संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : हिंदू धर्म
danger bhut
मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? महाभारत एक प्राचीन ग्रंथ
हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. काही लोकांनी या संदर्भातील काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु विस्तृत स्वरुपात या गोष्टी फारच कमी लोकांना माहिती असाव्यात. हिंदू धर्म ग्रंथातील या गोष्टी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे, परंतु वेळेच्या कमतरतेमुळे हे शक्य होत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला ग्रंथांमधील काही रोचक प्रश्नांची उत्तरे सांगत आहोत.
रश्न १ - पुराणांमध्ये वर्णीत अश्वमेध यज्ञ काय आहे?
उत्तर - धर्म ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अश्वमेध यज्ञाचे वर्णन मिळते. वाल्मिकी रामायणानुसार श्रीराम व महाभारतानुसार युधिष्ठीरने हा यज्ञ केला होता. या यज्ञाच्या अंतर्गत एक घोडा सोडला जात असे. हा घोडा ज्या ठिकाणापर्यंत जात असे, त्या ठिकाणापर्यंतची सर्व भूमी (जमीन) यज्ञ करणाऱ्या व्यक्तीची मानली जात असे. जर एखाद्या व्यक्तीने याचा विरोध केला तर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला त्यासोबत युद्ध करावे लागत होते. हा यज्ञ ग्रीष्म किंवा वसंत ऋतूमध्ये केला जाते असे आणि जवळपास एक वर्ष याच्या सुरवातीचे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी लागत होते.
प्रश्न 2 - पुष्पक विमान काय आहे?
उत्तर - पुष्पक विमानाचे सर्वप्रथम वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये मिळते. वैदिक साहित्यामध्ये देवतांच्या विमानांची चर्चा आहे, परंतु दैत्य आणि मनुष्यांनी उपयोगात आणलेले पहिले विमान पुष्पक मानले जाते. पौराणिक संदर्भामध्ये विज्ञानाचे संशोधन करणाऱ्या लोकांची मान्यता आहे, की प्राचीन भारतीय विज्ञान आधुनिक विज्ञानाच्या तुलनेत जास्त संपन्न होते. या निष्कर्षातून या विमानाचे अस्तित्व आणि प्रमाण स्वीकारले जाते. प्राचीन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेवर विश्वास ठेवणारे लोक असे मानतात , की हे विमान तत्कालीन विज्ञानातील एक सर्वश्रेष्ठ उदाहरण होते.
प्रश्न 3 - हिंदू धर्मग्रंथानुसार कोणत्या ज्योतिर्लिंगाची स्थापना चंद्रदेवाने केली आहे?
उत्तर - धर्म ग्रंथानुसार चंद्रदेवाने सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. सोमनाथ भारतामधीलच नाही तर संपूर्ण विश्वातील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्र येथे स्थित आहे. जेव्हा दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाला शाप दिला होता, तेव्हा चंद्रदेवाने या ठिकाणी तप करून शापातून मुक्ती मिळवली होती.
प्रश्न 4 - श्रीराम वनवासात गेले त्यावेळी त्याचे वय काय होते?
उत्तर - वाल्मिकी रामायणानुसार ज्यावेळी श्रीराम वनवासाला निघाले, तेव्हा त्यांचे वय २७ वर्ष होते. राजा दशरथ श्रीरामाला वनवासात पाठवण्यास तयार नव्हते, परंतु ते वचनबद्ध होते. जेव्हा श्रीरामाला थांबवण्याचा कोणताही उपाय नव्हता तेव्हा त्यांनी श्रीरामाला असेही म्हटले होते, की मला बंदी बनवून तू स्वतः राजा हो.
प्रश्न 5 - पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा जन्म कसा झाला?
उत्तर - गुरु द्रोणाचार्य महर्षी भारद्वाजचे पुरत होते. एकदा महर्षी भारद्वाज सकाळी गंगा स्नानासाठी गेले असताना, त्यांनी त्यावेळी घृताची नामक अप्सरेला नदीतून बाहेर निघताना पहिले. हे पाहून त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण झाला आणि त्याचे वीर्य स्खलित होऊ लागले. त्यानंतर त्यांनी आपले वीर्य द्रोणामध्ये संग्रहित केले. त्यामधूनच द्रोणाचार्य यांचा जन्म झाला.
प्रश्न 6 - हिंदू धर्मामध्ये कोणत्या ग्रंथाला पाचव्या वेदाचे स्थान देण्यात आले आहे?
उत्तर - हिंदू धर्मामध्ये महाभारताला पाचवा वेद म्हटले जाते. याचे रचनाकार महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास आहेत. महर्षी वेदव्यासांनी या ग्रंथासंदर्भात स्वतः सांगितले आहे की - यन्नेहास्ति न कुत्रचित् | अर्थ - ज्या विषयाची चर्चा या ग्रंथामध्ये केली गेली नसेल, त्या विषयाची चर्चा अन्यत्र (इतर कोणत्याही ठिकाणी) उपलब्ध नाही. श्रीमद्भागवतगीता यासारखे अमुल्य रत्न या महासागराची देन आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता असेही म्हटले जाते.
प्रश्न 7 - वाल्मिकी रामायणानुसार देवराज इंद्राच्या सारथीचे नाव काय आहे?
उत्तर - देवराज इंद्राच्या सारथीचे नाव मातली आहे. राम-रावणाच्या युद्धामध्ये रावण आपल्या रथामावर स्वर होऊन आणि श्रीराम जमिनीवरून युद्ध करत होते. त्यावेळी इंद्रदेवाने आपला रथ श्रीरामाच्या मदतीसाठी पाठवला होता. त्यावेळी मातलीने रथाचे संचालन कुशल पद्धतीने केले होते.
