सर्वसामान्य अंधश्रद्धा
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

सर्वसामान्य अंधश्रद्धा : काळ्या मांजराने रस्त्यात आडवं जाणं

अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...

" गॉड ब्लेस यू " म्हणणे - एक चांगली सवय   सांडलेलं मीठ पाठीवर फेकणे - शुभ शकून



मध्य कालीन समाजात असं मानलं जायचं की काळ्या रंगाचं मांजर हे चेटकिणीचं साथीदार असतं. काही लोक तर असंही मानायचे की  ७ वर्षांनी अनेक मांजरांचं रुपांतर चेटकीण आणि राक्षसांमध्ये होतं. त्यामुळेच जर काळ्या रंगाचं मांजर आडवं गेलं तर तो एक अपशकून मानला जायचा आणि असं म्हटलं जायचं की त्या रस्त्यावरून जाऊ नये. हिटलर आणि नपोलियन सारखे महा शक्तिवान पुरुष देखील काळ्या मांजराच्या प्रकोपाला घाबरत असत.

. . .