शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : गणपती विषयी

danger bhut

‘गावपळण!’   काळभैरव

कोण्या स्वघोषित अभ्यासकाचा गणपती विषयी मत ऐकला आणि पार हादरलो , डोक्यात भयंकर तिरीप गेली, पण ह्याला संयमाने उत्तर देण्याचा प्रयास करत आहे , काही चुकल्यास जाणकारांनी सांभाळावे. गणपती , म्हणजे घन-प्राण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्टीचा घनत्व ज्या शक्तीवर आधारित आहे अशी शक्ती. हा पार्वतीचा पुत्र आहे , पार्वती म्हणजे कोण तर विश्वातील द्रव्य-शक्ती power of matter म्हणूनच तिला अन्नपूर्णा मानलं गेलंय. ह्या गणेशाचा स्थान मूलाधार चक्रात मानले जाते म्हणजे आपल्या sacrum bone मध्ये जिथे आपल्या सगळ्या नाड्या उगम पावतात तिथे मूलाधार चक्र स्थित आहे . हे जे मूलाधार चक्र आहे त्याला ४ पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्या म्हणजे आहार , विहार , आचार आणि विचार , माणसाचे हे ४ गोष्टी जितक्या शुद्ध तेव्हड्याच प्रमाणात मूलाधार चक्र शुद्ध आणि बळकट असते. मूलाधार चक्राचा संबंध आयुष्यात येणाऱ्या विघ्नांशी आहे , तो पाहूया , जर आपला आहार आपल्या प्रकृती प्रमाणे नसेल, तर आपल्या स्थूल देहात म्हणजे आपल्या मानवी शरीरात रोग-आजार ह्या रूपातील विघ्ने उत्पन्न होतील . जर आपला विहार म्हणजे आपली शरीराची हालचाल उचित नसेल तरीही शरीरात आजाराची विघ्ने उत्पन्न होतील . जर आपले आचार अर्थात आपल्याला मिळालेल्या कर्म-स्वातंत्र्याचा दुरुपयोग आपले आचरण चुकीचे ठेवले आपले कर्म चुकीचे केले तरीही आपल्या आयुष्यात (जे पेरलंय ते उगवणार ह्या तत्वानुसार) विघ्न उत्पन्न होणार . आपले विचार नीच ठेवून इतरांचे विचार दुषित केले तरीही विघ्न उत्पन्न होणार . हे विघ्न बाधू नयेत असे वाटत असेल तर लोकांनी हे विघ्न ज्याच्या अमलात आहेत त्याची उपासना करणे गरजेचे आहे . ह्या ४ पाकळ्या किंवा ह्या ४ तत्वांचा योग्य वापर शुद्ध बुद्धी असल्या शिवाय माणूस करू नाही म्हणून गणपती हि बुद्धीची देवता आहे , म्हणून त्याला बुद्धी-दाता म्हणतात . मात्र माणसाला ह्या ४ गोष्टी पाळणे त्रासदायक वाटते , ज्यांना म्हणून हे कठीण वाटत त्यांन गणपती हा "विघ्न-कारक" वाटतो . ज्यांना म्हणून सद-बुद्धी मिळून स्वतःचा चुका लक्षात येतात त्यांना गणपती "विघ्न-हारक" वाटतो . वेदान मध्ये गणपतीचा उल्लेख नसला तरीही ब्रह्मणस्पती बद्दल तर वेदान मध्ये भरभरून लिहले आहे , ठीक ठिकाणी त्याचा वर्णन आहे हा ब्रह्मणस्पती पाश अंकुश हि आयुधे घेऊन भक्तांचे रक्षण करण्यास सिद्ध आहे . आणि ब्रह्मणस्पती हे श्रीगणेशाचेच दुसरे नाम आहे . कुठलेही संत वांग्मय घ्या त्यात गणेशाच्या स्तुतीपर साहित्य सापडेलच अगदी गणेश त्यांची आराध्य देवता नसताना सुद्धा !!! संत एकनाथ महाराजांनी गणेशाला वंदन केलाय " अर्पुनिया देवा भावाचे मोदक । भावे विनायक पूजा करू । नित्य दुर्वा-दळ अरपुनी चरणी । गेले हरपुनी काया वाचा मन ।।" संत ज्ञानेश्वरांनी गणेशाचा वर्णन केलाय " ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥ अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥ हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥ " गणेशाची उपासना अथर्वशिर्षाने करताना सगळी कडे सहज आढळून येईल , थर्व म्हणजे विचारांचा गोंधळ , अथर्व म्हणजे हा विचारांचा गोंधळ नाहीसा होणे , शीर्ष म्हणजे डोकं , डोक्यात चुकीच्या विचारांचा गोंधळ शांत करण्यासाठी हे स्तोत्र अतिशय प्रभावी आहे . बरेच जन म्हणतात अथर्वशीर्षाच्या आवर्तनाने आमची विघ्ने नाहीशी होतात , हे त्यांचा विधान तथ्यहीन अजिबात नाही . जेव्हा अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा बुद्धिदाता गजानन आपले मूलाधार चक्र म्हणजे आपले आहार,विहार, आचार आणि विचार शुद्ध करतो जे आपल्या आयुष्यातील विघ्नांचा कारण आहे . अथर्वशीर्षाचा अजून एक प्रभाव म्हणजे जे लोक नियमित पणे अथर्व-शीर्षचे पठण करतात त्यांना मेंदूचे विकार होत नाहीत. मेंदूशी निगडीत आजारान मध्ये अथर्वशीर्ष नियमित पणे वाचले असता results लवकर येतात . अशी विशिष्ठ स्पंदने ह्या स्तोत्रात आहेत . गणपती हा विघ्नांचा कारक नसून विघ्नहारक आहे . तो अनार्यांचा देव होता असा काही जन म्हणतात मग तो ब्रह्मणस्पती म्हणून आर्यांच्या वेदान मध्ये कसा काय?? अगदी अफगाणिस्थान परंत गणेशाच्या मुर्त्या उत्खननात कश्या काय सापडतात? तिबेटी बौद्ध मंदिरान मध्ये कितीतरी महत्वाच्या ठिकाणी गणेशाची चित्रे आणि मुर्त्या आढळतात !! अगदी हिमालया पलीकडे जपान चीन प्रांतात सुद्धा गणेशाची उपासना आत्ता सुधा केली जाते!!! गणेशाची महती सांगणारा मी कोण ? मी कुणीही नाही पण गणेशावर फालतू टीका कुणीही करत असेल ते मी सहन करणार नाही !!! भलेही माझा गणपती सोंडेतून दुध पीत नसेल , पण मी केलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती तो आनंदाने स्वीकारतोच हि माझी श्रद्धा आहे. गणपती बाप्पा मोरया !!
. . .