संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : भविष्यकथानाची सिद्धी 3
danger bhut
श्री गणेश अथर्व शिर्षात बुद्धीला विशिष्ट धार निर्माण करण्याचे काहीएक विलक्षण सामर्थ्य आसवे. त्यायोगे बुद्धी अचूक निर्णय घेण्यास समर्थ होत असावी. बुद्धीप्रमाणेच वाचेलही काही एक आगळे सामर्थ्य प्राप्त होत असले पाहिजे. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी सत्य होत असल्या पाहिजेत. तसेच,पुढे होणार्या घटनांचे स्पन्दहि नकळत जाणवत असले पाहिजेत;परंतु हा परिणाम सहस्त्रावर्तने संपल्यानंतर हळू हळू कमी होतो, हे हि विसरता कामा नये.
भविष्यकथन सिद्धीला उपासनेची जोड कशी आवश्यक आहे या बाबत मिरजेचे प्रसिद्ध हस्तसामुद्रिक कै. पंडित गणेश रामचंद्र घाटेशास्त्री यांचे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे.
घाटेशास्त्री हे लोकमान्य टिळकांच्या काळातले एक जबरदस्त हस्त सामुद्रिक.फलज्योतिष व हस्तसामुद्रिक या शस्त्रांचा त्यांचा व्यासंग खरोखरच जबरदस्त.! लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषनेही त्यांना स्वतःचा हात दाखवून काही प्रश्न विचारले होते व त्याची अचूक उत्तरे देऊन या घाटेशास्त्रींनी लोकमान्यानाही चकित केले होते! लोकमान्यांनी शास्त्री बुवांना एकंदर पाच माह्त्वचे प्रश्न विचारले होते ते पुढील प्रमाणे-
१. मला पुन्हा तुरुंगवास घडेल का? २. भारताला स्वराज्य मिळणार आहे का? ३. असल्यास कधी? ४.ते पाहण्यास मी जिवंत असेन का? आणि शेवटचा प्रश्न ५. मला "प्रवज्जासंन्यास" योग आहे का?
या पाचही प्रश्नांची घाटेशास्त्रींनी जी उत्तरे दिली ती पुढे कानामात्रेचा फरक न होता अचूक ठरली.
घाटेशास्त्रीं लोकमान्यांची पत्रिका आणि त्यांचा हात पाहून त्यांना म्हणाले,"महाराज,१.आपल्याला पुन्हा तुरुंगवास योग दिसत नाही २.भारत निश्चित स्वतंत्र होईल ३.तो योग आपल्या वयाच्या ९१ व्या वर्षी (म्हणजेच १९४७ साली) येईल.४. परंतु ते पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात दिसत नाही. ५."प्रवज्जासंन्यास" योग आपल्या आयुष्यात संभवत नाही.!"
हि पाचही भविष्य पुढे कानामात्रेचाही फरक न होता तंतोतंत खरी ठरली हे वाचक जाणतातच !
घाटेशास्त्री यांनी लोकमान्यान प्रमाणेच त्या काळातील इतरही नामांकित व्यक्तींना त्यांच्या भावी आयुष्यातील कितीतरी घटना आगाऊच बिनचूक सांगितल्या होत्या.त्या व्यक्तींत कै. डॉ.रा.ह.भडकमकर,श्री. शाहू मोडक इत्यादींचा समावेश आहे.डॉ. भडकमकरांचा हात पाहून घाटेशास्त्री यांनी,"अमुक एका वर्षी तुम्हाला अर्धांगाचा झटका येईल"असे भाकीत केले होते व पुढे नेमके तसेच घडून आले.!
मो.ग.रांगणेकर नाट्यसृष्टीत आतिशय मोलाची कामगिरी करतील. व्ही.शांताराम सिनेसृष्टीत आतिशय यशस्वी होतील,शाहू मोडक यांना पुण्यातील एका प्रसिद्ध चित्रपट कंपनीच्या बोल्पतत महत्वाची भूमिका मिळेल,इत्यादी त्यांची भविष्ये पुढे तंतोतंत खरी ठरली.या शिवाय इतरहि सामान्य लोकांचे असे कितीतरी अनुभव मला ठाऊक आहेत.
