संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : भारतातील ऋषीमुनीं
danger bhut
पुराणांनुसार भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळाली होती. जवळपास सर्वच हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आढळणारे ते एकमेव ऋषी आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही नारदमुनी देवी-देवतांमध्ये संवादाचे माध्यम होते.
सदैव सतर्क राहणारे नारद हे ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन, सनत आणि सनातन या सर्वांपेक्षा लहान होते. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधून त्यांची सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत. म्हणूनच तर ते देवांना जेवढे प्रिय होते, तेवढेच ते राक्षसांमध्येही प्रिय होते. यासोबतच देव आणि दानवांमध्ये संघर्ष निर्माण करणे किंवा युद्ध भडकवणे हा त्यांचा ‘कळलावा’ गुणही प्रसिद्ध आहे. यामुळे त्यांना अनेकदा अपमानितही व्हावे लागले आहे. मात्र, समाजहित हाच एकमेव उद्देश असलेल्या नारदाने मान-अपमानाची कधीच पर्वा केली नाही. त्यांना विश्वातील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते. वैशाख कृष्ण प्रतिपदा ही नारदाची जन्मतिथी.
लोककल्याणाची काळजी:-
देशातील पहिले वृत्तपत्र ‘उद्दंड मार्तंड’च्या पहिल्या पानावर नारदांचा उल्लेख असे. सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सत्यनारायण महापूजेच्या कथेतील पहिल्या श्लोकातूनच नारदांना लोककल्याणाची किती काळजी होती, हे लक्षात येते. सत्ययुगापासून द्वापर युगापर्यंत प्रत्येक पुराणसंहितेत त्यांचे योगदान आहे. त्या काळातही ते एक सडेतोड पत्रकार म्हणून ओळखले जात. आधुनिक युगातही लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ म्हणून पत्रकारिता आपले कर्तव्य चोखपणे बजावत असून जनजागृतीचे काम करत आहे.
पांथस्थांसाठी पाणपोईचे जनक :-
उन्हाळ्यात भासणार्या पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर जनमानसात जलव्यवस्थापनाचा संदेश देतानाच नारदमुनींनीच वाटसरूंसाठी रस्त्यांवर पाणपोई उभारण्याची कल्पना सर्वप्रथम राबवली. मनू यांच्यानंतर नारदमुनी हेच ‘याज्ञवल्क्य स्मृती’ नावाने स्मृती रचून त्यात दंडविधान निश्चित करण्यासाठी ओळखले जातात. दंडाच्या भयाने तरी मानवाने गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये व सन्मार्गाचा अवलंब करावा, हाच यामागचा हेतू. या दंडविधानाच्या साहाय्याने हजारो वर्षांपासून समाजव्यवस्थेला एक शिस्त लावण्यात नारदांचे योगदान, देश चालवण्यात घटनेचे योगदान असते, तसेच आहे.
नारद संहितेचे रचनाकार :-
नारद पंचरात्री, नारद भक्तिसूत्र, नारद परिव्राजक कोश निषध, याशिवाय बृहत् नारदीय पुराणाचेही वेगळेच महत्त्व आहे. नारद संहितेचे रचनाकार असलेल्या नारदाने ज्योतिष्य विज्ञानाच्या व्यावहारिक वापराविषयी खगोलीय परिणाम विशद करून रचना स्पष्ट केल्या. ‘अणो रणिया महतो महिम्ना’ हे ज्योतिर्विज्ञानाचे पहिले सूत्र आहे. अतिसूक्ष्म परमाणूपासून अतिविशाल विष्णू या कर्त्याच्या रूपात भ्रमण करत विश्वाला प्राणवायू प्रदान केला जातो. विष्णू = विश्व + अणू या संकल्पनेची व्याख्या नारदाने अशी केली आहे. हाच ईश्वरीय कण (गॉड पार्टिकल) आहे. लाखो वर्षांपूर्वी ऋषी-मुनी आणि शास्त्रज्ञांनी तो शोधून ठेवला आहे. आधुनिक शास्त्रज्ञांना याच कणाची भीती वाटते, कारण त्यात संपूर्ण ब्रह्मांडाला अस्थिर करण्याचे, गिळंकृत करण्याचे सार्मथ्य आहे.
उत्तम वक्ता, श्रेष्ठ श्रोता :-
नारद पुराणाचे वक्ते देवर्षी नारद हेच आहेत, पण ते स्वत: श्रोताही आहेत. म्हणूनच ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांशिवाय वशिष्ठांचे प्रवचनही या पुराणात समाविष्ट करण्यात आले आहेत. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरिष आदी महान व्यक्तिमत्त्वांना भक्तिमार्गावर घेऊन जाण्याचे श्रेय नारदांनाच जाते. नारद पुराणात सर्व वेदांबाबत समान आदर व्यक्त करून त्यांची उपासना करण्यास नारदाने सांगितले आहे. नारद पुराण हे मानवाच्या सहिष्णू वृत्तीचे आदर्श उदाहरणच आहे.
नारद पुराणाचे महत्त्व :-
दोन खंडांत असलेले नारद पुराण पूर्व आणि उत्तर या नावाने ओळखले जाते. पूर्वी या पुराणात 25 हजार श्लोक होते, पण सध्या त्यात 18 हजार श्लोक आणि 2073 अध्याय आहेत. 18 पुराणांमध्ये हे सर्वर्शेष्ठ मानले जाते. तसे पाहिले तर हे पुराण भक्तिग्रंथाच्या रूपात रचले होते, मात्र याचा एवढा विस्तार झाला की अनेक व्रत-अनुष्ठान आणि माहात्म्यांच्या विवरणासह व्याकरण, ज्योतिष्य निरु क्त, छंद आदी वेदांग तसेच ग्रह-गणितावर प्रचंड साहित्य निर्माण झाले. संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करण्याचे सार्मथ्य या पुराणात आहे.
संदर्भ : एक हिंदी नियतकालिक ...
. . .