संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha : द्रौपदीला
danger bhut
द्रौपदीला जिवंत जाळणार होते हे लोक, घेऊन गेले होते स्मशानभूमीपर्यंत
तुम्ही वाचलेले आहे की, इंद्रदेवाने ब्राह्मण रुपात कर्णाकडून कवच-कुंडल प्राप्त केले. यक्षाने पांडवांची परीक्षा घेतली. यामध्ये भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवाचा मृत्यू झाला, त्यानंतर युधिष्ठिरने यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या भावंडांना पुनर्जीवित केले. पांडवानी अज्ञातवासादरम्यान विराटनगरामध्ये वेश बदलून राहण्याचा निर्णय घेतात. विराटनगरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पांडवानी आपले शस्त्र शमी झाडावर लपवून विराटनगरमध्ये प्रवेश केला.
विराटनगरमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले युधिष्ठिर वेश बदलून विराट राजाचा दरबारात गेला. परिचय विचारल्यानंतर युधिष्टिरने, मी एक ब्राह्मण असून माझे नाव कंक आहे असे सांगितले. माझ्याजवळचे सर्वकाही लुटले गेले आहे, त्यामुळे तुमच्या राज्यात उपजीविकेसाठी आलो आहे. द्यूत खेळामध्ये पासे फेकण्याचे विशेष ज्ञान मला आहे, असे युधिष्ठिरने विराट राजाला सांगितले. युधिष्ठिरचे म्हणणे ऐकून विराट राजाने युधिष्ठिरचा मित्र म्हणून स्वीकार केला आणि राजकोष आणि सैन्याची जबाबदारी दिली.
त्यानंतर भीम विराट राजाच्या दरबारात आला. त्याच्या हातामध्ये चमचा, कडची, एक लोखंडी सुरा होता. स्वतःचा परिचय देताना भीमाने, मी स्वयंपाकी (आचारी) आहे असे सांगितले. भीमाने त्यांचे नाव बल्लव असे सांगितले. विराट राजाने भीमाला भोजनशाळेच्या प्रधान अधिकारपदी नियुक्त केले. अशाप्रकारे युधिष्ठिर आणि भीम विराटनगरमध्ये राहू लागले. त्यानंतर द्रौपदी सैरंध्रीच्या वेशात दुःखी बनून नगरात फिरू लागली. तेवढ्यात विराट राजाची पत्नी सुदेष्णाची दृष्टी राजवाड्याच्या खिडकीतून तिच्यावर पडली. राणी सुदेष्णाने द्रौपदीला बोलावून घेतले आणि तिला परिचय विचारला. द्रौपदीने, मी काम करणारी दासी असून मला केसांची सुंदर वेणी घालता येते असे सांगितले. त्यानंतर राणी सुदेष्णाने द्रौपदीला दासी म्हणून ठेवून घेतले.
थोड्या वेळानंतर सहदेव गवळी रुपात विराट राजासमोर आला. राजाने सहदेवाला परिचय विचारला. तेव्हा सहदेवाने, मी तंतीपाल नावाचा गवळी असल्याचे सांगितले तसेच चाळीस मैलाच्या आत जेवढ्या गाई राहतात त्यांच्या भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील संख्या मला माहिती आहे असे सांगितेल. कोणत्या उपायांमुळे गाईंची संख्या वाढते आणि त्यांना कोणताही रोग होणार नाही याची मला माहिती आहे. सहदेवाची योग्यता पाहून विराट राजाने त्याला गाईंच्या देखरेखीसाठी नियुक्त केले.
काही काळानंतर अर्जुन बृहन्नाला (नपुंसक) रुपात विराट राजाच्या दरबारात आला आणि सांगिलते की, मी नृत्य आणि संगीत कलेमध्ये निपुण आहे. तुम्ही मला राजकुमारी उत्तराला या कलेचे शिक्षण देण्यासाठी ठेवून घ्या, अशी विनंती अर्जुनाने केली. राजा विराटने अर्जुनालाही नियुक्त केले.
त्यानंतर नकुल अश्वपालाचा वेश घेऊन विराट राजाच्या दरबारात आला आणि स्वतःचे नाव ग्रंथिक असे सांगितले. विराट राजाने घोडे सांभाळण्याची जबाबदारी नकुलाकडे सोपवली. अशा प्रकारे पाचही पांडव विराटनगरमध्ये राहू लागले.
पांडव विराटनगरमध्ये राहतान तीन महिने पूर्ण झाल्यानंतर चौथ्या महिन्यात मत्स्यदेशात ब्रह्ममहोत्सव आयोजित करण्यात आला होता. या मोहत्सवात हजारो पेहलवान सहभागी झाले होते. त्यामधील एका पेहलवानाचे नाव जीमूत होते. त्याचे बलाढ्य शरीर पाहून एकही पेहलवान आखाड्यात उतरण्यास तयार नव्हता. हे पाहून राजा विराटने आपला स्वयंपाकी बल्लव (भीम)ला त्याच्यासोबत लढण्याची आज्ञा दिली. राजाचा आज्ञेवर भीम आखाड्यात उतरला. त्यानंतर भीम आणि जीमूत या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये भीमाने जीमूत पेहलवानाचा वध करून विजय प्राप्त केला. हे पाहून विराट राजा खूप प्रसन्न झाला आणि त्याने भीमाची भरपूर प्रशंसा केली.
