भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : मोहन सिंह
भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.
मोहन सिंहवर तर स्पेशल २६ नावाची फिल्म बनली होती. मोहनने तर द टाईम्स ऑफ इंडिया मध्ये एक बातमी दिली होती त्यात त्याने खुफिया कामांसाठी बुद्धिमान लोकांची मागणी केली होती. या कामाच्या मुलाखतीसाठी जे लोक आले होते त्यांना १० ते ५ दरम्यान ताज इंटरकॉनटीनेनटल मध्ये यायला सांगितलं गेल होत. शेवटी २६ जणांना निवडलं गेलं ज्यातील काही लोक हे सरकारी कार्यालयात कार्यरत होते. दुसऱ्या दिवशी या २६ लोकांना सकाळी ११ वाजता बोलवलं गेल जिथे मोहनने त्यांना नकली ओळखपत्र दिल. एका तासानंतर ते लोक नकली धाड टाकायला ओपेरा हाउस मध्ये गेले जिथे शहरातली सर्वात जास्त सोन्याची दुकाने आहेत. त्यानंतर मोहन सगळ्या जागेवरुन सोने गोळा करू लागला. त्या सोन्याला सरकारी सील लगलेल्या ब्यागेत भरू लागला. मोहन त्याच्या साथीदारांना म्हणाला तुम्ही इथेच थांबा मी दुसर दुकान बघून येतो, नंतर तो हॉटेलमध्ये गेला स्वतःच सामान उचललं आणि गायब झाला. त्याने कोणतीही खुण सोडली नाही. मोहन सिंह अजूनही पकडला गेला नाही.