संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : नामस्मरण
danger bhut
नामस्मरण या शब्दातील ' स्मरण ' शब्द लक्षात ठेवून नामाधाराकानी नामाबरोबरच रूपाचे स्मरण करण्यास प्रयत्न अवश्य करायला हवा. कारण असे झाले तरच नामाचे अनुभव लवकर येतील यात शंका नाही.
यासाठी एक युक्ती साधकांनी करून पहावी. ती अशी कि नामस्मरणाला बसण्यापूर्वी प्रथम आपल्या इष्टदैवताच्या मूर्तीकडे किंवा तसबिरीकडे बराच वेळ एकाग्रतेने पाहावे, नंतर डोळे मिटून ती मूर्ती डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करावा. शक्य तर जपापुर्वी मानास्पुजाही करावी. त्या योगे जप करताना इष्टदैवताची मूर्ती डोळ्यासमोर राहील. हे करताना प्रथम इष्टदैवताच्या मूर्तीच्या पायाकडे टक लावून पहावे. नंतर एकेका अवयवावरनामाचे स्मरण करीत हळूहळू दैवताच्या मुखाकडे यावे, प्रथम मूर्तीच्या डोळ्यावर, नासिकेवर दृष्टी टाकीत नंतर हास्यमुखावर आणि त्यानंतर मंदहास्यावर आणि अखेर त्या मंद हास्यातील अवर्णतीय आनंदावर वृत्तीधारणा स्थिर करीत आपणही आनादामय होऊन जावे. अशा प्रकारचा अभ्यास काही दिवस करीत राहिल्यास मनाची बाहेर भटकण्याची वृत्ती हळूहळू कमी होऊन ते अंतर्मुख होईल आणि मग नामसाधनेचे दिव्य अनुभव साधकाला आपोआप प्राप्त होतील.
म्हणून ' नामोच्चारण ' आणि ' नामस्मरण ' या दोहोतील फरक नित लक्ष्यात घेऊन साधकांनी नामोच्चारणाऐवजी ' नामस्मरण ' कसे होईल याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कारण नामोच्चारणाला संत एकनाथ चक्क ' विस्मरण ' च म्हणतात ! प्रसिद्ध संत त्यागराज स्वमींचेही असेच मत आहे. त्यांना अखंड नामसाधनेच्याद्वारे प्रभूदर्शन झाले होते. आपल्या एका पडत ते म्हणतात, कि " स्मरणाशिवाय केलेल्या नामसाधनेचा मुळीच उपयोग होत नाही. " कारण तेथे ' विस्मरण 'च आहे. स्मरण असेल तर ते भगवंताचे नसून ते इतर सांसारिक गोष्टीचे आहे. हे विस्मरण अर्थातच उपयोगाचे नाही. नामस्मरणाच्या वेळी इष्टदैवताची मूर्तीच डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. तसेच, नुसती जड मूर्ती उभी राहून चालणार नाही. ती मूर्ती चैतन्यमय असायला हवी. आणि अशी ती चैतन्यमय प्रभूची सुहास्ययुक्त मूर्ती आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीकडे पहात पहात आपला जप व्हायला हवा !
हे साधू लागले, कि एक दिवस ' नामसमाधी 'ची अवस्था साधकाला प्राप्त होईल आणि त्यावेळी त्याचा जप त्याचा केवळ मुखानेच नव्हे तर त्याच्या रोमारोमातून होऊ लागेल आणि एका विलक्षण आनंदाची दिव्य अनुभूती त्या साधकाला येईल आणि हे जसजसे अधिकाधिक साधू लागेल त्या प्रमाणात साधकदशेतून सिधावास्थेकडे साधकाचे मार्गक्रमण सुरु होईल. जे सिद्ध असतात त्यांना मुद्दाम नामरूपाचा मेळ घालावा लागत नाही. कारण त्यांचे नाम सतत चालू असते आणि रूप तर कायमच डोल्याप्य्ध्ये असते ! हि अवस्था हनुमंताला प्राप्त झाली होती. त्याच्या रोमारोमात एकाच राम भरून राहिला होता
! हि अवस्था अनेक संतानाही प्राप्त झाली होती.
महात्मा गांधी यांनी एकदा असे सांगितले होते, कि " मी व्यवहारात काहीही करीत असलो तरी रामनामाचा तंबोरा माझ्या हृदयात सतत वाजत असतो. " हि फार उच्च अवस्था आहे आणि हि अवस्था प्राप्त झाल्यामुळेच ते 'महात्मा ' बनले !
श्रीब्रम्हचैतन्यमहाराजांची अशीच गोष्ट आहे.
एकदा एक डॉक्टर त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी ' स्टेथोस्कोप ' त्यांच्या छातीला लावला आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण ' स्टेथोस्कोप 'मधून त्यांना हृदयाचे स्पंदन ऐकू येण्याऐवजी चक्क " श्रीराम जय राम जय जय राम " असा त्रयोदशाक्षरी मंत्रच ऐकू आला ! या अवस्थेलाच ' नामसमाधि ' असे नाव आहे. संत चोखामेळा यांची हि गोष्ट अशीच सांगतात. त्यांच्या कलेवरातूनही विठ्ठलनामाचा ध्वनी ऐकू येत होता ! उमडीचे महान सत्पुरुष श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांच्या अस्थीतून कितीतरी वेळ रामनामाचा ध्वनी लोकांना ऐकू आला व त्याचा उल्लेख गुरुदेव रानडे यांना पाठविलेल्या एका पत्रात शियेअंबूरावमहाराजांनी आवर्जून केला होता !
अशा प्रकारे नामोच्चारण-नामस्मरण आणि शेवटी नामसमाधि अशा या तीन महत्त्वाच्या अवस्था असून नामसाधकांनी अखेरची अवस्था प्राप्त करून घेण्यसाठी स्वताच्या प्रयत्नाबरोबर भगवत्कृपेची भगवंताची प्रार्थना करणेही तितकेच आवश्यक आहे ! त्याचप्रमाणे भगवंतावर आणि आपण जे नाम घेतो त्यावर पूर्ण श्रद्धा असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
. . .