संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : नेपाळमध्ये मोठा भूकंप
danger bhut
25 एप्रिल 2015 शनिवारी भारताच्या सीमेवरील देश नेपाळमध्ये मोठा भूकंप आला आणि एका क्षणातच काठमांडू आणि जवळपासचा परिसर उद्धवस्त झाला. या भूकंपामध्ये मोठ-मोठ्या इमारती कोसळल्या परंतु येथील प्राचीन पशुपतीनाथ मंदिराचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी जून 2013 मध्ये भारतातील केदारनाथ क्षेत्र ढगफुटी झाल्यामुळे उद्धवस्त झाले होते, परंतु येथील केदारनाथ मंदिरही सुरक्षित होते. हे दोन्ही मंदिरे महादेवाचे असून या दोन्ही नैसर्गिक संकटावर मात करून सुरक्षित उभे आहेत. अशावेळी मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की, एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटातून ही दोन मंदिरे सुरक्षित कशी राहिली? जाणून घेऊया , या चमत्कारामागे कोणकोणती कारणे असू शकतात...
वैदिक पद्धतीने करण्यात आले होते महादेव मंदिरांचे निर्माण -
प्राचीन काळी मंदिरांचे निर्माण अशा ठिकाणी जेथे जात होते, जेथे पृथ्वीचे चुंबकीय तरंग योग्य प्रमाणात असतील. तसेच मंदिराचे स्थान आणि तेथे निर्माण होणार्या निसर्गिक संकटांवर विचार केला जात होता. एखादे नैसर्गिक संकट आले तरी, त्याचा प्रभाव ज्या ठिकाणी सर्वात कमी असेल तेथे मंदिर बांधले जात होते. प्राचीन शिव मंदिरांमध्ये शिवलिंग अशा ठकाणी स्थापित केले जात होते, जेथे चुंबकीय तरंगांचे नाभिकीय क्षेत्र विद्यमान असेल. शिवलिंग स्थापनेच्या वेळी मंदिरचा गाभारा आणि शिवलिंग एकसमान रेषेत स्थापन केले जात होते. प्राचीन मान्यतेनुसार हे ज्ञान महादेवानेच दिले आहे. जे भूतत्त्व विज्ञान नावाने ओळखले जाते.
वास्तू नियमांचे काटेकोर पालन -
मंदिर बांधताना वास्तू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात होते. वास्तूशास्त्रामध्ये सर्व प्रकरचे संकट आणि दोषांपासून दूर राहण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास इमारत सर्व संकटांमधून सुरक्षित राहू शकते. वास्तुनुसार पशुपतीनाथ मंदिरात एक मीटर उंच चौमुखी शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक मुखाकृतीच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. शिवलिंगाच्या चारही मुखांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दक्षिण मुखाला अघोर, पूर्व मुखाला तत्पुरुष, उत्तर मुखाला अर्धनारीश्वर किंवा वामदेव आणि पश्चीम मुखाला साध्योजटा म्हटले जाते. या शिवलिंगाचा वरील भाग निराकार मुखाला ईशान्य म्हणतात.
केदारनाथ आणि पशुपतीनाथ संबंध -
स्कांद्पुरणात सांगितल्याप्रमाणे केदारनाथ आणि पशुपतीनाथ मंदिर एकमेकांच्या मुख आणि शेपटीशी जोडलेले आहेत. या दोन्ही मंदिरांचे बांधकाम करताना वास्तू ज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. सर्व महादेव मंदिरांमध्ये शिवलिंग जेवढे जमिनीच्या वर असते तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीच्या खाली असते. येथे विज्ञानाच्या एका सिद्धांताचा वापर केला जातो, यालाच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण केंद्र म्हटले जाते. विज्ञानाचा हा सिद्धांत वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे.
कारांगिनासुद्धा होते वास्तू आणि ज्योतिष शास्त्राचे ज्ञान -
वास्तू शास्त्राचे पुस्तक विश्वकर्मा प्रकाशमध्ये उल्लेख आहे की, घरांचे निर्माण करणार्या प्रमुख कारागिरांना वास्तू आणि ज्योतिष विद्येचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या ज्ञानाचा वापर करून ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहणार्या घरांचे निर्माण करू शकतील. केदारनाथ आणि पशुपतीनाथ मंदिरांसहित इतर मंदिरांचे बांधकाम करणारे कारागीर वास्तू आणि मुहूर्त शास्त्राचे जाणकार होते. या कारागिरांनी कलियुगापर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन या मंदिरांचे निर्माण केले.
मंत्र शक्तीचाही प्रभाव -
मंदिरांमध्ये नियमितपणे वैदिक मंत्रांचा उच्चार केला जातो. यामुळे तेथील वातावरण सशक्त सकारात्मक उर्जेने व्यापलेले असते. मंत्रांचे स्वर, आरोह, अवरोह उर्जा कायम ठेवतात. यामुळे मंदिरातील आणि जवळपासची नकारात्मक उर्जा नष्ट होते. आपण मंदिरात कितीही विचलित मन आणि नकारात्मक विचारांनी प्रवेश केला तरी मंदिरात पोहोचताच आपल्यातील संपूर्ण नकारात्मकता नष्ट होते. याचप्रकारे मंदिराच्या जवळपास विनाशकारी शक्ती काम करू शकत नाही.
नर-नारायण करायचे महादेवाची पूजा
शिवपुराणातील कोटीरुद्र संहितेनुसार बद्री वनामध्ये विष्णूचे अवतार नर-नारायण पार्थिव शिवलिंगाची नियमित पूजा करत असत. त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा जगाच्या कल्याणासाठी नर-नारायणाने महादेवाकडे याच ठिकाणी स्थापित होण्याचा वर मागितला. महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना सांगितले की, हे क्षेत्र आजपासून केदारक्षेत्र नावाने ओळखले जाईल.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ
नर-नारायणाला वचन देते वेळी महादेवाने सांगितले, की केदारनाथच्या दर्शनाबरोबर जो कोणी नर- नारायणाचे दर्शन करले तो सर्व पापांपासून मुक्त होईल. जो कोणी नर-नारायणाचे दर्शन घेईल त्याला मृत्यूनंतर शिवलोकामध्ये स्थान मिळेल. हे वरदान दिल्यानंतर ज्योतीच्या रूपात नर-नारायणाने स्थापीत केलेल्या लिंगामध्ये महादेव समाविष्ट झाले. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे पाचव्या स्थानावर आहे. ऋषीमुनींनी याठिकाणी महादेवाची उपासना करून मनासारखे वरदान प्राप्त केले आहेत
स्वयंभू शिवलिंग-
स्वत: प्रकट झाल्यामुळे या शिवलिंगाला स्वयंभू शिवलिंग म्हणून ओळखले जाते. केदारनाथचे मंदिराचे बांधकाम पांडव वंशातील राजा जन्मेजय याने सर्वात आगोदर केले आणि जिर्णोध्दार गुरू शंकराचार्य यांनी केला. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामसोबत महादेवाचे बद्रीनाथ धाम आहे. हे दोन्ही धाम पाप नष्ट करणारे आणि अक्षय पुण्य प्रदान करणारे मानले जातात.
केदारनाथ धाम हिमालायाच्या कुशीत वसलेले आहे. हिमालयात असल्यामुळे येथील वातावरण नेहमी प्रतिकुल राहते. काही काळासाठी हे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात येते. एप्रिल ते नोंव्हेबर या काळामध्ये भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात येते.
-दैनिक भास्कर
. . .