कै.घाटेशास्त्री ही सर्व भविष्ये इतक्या अचूकपणे कशी सांगू शकले असा प्रश्न वाचकांच्या मनात व विशेषतः ज्योतिषशास्त्राची थोडी बहुत माहिती असणाऱ्या वाचकांच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे.ज्यांना या शास्त्राचे ज्ञान आहे त्यांना एक गोष्ट नक्कीच पटेल,कि दुसर्याच्या आयुष्यातील इतक्या बारीकसारीक घटना केवळ हात किंवा पत्रिका पाहून सांगणे फारच अवघड आहे.ज्योतिषशास्त्राचा निव्वळ व्यासंग याला पुरेसा नाही,तर त्याही पलीकडे जाऊन,अज्ञाताचा पडदा बाजूला सारून भविष्यकाळात डोकावण्यासाठी काही वेगळे सामर्थ्य संपादन करून घेणे आवश्यक आहे.आता हे केवळ सामर्थ्य म्हणजे काय व ते कसे प्राप्त करून घ्यावयाचे याचा विचार करू.
घाटेशास्त्री हे काही नुसतेच हस्तसामुद्रिक नव्हते.ते प्रथम निष्ठावंत उपासक होते.आपल्या जबरदस्त उपासनेच्या द्वारेच
दुसर्याच्या भविष्यकाळात डोकावण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांनी प्राप्त करून घेतले होते.अगदी लहान वयातच,"श्रीगुरुचरित्र","सप्तशती" या ग्रंथांबाबत त्यांच्या मनात प्रेम निर्माण होऊन त्यांनी पुढे त्या ग्रंथांची अनेक पारायणे केली.त्यानंतर त्यांनी गायत्रीचीही अनेक पूरश्चरणे केली.ते तीन तीन तास औदुंबर येथील नदीच्या प्रवाहात एका पायावर उभे राहून गायत्रीचा जप करीत असत.या अचाट तपश्चर्येमुळेच त्यांना "एक्सरे साईट" प्राप्त झाली असली पाहिजे. "एक्सरे साईट" लाच मी "वेगळे सामर्थ्य" असे म्हणतो.या "साईट" मुळे कुणाचीही पत्रिका किंवा हात पाहिल्यावर त्या व्यक्तीच्या भावी आयुष्यातील घटना त्यांना एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्पष्ट दिसत असल्या पाहिजेत किंवा त्या घटनांचे स्पंद शुद्ध स्वरुपात जाणवत असले पाहिजेत किंवा आपण असे म्हणू,कि वातावरणातील स्पंद ग्रहण करण्याची क्षमता उपासनेमुळे वाढत असली पाहिजे.म्हणूनच मला असे वाटते,कि प्रत्येक ज्योतिषी हा आधी उपासक असला पाहिजे ,तरच भविष्यकाळाचा पडदा बाजूला सारून पलीकडचे पाहणे त्याला शक्य होईल.ज्यांना मर्यादित स्वरुपात या शास्त्रात यश हवे असेल अशांनी केवळ पुस्तकी ज्ञान प्राप्त करून चालण्यासारखे आहे;परंतु ज्यांना त्याही पुढे जाण्याची इच्छा आहे,तळमळ आहे,अशांनी श्रीगणेश,गायत्रीमाता किंवा अन्य देवदेवतांची निष्ठापूर्वक उपासना करणेही तितकेच आवश्यक व महत्वाचे आहे.
काही लोक तंत्रमार्गाने एखादे पिशाच्च वश करून घेऊनही भविष्यकाळातील नव्हे;परंतु वर्तमान व भूतकाळातील काही घटना अचूक सांगू शकतात.या माणसांना "कर्णपिशाच्च" वश आहे असे आपण म्हणतो.हे कर्णपिशाच्च वश करून घेण्यासाठी अनेक घाणेरड्या गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ,माणसाच्या कवटीतून अन्न खाणे,स्वतःची विष्ठा खाणे इत्यादी.
या कर्णपिशाच्चाची मुदत बारा वर्षे असते. बारा वर्षानंतर ते दुसयाच्या स्वाधीन करावे लागते या विद्येमुळे काहि काळ समाजामध्ये थोडाबहुत मानमराबत मिळतो हे खरे. चार पैसेही प्राप्त होऊ शकतात; परंतु कर्णपिशाच्च वश करुन घेणाया व्यक्तीचा शेवट सहसा चांगला होत नाही. त्यांना येणारे मरण फारच किळसवाणे असते. हा मार्गच एकंदरीत अघोरी असल्यामुळे त्या विचार न करणेच बरे !
