संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : दत्ताची नावे
danger bhut
द्रौपदीचे वस्त्रहरण आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .
दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येकजण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देवआहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.आपल्याला याची जाणीव झाली, तर आपणप्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीवजागृत करण्याचा आपण निश्चय करूया..२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यासकरण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाचआपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हेदत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्टकरण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहेअसा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्वदिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासचआपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हेदत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’*******************************दत्ताच्या परिवाराचा भावार्थ४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गायही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनूआपणाला जे हवे, ते सर्व देते.पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत.…६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे.…७] मूर्तीविज्ञानदत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणेआहे८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊनदारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद.औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारणत्यात दत्त तत्त्व जास्त प्रमाणात असते....दत्त गुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वी प्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेचअग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूरआहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वाले पासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तू मध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्त गुरूंनी चोवीस गुरुकेले.....`श्रीपादश्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे आणि `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत....जैनपंथीय दत्त गुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. तेस्नाना साठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत....तांबुल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात,तर प्रवचनआणि कीर्तन ऐकण्या साठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.....दत्त पूजेसाठी सगुण मूर्ती ऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे...दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करावयाची असते.`श्री गुरुदेव दत्त'श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात."दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"ही नाम धून आहे... दत्तात्रेयाच्याखांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधु मक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिक ठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळी मध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीकदत्त (दत्तात्रेय) हा हिंदू धर्मातील एक देव व योगी आहे. हा अत्रिऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत...[१] हिंदू पौराणिक साहित्या नुसारदत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात....पूर्व काळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तर काळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंश रूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले...[२] दत्ताचा उल्लेख त्याचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते;माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिल मुनींची बहीण,आणि महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे बंधू, ही दत्ताचे नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत......
विशेष आभार : पंकज राऊत ..
. . .