भारतातील भुताटकीची ठिकाणे : भानगड चा किल्ला
तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात
भानगड चा किल्ला भारतातील सर्वात भीतीदायक जागा मानला जातो. लोकांचे म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी इथे भुते खेते येतात आणि शिस्तीत आपली सभा भरवतात. लोकांच्या सांगण्याप्रमाणे १६ व्या शतकात याच शहरात राहणाऱ्या सिंघिया नावाच्या जादूगाराचे भानगड ची राजकुमारी रत्नावती हिच्यावर प्रेम जडले.
काही कारणाने जादुगाराचा मृत्यू झाला. जादुगाराने मरताना किल्ल्याला शाप दिला की लवकरच किल्ला भ्रष्ट नष्ट होऊन जाईल आणि त्याच्या जवळपास देखील कोणी राहणार नाही. त्यानंतर काही दिवसांतच भानगड मध्ये अनेक आपत्ती आल्या आणि पूर्ण किल्ला खंडर मध्ये परावर्तीत झाला. लोकांचे म्हणणे आहे की जे हजारो लोक इथे मरण पावले, ते रात्री भुतांच्या रूपाने किल्ल्यात भ्रमण करतात.
किल्ल्यात रात्रीच्या वेळी गेल्यामुळे कित्येकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. लोक सांगतात की कोणीही व्यक्ती, जी रात्रीच्या वेळी किल्ल्यात प्रवेश करते, पुन्हा बाहेर येत नाही. त्यामुळे भारतीय पुरातत्व खात्याने बोर्ड देखील लावून ठेवला आहे की संध्याकाळ नंतर आणि सकाळ होण्यापूर्वी या जागेत प्रवेश निषिद्ध आहे.