भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : केतन पारीख
भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.
१ मार्च २००१ला सेंसक्स मध्ये १७६ अंशानी घसरला. हा भारत सरकारसाठी खूप मोठा धक्का होता. या एकदम आलेल्या घासरणीमुळे चौकशीचे आदेश आले. सीबीआय ने काही ब्रोकरांच्या चौकशीचे आदेश काढले. या घोटाळ्यात सर्व गुंतवणूक दारांच्या आत्मविश्वासाला हादरा बसला. मार्च २००८च्या शेवटी ८ लोकांनी हताश होऊन आत्महत्या केली होती, आणि काही गुंतवणूकदार कंगाल झाले होते. या घोटाळ्यात सर्वात पहिली अटक झाली होती केतन पारीख याला ३० मार्च २००१ला. लवकरच माहिती मिळू लागली की कसं केतन पारीख याने एकट्यानेच भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याला आमलात आणल होत. त्याने बँक ऑफ इंडियाच ३० लाख डॉलरच नुकसान केलं होत. केतन पारीखच्या अटकेनंतर सेंसक्स पुन्हा १४७ अंशानी घसरला.