रश्न 8 - धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्णाने कोणाला सृष्टीच्या अंतापर्यंत पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप दिला होता?
उत्तर - महाभारतानुसार श्रीकृष्णाने गुरु द्रोणाचार्याचा मुलगा अश्वथामाला सृष्टीच्या अंतापर्यंत पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप दिला होता. गुरु द्रोणाचार्यांचा विवाह कृपाचार्य यांची बहिण कृपीसोबत झाला होता. कृपिच्या गर्भातून अश्वथामाचा जन्म झाला होता. त्याने जन्म घेताच अच्चै:श्रवा अश्व समान शब्दाचा उच्चार केला होता. याच कारणामुळे याचे माव अश्वथामा असे ठेवण्यात आले. तो महादेव, यम, काळ आणि क्रोध या सर्व अंशांपासून उत्पन्न झाला होता.
प्रश्न 9 - वाल्मिकी रामायणात किती श्लोक, उपखंड आणि कांड आहेत?
उत्तर - रामायण महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली आहे. या महाकाव्यात २४ हजार श्लोक, पाचशे उपखंड आणि सात कांड आहेत. परमपिता ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून महर्षी वाल्मिकींनी या ग्रंथाची रचना केली होती.
प्रश्न 10 - धर्म ग्रंथानुसार देवतांचे सेनापती कोण आहेत?
उत्तर - धर्म ग्रंथानुसार देवतांचे सेनापती भगवान शिव आणि मत पार्वतीचे पूर्ण कार्तिकेय हे आहेत. यांचे वाहन मोर आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा मोर भगवान विष्णू यांनी कार्तिकेयला दिला होता. देवासुर युद्धामध्ये कार्तिकेयने देवतांच्या सेनेचे प्रतिनिधित्व केले होते. हे प्रचंड क्रोधी स्वभावाचे आहेत.
प्रश्न 11 - ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कोणत्या देवीची पूजा केल्यानंतर नागांचे भय राहत नाही?
उत्तर - ब्रह्मवैवर्त पुराणानुसार मनसादेवीची पूजा केल्यास नागांचे भय राहत नाही, कारण ही देवी नागांचे राजा वासुकी यांची बहिण आहे. मनसादेवीचे गुरु स्वयं भगवान शिव आहेत. मनसादेवीचा पुत्र आस्तिकने जन्मेजय यज्ञ बंद केला होता. महर्षी आस्तिक यांचे नाव घेतल्यानेही सापांचे भय राहत नाही.
प्रश्न 12 - देवी सीतेची छाया द्वापार युगात कोणत्या रुपात प्रकट झाली होती?
उत्तर - ब्रह्मवैवर्त पुराणानुसार रावणाने देवी सीतेचे नाही तर त्यांचा सावलीचे हरण केले होते. याचा छाया रुपी सीतेने द्वापार युगात द्रौपदीच्या रुपात जन्म घेतला. द्रौपदी पांडवांची पत्नी होती. द्रौपदीचा जन्म अग्नी कुंडातून झाला होता. द्रौपदीच्या वडिलांचे नाव द्रुपद तर त्यांच्या भावाचे नाव धृष्टद्युम्न होते. धृष्टद्युम्नचा जन्मसुद्धा अग्नी कुंडातून झाला होता.
प्रश्न 13 - धर्म ग्रंथानुसार सूर्यदेवाच्या सारथीचे नाव काय आहे?
उत्तर - सूर्यदेवाचा रथ चालवणाऱ्या सारथीचे नाव अरुण आहे. यांच्या आईचे नाव विनिता आणि वडिलांचे महर्षी कश्यप आहे. भगवान विष्णूचे वाहन गरुड हे अरुणचे छोटे भाऊ आहेत. धर्म ग्रंथानुसार अरुण देवाला दोन आपत्य होती, जटायू आणि संपाती. जटायूने देवी सीतेचे हरण करणाऱ्या रावणासोबत युद्ध केले होते आणि संपातीने वानरांना लंकेचा मार्ग दाखवला होता.
प्रश्न 14 - रामायणानुसार दशरथ राजाने कोणत्या ऋषीद्वारे पुत्रेष्ठी यज्ञ करून घेतला होता?
उत्तर - राजा दशरथने ऋषि ऋष्यश्रृंग यांच्याद्वारे हा यज्ञ संपन्न केला होता. ऋष्यश्रृंग यांच्या वडिलांचे नाव महर्षी विभांडक असे होते. या यज्ञाच्या फळ स्वरुपात भगवान श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होता.
प्रश्न 15 - धर्म ग्रंथानुसार चंद्रदेवाला किती पत्नी आहेत?
उत्तर - धर्म ग्रंथानुसार चंद्रदेवाला २७ पत्नी आहेत. यामध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्राला विशेष प्रिय आहे. रोहिणीवर जास्त प्रेम असल्यामुळे आणि इतर पत्नीसोबत भेदभाव केल्यामुळे प्रजापती दक्ष राजाने चंद्रदेवाला क्षय रोग होण्याचा शाप दिला होता. महादेवाच्या उपासनेनंतर चंद्रदेव या शापातून मुक्त झाले होते. चंद्राच्या या २७ पत्नी वास्तविकतेमध्ये २७ नक्षत्र आहेत.
साभार :- हिंदी दैनिक ...भास्कर ..
. . .