भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : पोस्ट ऑफिस मधील पैसे

भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.

आर बी आय ची फसवणूक   सुरेश राम आणि राम गणेशन


हि गोष्ट ७० च्या दशकात घडली आहे. या घोटाळ्याला समजण्यासाठी आपल्याला मनी ओर्डर प्रणालीमध्ये कस काम करतात हे जाणून घेण गरजेच आहे. पोस्ट ऑफिसला पहिलं मनी ऑर्डर फोर्म आणि पैसे मिळतात. ते मग त्याला तिकीट  लाऊन सामान्य टपालान प्रमाणे त्याला वाटतात. काही वेळेला पोस्टातील लोक याची चौकशी करतात. घोटाळा करणारा पोस्टातील रेल्वे विभागात कार्यरत होता. तो ट्रेनमध्ये पत्रांसोबत जायचा आणि तिथेच त्यांना वेगळ्या श्रेणीत वाटायचा. तो फक्त मनिऑर्डर फॉर्म भरायचा आणि नाव आणि पत्ता कुठल्यातरी लॉजचा द्यायचा दुसऱ्या दिवशी तो त्या नावाने त्या लॉजवर रहायचा आणि पैसे वसूल करायचा. त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकार्यांना त्याचा संशय आल्यावर त्याला पकडल गेलं.

. . .