पुनर्जन्माचं  सत्य
भयकथा संपादक Updated: 15 April 2021 07:30 IST

पुनर्जन्माचं सत्य : गस टेलर

पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .

जॉन राफेल आणि टावर पेड   इमाद इलावरची कथा


गस टेलर १८ महिन्याचा होता जेव्हा तो सांगू लागला कि तो त्याचा आजोबा आहे . बर्याच वेळा छोटी मुलं स्वतःची ओळखी बाबत भ्रमित होतात पण हे काहीतरी वेगळं होतं . त्याच्या 

आजोबांचा मृत्यू त्याच्या जन्माआधी एक वर्ष झाला होता पण बाळ समजत होत कि तो तेच आहेत . कुटुंबांचे जुने फोटो दाखवल्यावर गस ने आपल्या आजोबांचे ते चार वर्षांचे 

असतानाचा फोटो ओळखला . 

एक कुटुंबांच गुपित होतं ज्याचा उल्लेख कोणीही गस समोर केलेला नव्हता . आजोबांच्या बहिणीची ह्त्याकारून कुणीतरी सेन्फ्रान्सिस्को बे मध्ये फेकून देले होते . कुटुंब हैराण झालं 

जेव्हा चार वर्षाच्या गस ने आपल्या बहिणीचा विषय काढला . गसच्या म्हणण्यानुसार देवाने त्याला एक तिकीट दिलं ज्यामुळे तो एका छिद्रातील रस्त्यातून चालू शकत होता . त्यानंतर 

त्याने गस म्हणून जन्म घेतला . 

. . .