passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : कसारा घाट : मुंबई नाशिक हायवे
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
मुंबई नाशिक हायवेचा कसारा घाट भयानक आहे कारण इथे भूत दिसण्याचे आणि भूत असण्याची जाणीव होण्याचे बरेच किस्से आहेत. कधी कुणाला मान नसलेली वृध्द महिला दिसते तर कुणाला झाडावर बसलेला वृध्द पुरुष, रस्त्याच्या दोनही बाजूला घनदाट झाडी असल्या कारणाने रात्रीच्या वेळी हा रस्ता जास्तच भीतीदायक वाटतो.
. . .