आताभविष्यकथनासाठी याहीपेक्षा एक वेगळा; परंतु बिनधोक मार्ग आहे. तो म्हणजे दिव्यदृष्टी प्राप्त करुन घेणे. अर्थात् हा मार्ग बिनधोक असला तरी त्यात यथ मिळवण्यासाठी बरेच श्रम करणे आवश्यक आहे हे विसरता कामा नये; परंतु एकदा त्यात यश मिळाले की मग भविष्यकाळ हे गूढ राहत नाही. पुढे होणा-या घटना आधीच पाहता येतात व सृष्टीतील कित्येक अदृश्य गोष्टीही दिसू शकतात !
या संदर्भात सी. डब्ल्यू. लेडबिटर यांचे विचार माननीय आहेत. गेल्या काही वर्षात राजयोगशास्त्रात प्रवीण अशी जी थोर माणसे होऊन गेलीत, त्यात सी. डब्ल्यू. लेडबिटर यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांना स्वतः अदृश्य सृष्टीतील हालचालीँचे निरीक्षण करण्यासाठी अश्या प्रकारची दिव्यदृष्टी प्राप्त करुन घेतली होती.
श्री लेडबिटर यांनी "The other side of death" या नावाचा एक अप्रतिम ग्रंथ लिहीला असून त्यात "How clairvoyance is developed" या नावाचे एक प्रकरण आहे. त्या प्रकारचा सारांश श्री. अ. गो. कानिटकर यांनी एका पुस्तिकेत प्रसिद्ध केला आहे. त्यातील काही भाग प्रस्तुत विषयाच्या संदर्भात महत्त्वाचा वाटल्यावरुन येथे संक्षेपणाने देतो. या ठिकाणी दिव्यदृष्टीचा विचार अधिक उच्च स्तरावरुन केलेला आहे.
श्री लेडबिटर म्हणतात, "दिव्यदृष्टी नावाची शक्ती ज्याला साध्य झाली असेल त्याला अदृश्य सृष्टी प्रत्यक्ष पाहता येते." इंग्रजीत पुष्कळदा 'क्लेअरव्हॉयन्स'(Clairvoyance) हे नाव या शक्तीला दिले जाते. सृष्टीतल्या पुष्कळ गोष्टी व प्रक्रिया सामान्य माणसाला दिसत नाहीत. उदाहरणार्थ, माणसाला प्राणमय कोष, मनोमय कोष वगैरे कोष असतात; पण ते आपणाला दिसत नाहीत. मृत्युच्या वेळी जीव देहाला सोडून जातो; पण ती प्रक्रियाही लोकांना दिसत नाही. मरणोत्तर जीव कोठे जातो, काय करतो, तो पुन्हा जन्मास कसा येतो, भूलोक, स्वर्गलोक कुठे असतात, त्या लोकांत काय काय गोष्टी घडत असतात, माणसाच्या मनात विचार विकार सुरु झाले किँवा त्यांनी मंत्र म्हटले म्हणजे सभोवार काय परिणाम होतात वगैरे गोष्टी सामान्य माणसाला पाहता येत नाहीत; परंतु ज्याने ही दिव्यदृष्टी प्राप्त करुन घेतली आहे त्याला हे अदृश्य प्रकार दिसू शकतात...
"दिव्यदृष्टी प्राप्त करुन घेण्याचे अनेक मार्ग आहेत. दृश्यदेहावर बळजबरी करणे, मारुन मुटकून त्याच्या व्यवहारास काही काळ कुलूप घालणे हे अनिष्ट मार्ग होत. या मार्गाने जी दिव्यदृष्टी प्राप्त होते ती अल्पकालीन असते. जोवर देह जबरी केल्यावर मूच्छेसारख्या अवस्थेत असेल तोवरच ही दृष्टी काही लोकांना येत असते. ही अल्पकालीन दिव्यदृष्टी पुढील जन्मी अर्थातच बरोबर येऊ शकत नाही."
"उलटपक्षी, चांगल्या मार्गाने मिळविलेली दिव्यदृष्टी जिवाच्या स्वाधीन राहते व ती कायमची असते. म्हणजेच माणसाने पुढच्या जन्मी नवीन देह घेतला तरी त्या जन्मीही ती बरोबर येते."
"...या चांगल्या मार्गाचा अभ्यासक्रम जास्त कठीण असतो. त्यात नुसताच देहाला शिस्त लावण्याचा भाग नसून मन शुद्ध करुन स्वाधीन ठेवण्याचा खटाटोप करावा लागतो. अर्थात् याला काळ अधिक लागतो; पण जे मिळते ते कायमचे व निर्दोष असते."
. . .