passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
सर्वसामान्य अंधश्रद्धा : शुक्रवार १३ तारीख - अपशकून
अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...
आपण थोडे घाबरतो जेव्हा आपण कॅलेंडर वर पाहतो की १३ तारीख शुक्रवारी आली आहे. १३ आकड्याची भीती ही सर्वात सामान्य अंधश्रद्धा आहे आणि ती एवढी प्रचलित आहे की कित्येक इमारती आणि हॉटेलमध्ये १३ माजले आणि कित्येक विमानांत १३ रांगा नसतात. या अंधश्रद्धेच्या उगमाची सर्वात प्रचलित अशी कथा आहे की जूडस लास्ट सपर वर १३ वा पाहुणा होता आणि येशूला शुक्रवारी सुळावर चढवण्यात आलं.
. . .