भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : रांची जमशेदपूर NH-33

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

दिल्ली कंटोनमेंट रोड   मार्वे – मड- आयलेंड रोड


हा देशाचा एकमेव असा हायवे आहे, जिथे अपघात स्वाभाविकपणे कमी आणि अस्वाभाविकपणे जास्त होतात. सरळ भाषेत सांगायचं तर या मार्गावर भूतांमुळे जास्त अपघात होतात. या मार्गावरून जाताना लोक यासाठीही घाबरतात कारण या मार्गाच्या दोनही कोपऱ्यांवर मंदिर  आहे. असं म्हणतात की मंदिरात पूजा केल्याशिवाय पुढे जाणाऱ्या लोकांना ही भूत त्रास देतात, ज्यामुळे अपघात होतात. या मार्गावरून जाणारे बहुतांश ड्रायवर सफेद साडी नेसलेली बाई बघितल्याच सांगतात.

. . .