सर्वसामान्य अंधश्रद्धा : लाकडावर दोन वेळा खटखट करणे - वाईट योग परतवून टाकणे
अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...
सांडलेलं मीठ पाठीवर फेकणे - शुभ शकून छत्री आतल्या बाजूला उघडणे - अपशकून
या सर्वात जास्त प्रचलित अंधश्रद्धेचं एक मूळ त्या काळापासून आहे जेव्हा काही संस्कृतीत असं मानलं जायचं की देव झाडात वास करतो. जेव्हा कधी कोणाला देवाच्या मदतीची गरज भासत असे, तो हलक्या हाताने झाडाच्या सालीला स्पर्श करत असे. आणि एकदा का त्याची मनोकामना पूर्ण झाली की पुन्हा तो हलक्या हाताने झाडावर खटखट करून देवाचे आभार मानत असे. या प्रथेची सुरुवात ख्रिश्चन लोकांपासूनही झालेली असू शकते जे असं करून येशू मशीहाला चांगल्या भाग्यासाठी धन्यवाद देत असत. येशू मशीहाचा मृत्यू लाकडाच्या फळीवर झाला होता.