passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भुते आणि अयुर्वेद : भूत ग्रह
या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....
या सूक्ष्म जीवांपेक्षाही आणखी एक जीववर्ग मानवावर आक्रमण करून रोग निर्माण करतो. त्याला भूत, ग्रह असे म्हणतात.
हे अतिसूक्ष्म असतात. हे आपल्या भोवती पृथ्वीवर, आकाशात सर्व दिशांना, घरात संचार करतात. हे असंख्य आहेत, गणना संख्येत सागंण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संख्या आली पद्म, म्हणजे एकावर तेरा शून्ये, त्याला कोटी हजार आणि दहा हजारांनी गुणावे, येणाऱ्या संख्येइतके ‘कोटीसहस्त्रायुतपद्मसंख्या’.आपल्या भोवती आहेत. ते रात्री आधिक्याने संचार करतात म्हणून त्यांना निशाचर म्हणतात, त्यांना मांस आवडते म्हणून पिशाच्च, रक्तमांस आवडते त्यांना राक्षस इ. नावे आहेत.
. . .