भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : सार्थक बाबरस
भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.
एका दशकापर्यंत सार्थक बाबरस याने असं आयुष्य जगल की ज्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो, तेसुद्धा एकही पैसा खर्च न करता. त्याची पद्धत खुप सोपी होती. बाबरसला हॉटेल मधल्या कर्मचार्यांना मूर्ख बनवण्यासाठी फक्त एक फोन कॉल आणि चोरी केलेल्या पेनकार्डची गरज लागायची. तो त्याने निवडलेल्या हॉटेल मध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या नातेवाईकाच्या नावाने फोन करायचा आणि त्या अधिकाऱ्याच्या नावे बुकिंग करायचा आणि सांगायचा ते शहरात नसल्याने पैसे चेक इन नंतर देतील. दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये जाऊन नकली प्यानकार्ड दाखवायचा. सगळा खर्च त्या अधिकाऱ्याच्या नावावर जायचा. बुकिंग नेहमी ३ दिवसानसाठीच केली जायची. त्या दिवसांमध्ये तो बायकांशी मैत्री करून त्यांना आपल्या रुम मध्येही बोलवायचा आणि दोन दिवस झाल्यावर तो तिथून गुपचूप निघून जायचा आणि या बाबतीत कुणालाही कळायचे नाही.