अदभूत सत्ये - भाग २ : एक व्यक्ती जिने आयफेल टॉवर ची विक्री केली
चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत
विक्टर लुस्तिग ने फ्रांस आणि न्यू यॉर्क च्या दरम्यान चालणाऱ्या जहाजांवर धान्दलेबाजी करत आपली एक वेगळी ओळख तयार केली. लुस्तिग ने बनावट सरकारी कागद पत्र तयार केले आणि भंगार मालाचा व्यापार करणाऱ्या ६ धातू विक्रेत्यांना एका अत्यंत प्रतिष्ठित अशा हॉटेल मध्ये बोलावले. तिथे लुस्तिग ने स्वतः ची ओळख पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाचा सह सचिव अशी करून दिली.
तिथे त्याने त्या विक्रेत्यांना असं सांगितलं की आयफेल टॉवर च्या डागडुजी आणि मेंटेनन्स चा खर्च खूपच जास्त होत असल्याने या टॉवर ची भंगाराच्या भावात विक्री होणार आहे. त्याने असंही सांगितलं की ही गोष्ट अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे ती कोणालाही काळता कामा नये. लुस्तिग ने आंद्रे पोइस्सों नावाच्या विक्रेत्याची निवड केली. आंद्रे पोइस्सों ला असं वाटलं की आयफेल टॉवर जर आपल्याला मिळाला तर शहरात आपली प्रतिष्ठा प्रचंड प्रमाणात वाढेल.
लुस्तिग ने पैसे घेतले आणि तो गायब झाला.