भयकथा संपादक
Updated: 15 April 2021 07:30 IST
पुनर्जन्माचं सत्य : डच क्लॉक
पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .
ब्रूस व्हित्तिएर ला पुन्हा पुन्हा हे स्वप्न पडायचं कि तो यहुदी माणूस आहे आणि आपल्या घरात आपल्या परिवारासोबत तो लपलेला आहे . त्याचं नाव स्टेफन होरोवित्न होते , एका
यहुदी ला त्याचा परिवारासोबत शोधून काढलं होतं आणि ऑस्च्व्तज ला आणलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला . स्वप्नानंतर तो घाबरून अजून अस्वस्त होतो . त्याने आपली स्वप्न
लिहून काढायला सुरुवात केली आणि एका रात्री त्याने घड्याळाचे स्वप्नं पहिले त्याचं सकाळी उठून त्याने चित्र काढलं .
व्हित्तिएर ने ते घड्याळ स्वप्नात एका आटिक दुकानात पहिले आणि तो तिथे पाहायला गेला . घड्याळ दुकानाच्या खिडकीतून दिसत होतं आणि अगदी त्यच्या स्वप्नातील घड्याळा
सारखं होतं . व्हित्तिएर ने विचारलं कि हे घडयाळ कुठून आलंय . अस समजलं कि ते घड्याळ नेदरलंड च्या एका निवृत्त जर्मन मेजर कडून ते खरेदी केलेलं होतं . ह्यामुळे व्हित्तिएर
ला खात्री पटली कि खरोखरच त्याचा मागचा जन्म होता .
. . .