भयकथा संग्रह २ Bhutachya Katha : भूतांचा अनुभव
मराठी भयकथा यांचा संग्रह. Bhutanchya katha ani bhay katha. This are some really good marathi horror stories. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.
माझ नाव प्रकाश मालवणकर
आणि हि माझी खरी खुरी स्टोरी आहे .
अस म्हणतात हे रहस्यमयी आणि भीतीदायक
भूतांचे अनुभव काही लोकांना आयुष भर येतात तर
काही असे पण लोक आहेत ज्यांना आयुष्यात
एकदाही असा अनुभव होत नाही . आणि हे सगळ
माणसाच्या गणा वर अवलंबून असत .
ज्याचा गण मनुष्य किवा राक्षस
असतो त्याला भूतांचे अनुभव होतात तर देव गण
असलेल्या मनुष्या जवळ भूत फिरकत हि नाही .
माझे वडील आर्मी मधून रिटायर झाले होते.
भीती काय असते हे त्यांना माहीतच नव्हते
आणि पराध ( शिकार ) करणे हा त्यांचा छंद
होता . आपण तेवढेच ते देवावर विश्वास ठेवणारे
सुधा होते. मी सुधा त्यांच्या बरोबर
जायचो शिकारीला . आणि गावच जंगल म्हटलं
कि ससे आणि रान डुक्कर यांची भरमार होती.
पण रात्रीच्या शिकारीचे पण काही नियम होते
बाबांनी ते मला सांगितले काही जागेवर तुला २ ते
३ ससे खेळताना दिसतील पण जे जाणकार
शिकारी आहेत ते म्हणतात
कि अश्या ठिकाणी भूत असत ते भुरळ घालून
शिकार्याला फसवत आणि मग मारून टाकत
आणि ते ससे सुधा खरे नसतात ( आणि असाच
एका फिल्म मध्ये सुद्धा दाखवलं आहे तुम्ही *
काल * नावाचा मूवी पहिलाच असेल त्यात
असा सीन आहे )
त्यांच्या सगळ्या सूचना ऐकल्या आणि आम्ही दोघ
शिकारीला निघालो.
जेव्हा रात्र अमावस्येची असते तेव्हा जास्त
शिकार मिळते असे गावकरी समजतात म्हणून
आम्ही पण अमावास्येच्या रात्रीच निघालो होतो.
अंधार एवढा होता कि १ फुटावरच सुधा नीट
दिसत नव्हत अचानक समोरच
असलेल्या झाडा झुडपा मधून
सळसळण्याचा आवाज झाला.
बाबांनी मला सांगितले कि तू इथेच
उभा रहा मी हळूच मागून जातो आणि तिथे जाळ
लावतो आणि तुला battery चालू बंद करून
सिग्नल देतो . माझा सिग्नल भेटच तू
त्या झुडपां जवळ ये आणि जोराने टाळी वाजव
म्हणजे लपलेला प्राणी विरुद्ध दिशेने पळेल
आणि लावलेल्या जाळ्यात अडकेल . आमच प्लान
पक्का झाल आणि बाबा हळूच दबक्या पावलाने
तिथे गेले .
मी तिथेच दबा धरून बसलो होतो काही वेळाने
अचानक मला battery चा प्रकाश
दिसला जो चालू बंद होत
होता मी समजलो कि हा बाबांचा सिग्नल आहे .
मी त्या झुडपां जवळ गेलो आणि जोरात
टाळी वाजवली .
आणि जशी मी टाळी वाजवली तसा जोरात पंख
फडफडण्याचा आवाज
झाला आणि काही तरी त्या झुडपां मधून वर
उडाले . वर पाहतो तर एक भयानक
आकृती क्षणात दिसली आणि गायब झाली हे
पाहून माझे अवसान गळाले आणि मी थर थर कपू
लागलो . माझे बाबा धावत तिथून आले
आणि त्यांनी माझी अवस्था पाहिली आणि त्यांनी घरी जायचे
ठरवले.
आम्ही घरी आलो आणि मी बेड वर
पडलो होतो पण मनातून काही ते जात नव्हत .
विचार केला तो पक्षीच असेल मला भास
झाला असेल आणि मला मुत्र विसर्जन
सुधा करायचं होत . पण बाहेर
जायला भीती वाटत होती. पण विचार
केला कि काही नाही जावूया भीती पण निघेल
आणि माझ काम पण होईल . मी बाहेर
गेलो सगळी कडे अंधार होता पण
होती आणि जरा मोकळ मोकळ सुधा वाटल
माझी लघु शंका आटोपून मी बेड वर येवून
झोपलो .
थोड्या वेळाने अचानक मला असा वाटल
कि कोणी तरी माझा हात घट्ट पकडला आहे
आणि मला ओढतय. माझे डोळे उघडले तर पहिले
ते भयानक दृश्य मी माझ्या घराच्या बाहेर
जमिनीवर आहे . आणि एक ७ ते ८ फूट उंच
माणूस ज्याने अंगावर
काळी घोंगडी घेतली होती तो मला खेचून
जंगलाच्या दिशेने नेत होता . त्याने माझ्याकडे
पहिले त्याचे डोळे पूर्ण सफेद होते आणि ते पाहून
माझ्या तोंडातून एकाच किंकाळी फुटली .
माझ्या किंचाळन्याने ती भयानक व्यक्ती अदृश्य
झाली तसेच माझ्या घरातले व आजू बाजूचे जागे
झाले माझे बाबा धावत बाहेर आले.
माझ्या घरच्यांनी मला आधी घरात नेले
मी झालेली सगळी हकीकत
त्यांना सांगितली आणि त्यांना विश्वास
ठेवावा लागला कारण माझ्या हातावर
कोणी तरी घट्ट पकडल्याचे निशाने होते जे
निळसर झाले होते.
तेव्हा सांगितले कि रानात गेला होतात न त्याचाच
परिणाम आहे हा . तिथूनच वाईट शक्तीला तू इथ
पर्यंत घेऊन आलास बाबा सोबत होते
तेव्हा त्या शक्तीने काही केले नाही कारण
त्यांचा देव गण आहे. पण नंतर तू जेव्हा परत
एकटा बाहेर गेलास तेव्हा ती तूझ्या बरोबर
खोलीत आली. तू ओरडलास म्हणून वाचलास
आणि त्यांनी एक
देवीचा अंगारा माझ्या कपाळाला लावला . पण
आता सुधा अमावस्या आली कि मला घाबरल्या घाबरल्या सारख
वाटत .
गावाच्या ठिकाणी असा म्हणतात
कि अशा शक्तींना जागेवाला बोलतात जे
त्या जागेच रक्षण करत असतात आपण
त्यांच्या वाटेला आलो किवा कामात
अडथला निर्माण केला तर ते
त्याची शिक्षा आपल्याला देतात . म्हणून
मित्रानो पुढच्या वेळी गावाला जाल
तेव्हा अशा कोणत्या हि ठिकाणी जाऊ
नका जी तुम्हाला माहित नसेल
काळजी घ्या आणि आयुष्य एन्जोय करा