passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : स्टेट हायवे – ४९
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
हा दोन लाईनचा हायवे आहे ज्याला इस्ट कोस्ट रोड या नावानेही ओळखला जातो. जो पश्चिम बंगालला तमिळशी जोडतो. चेन्नई ते पोन्डिचेरी मधला हा रस्ता भूतामुळे खूप भीतीदायक झाला आहे खासकरून रात्रीचा. ड्रायवरने सांगितलं रात्रीच्यावेळी एक सफेद साडी घातलेली बाई दिसते ज्यामुळे त्याचं लक्ष दुसरीकडे जाऊन अपघात होतो. आणखी एक गोष्ट ती बाई दिसल्यानंतर ड्रायवरच्या लक्षात आलं कि तापमान अचानक कमी व्हायला लागलं आहे आणि रोड आखुड होत आहे. काही जण असही सांगतात की ती सफेद साडी नेसलेली बाई दिसली की काही जणांच्या मणक्याच्या हाडाखाली अचानक कंपने सुरु होतात.
. . .