोजा मयंगमध्ये आम्हाला शिलेवर लिहिलेले आढळले. ते ३.८ मीटर लांबीचे होते. पण त्यातील अक्षरे नीट वाचता येत नाहीत.
या गावातील उत्पलनाथ गुवाहाटी विद्यापीठातून मयंगच्या पारंपरिक जादूकलेविषयी आणि औषधांविषयी पीएचडी करत आहे. मयंग गावात सन २००२ मध्ये सुरू केलेल्या म्युझिअम व रिसर्च सेंटरचा तो सचिवही आहे. या सेंटरमध्ये एकूण ४७ मॅन्युस्क्रिप्ट आहेत. नाथ याने नॅशनल म्युझिअमच्या संचालकांना पत्र लिहून विनंती केली आहे की या म्युझिअमला भेट देण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठवावे.
मॅन्युस्क्रिप्टचे जतन करण्याविषयी १५ दिवसांच्या कार्यशाळेचे नियोजन केलेले आहे. आसाम सरकारने म्युझिअमसाठी २० लाख रुपये मंजूर केले आहेत.
सध्याचे कचरी येथील राजे तरंतीकांत कोनवर सांगतात की, ही कला म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. माझे आजोबा मिना सिंग तांत्रिक होते. ते दर शनिवारी बाजूच्या जंगलात जायचे आणि भगवान शंकर आणि मा कालीची पूजा करायचे. माझ्या वडिलांना माझ्या आजोबांकडून ही विद्या शिकायची होती, पण तांत्रिझम असा दुसऱ्याला देत येत नसल्याने माझ्या आजोबांनी यास नकार दिला.
नवी पिढी मयंगच्या या प्राचीन कलेविषयी रस दाखवेल आणि या संस्कृतीचे शास्त्रीय विश्लेषण केले जाईल, अशी अपेक्षा या राजांना आहे. -
साभार लेखक अजय मिश्रा
. . .