सर्वसामान्य अंधश्रद्धा : जिन्या खालून जाणे - अपशकून
अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...
आरसा फुटणे - दुर्भाग्याचे लक्षण तळहाताला खाज उठणे - चांगलं नशीब
ही सामान्य गोष्ट आहे की आपल्या डोक्यात काही पडू नये म्हणून आपण एखाद्या उघड्या जीन्याखालून जात नाही, परंतु असं करण्याची काही अन्य कारणेही आहेत. एक त्रिकोण (जिन्याचा आकार) काही लोकांसाठी जीवनाचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही या त्रिकोणाच्या खालून जाता तेव्हा तुम्ही आपल्या नशिबाला आव्हान देत असता. तुम्ही त्या त्रिकोणात राहणाऱ्या वाईट अत्म्यानाही जागे करत असता जे कदाचित तुमच्या अशा वागण्याने त्रस्त होऊ शकतात. जर तुम्ही चुकून अशा एखाद्या जिन्याच्या खालून गेलात तर त्या अपशकुनापासून वाचण्यासाठी आपला अंगठा तर्जनी आणि मधलं बोट यामध्ये दाबून धरा. दुसरा मार्ग म्हणजे दोन्ही हाताची बोटं वाकवून पलीकडच्या निशाणाला वाईटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करा.