पांडवाना विराटनगरमध्ये राहताना दहा महिने उलटून गेले. एके दिवशी विराट राजाचा सेनापती कीचक, जो त्यांचा मेव्हणासुद्धा होता. त्याची दृष्टी राणी सुदेष्णाची सेवा करणार्या सैरंध्री (द्रौपदी)वर पडली. द्रौपदीचे रूप पाहून कीचक तिच्यावर मोहित झाला. कीचकने द्रौपदीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, परंतु द्रौपदीने नकार दिला. द्रौपदीने सांगितले की, पाच गंधर्व माझे पती आहेत, ते खूप शूरवीर असून नेहमी माझी रक्षा करतात. त्यामुळे तू माझा विचार सोडून दे, नाही तर माझे पती तुझा वध करतील.
द्रौपदीचे हे वाक्य ऐकल्यानंतर कीचक आपली बहिण राणी सुदेष्णाकडे गेला आणि तिला याबद्दलची माहिती दिली. कीचकचे म्हणणे ऐकल्यानंतर राणी सुदेष्णने सांगतले की, मी सैरंध्री (द्रौपदी)ला तुझ्याकडे पाठवते. तू तिला गोड बोलून प्रसन्न करून घे.
या घटनेच्या काही दिवसानंतर राणी सुदेष्णने द्रौपदीला कीचकच्या घरून पिण्यासाठी योग्य रस घेऊन ये अशी आज्ञा केली. द्रौपदीने सुरवातीला नकार दिला परंतु राणीने तिला राजआज्ञेचे पालन करण्यास भाग पाडले. मनातल्या मनात द्रौपदीने सूर्यदेवाचे स्मरण केले. सूर्यदेवाने द्रौपदीच्या रक्षणासाठी गुप्त रुपात एक राक्षस पाठवला.
द्रौपदी घाबरलेल्या स्थितीमध्ये सेनापती कीचकच्या महालात दाखल झाली. कीचकने द्रौपदीला एकटे पाहून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्यदेवाने पाठवलेल्या गुप्त राक्षसाने त्याला दूर फेकून दिले. तेवढ्यात दौपदी तेथून निघून सरळ विराट राजाच्या दरबारात गेली आणि सर्व घटना सांगितली. त्यावेळी दरबारात युधिष्ठिर आणि भीम उपस्थित होते. भीम त्याचवेळी कीचकचा वध करण्यासाठी निघाला, परंतु युधिष्ठिरने त्याला अडवेल. युधिष्ठिरच्या सांगण्यावरून द्रौपदी राणी सुदेष्णच्या महालात परत गेली. द्रौपदीने राणी सुदेष्णला संपूर्ण घटनेची माहिती दिली.
त्याच रात्री द्रौपदी भीमजवळ गेली आणि कीचकचा वध करण्यास सांगितले. भीम ने द्रौपदीला सांगितले की, राजा विराटने जी नृत्यशाळा तयार केली आहे त्याठिकाणी तू कीचकला गोड बोलून बोलावून घे.
दुसर्या दिवशी द्रौपदीने कीचकला रात्री नृत्यशाळेत येण्यास सांगितले. रात्री कीचक येण्यापुर्वीच भीम नृत्यशाळेत ठेवलेल्या पलंगावर जाऊन बसला. थोड्यावेळाने कीचक तेथे आला. त्यावेळी नृत्यशाळेत आधार होता. कीचकला वाटले की पलंगावर सैरंध्री झोपली आहे. कीचक पलंगाजवळ पोहचताच भीम उठून उभा राहिला. त्यानंतर भीम आणि कीचकमध्ये भयंकर युद्ध झाले आणि त्या युद्धात भीमाने कीचकचा वध केला. हे पाहून द्रौपदी प्रसन्न झाली आणि नृत्यशाळेच्या पहारेकर्यांना तिने सांगिलते की, पाहा त्याठिकाणी कीचकचे शव पडले असून माझ्या गंधर्व पतींनी त्याचा वध केला आहे.
जेव्हा ही गोष्ट कीचकच्या भावांना समजली, तेव्हा त्यांनी द्रौपदीला भावाच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आणि कीचकच्या शवासोबत द्रौपदीला जिवंत जाळण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेले. त्याठिकाणी भीमाने सर्वांचा वध करून द्रौपदीला त्यांच्या बंधनातून मुक्त केले.
राजा विराटला जेव्हा कीचकचा सर्व भावांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली, तेव्हा तो खूप घाबरला. राणी सुदेष्णला विराट राजा म्हणाला, की आता सैरंध्रीचे याठिकाणी थांबणे योग्य नाही. सैरंध्रीचे पती क्रोधीत होऊन आपल्याला देखील नष्ट करतील.
जेव्हा द्रौपदी पुन्हा महालात आली, तेव्हा राणी सुदेष्णने तुला दुसर्या नगरात जाण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर द्रौपदीने फक्त १३ दिवस मी तुमच्यासोबत निवास करेल त्यानंतर माझे गंधर्व पती मला घेऊन जातील असे राणीला सांगितले.
. . .