भयकथा संग्रह २ Bhutachya Katha : होस्टेलमधील घटना
मराठी भयकथा यांचा संग्रह. Bhutanchya katha ani bhay katha. This are some really good marathi horror stories. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.
मित्रानो विकास पाटील आज
आपल्याला त्याच्या सोबत घडलेली एक
सत्य घटना सांगतोय - तुमच्याकडे पण
काही सत्य घटना असतील तर
मला मेसेज
करा मी त्या तुमच्या नावासहित पेज
वर पोस्ट करेन
इंजिनीरिंग कॉलेज
ला असताना कधी होस्टेल वर
राहायचा योग नाही आला, गाव फक्त
१८ किलोमीटर असल्यामूळ बऱ्याच
वेळा बस ने किंवा गाडीवरून जायचो.
कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असेल
किंवा पार्टी असेल तेव्हा २-३ दिवस
मित्रांसोबत त्यांच्या रूम वर
राहायचो. कॉलेज
च्या शेवटच्या वर्षाला असताना सगळ्यांनी मिळून
एक २BHK बंगला रेंट ने घेतला.
आम्ही घेतलेला बंगला इतर
घरांच्यापासून जरा जास्त च लांब
होता शेजारी फक्त एक पडलेली रूम
होती आणि बाकी बाजूनी फक्त
रिकामा माळ होता.
इतरांसाठी ते भीतीदायक असलं
तरी आम्ही तो बंगला पाहून खूप खुश
होतो, कारण
दंगा केला पार्ट्या केल्या तरी कोणाला काही त्रास
नव्हता आणि कोणी विचारणार पण
नव्हत. बंगला घेऊन फक्त १
महिना झाला होता तरी तिथं आमचं
साहित्य सोडलं तर
कोणीसुद्धा राहायला गेल नव्हत,
सगळ्यात आधी अमित आणि इस्माईल
दोघेच राहायला गेले,
संध्याकाळी अचानक इस्माईल
च्या घरून फोन आला त्यामुळ
त्याला घरी जाव लागलं,
त्या रात्री फक्त अमित थांबणार
होता तिथं रात्री एकटाच जेवून
तो बेडरूम मध्ये बसला होता,
मैत्रिणी चा फोन आला त्यामुळ त्यान
सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि हॉल
मध्ये येउन बसला, हॉल च्या बाहेर
पाऊस आत येऊ नये म्हणून
पत्रा लावला होता, त्यान फोन वर
बोलून झाल्यानंतर हॉल मधली लाईट
बंद केली आणि बेडरूम कडे
यायला वळला आणि अचानक
कोणीतरी दार वाजवले बाहेर पाऊस
सुरु होता
त्यामुळ कदाचित कुत्रा वगैरे असेल
म्हणून दुर्लक्ष केलं पण लगेचच समोर
लावलेला पत्रा अचानक
वाजायला लागला आता मात्र
त्याला भीती वाटायला लागली होती थोड्यावेळात
सगळे आवाज बंद झाले आणि अचानक
बेडरूम आणि किचन
मधल्या खिडक्यांचा आवाज
त्याला ऐकू आला त्यान जाऊन पाहिलं
तर अगोदर बंद
केलेल्या सगळ्या खिडक्या उघडलेल्या होत्या.
तो पूर्ण रात्र
जागा राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यान
फोन करून सगळ्यांना काय घडल ते
सांगितलं आम्ही चेष्टा करून विषय
सोडून दिला,
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इस्माईल
आला होता दोघेपण बोलत बोलत
झोपून गेले, रात्री २ वाजता अमित
ला कसल्यातरी आवाजाने जाग
आली तर इस्माईल मोठ्याने ओरडत
होता आणि अगदीच भिन्न भाषेत
काहीतरी बोलत होता अमितने
त्याला उठवायचा प्रयत्न
केला इस्माईल ने अमित
ला धक्का देऊन खाली पाडले
आणि उठून बाहेर गेला
अमित त्याच्या मागून गेला तर
इस्माईल पळत होता त्याच्या अंगावर
फक्त अंडरवेअर होती, भाग अगदीच
सुनसान होता तरी अमित ने जाऊन
त्याला पकडले आणि रूम मध्ये परत
आणले, रात्रभर
तो त्याच्या शेजारी बसून
राहिला या एवढ्या प्रकाराबद्दल
इस्माईलला काहीही आठवत नव्हते.
पुन्हा वरचेवर काहीतरी आवाज ऐकू
यायचे दारात बल्ब
घातला कि फुटायचा वगैरे
अशा गोष्टी घडायच्या ,
मी एकदा सुधा तिथं
राहिलो नव्हतो आणि यांच्या गोष्टींवर
विश्वास पण ठेवला नव्हता . एक
दिवस मी तिथं झोपायला गेलो,
त्या रात्री बंगल्यावर एकूण चार जण
होतो. रात्री जेवून आलो सगळे
आणि गप्पा मारत
बसलो होतो रात्री चे साडे आठ
वाजले असतील होस्टेल मधून
मला एका मैत्रिणी चा फोन
आला कि पोटात दुखत आहे औषध आणून
दे , तिला औषध नेऊन
दिलेआणि थोडावेळ थांबून परत
यायला निघालो येताना रूमजवळ
पोहोचायच्या आधी एका ठिकाणी थोडासा उजेड
दिसत होता म्हणून जरा निटबघितलं
तर लक्षात आलं
कि ती दफनभूमी होती,तिथून
अगदी हाकेच्या अंतरावर बंगला असून
कोणाला च माहिती नव्हत
तिच्याबद्दल. बोलत बोलत कधी वेळ
गेला कळलं नाही,
त्या दिवशी मी सोडून बाकीचे तिघे
पूर्ण पिलेले होते त्या नशेत
कोणाला निट काही कळत नव्हते,
रात्रीचे अडीच वाजले आणि अचानक
बाहेर पत्र्यावर खडे
मारल्यासारखा आवाज
यायला सुरवात झाली
पहिल्यांदा मला वाटल
कि सगळ्यांनी मला घाबरवायला काहीतरी प्लान
केलाय मी हॉल मध्ये जाऊन
बाहेरची लाईट
लावली आणि खिडकी मधून बाहेर
पाहिलं तर कुणी दिसलं नाही, रूम
मध्ये आलो तर बाकीचे तिघे गाढ
झोपले होते मी त्यांच्या शेजारी च
पडलो होतो आणि अचानक एक जण
विचित्र भाषेत
ओरडायला लागला कुत्री भुंकायला लागली आणि पुढच्याच
मिनिटाला कुत्र्यांनी रडायला सुरवात
केली रूम च्या चारही बाजूनी आवाज
येत होता, काय करावे हे पण सुचत
नव्हत घामान अंग चिंब भिजलं होत
आणि भीती काय असते हे तेव्हा कळलं
होत. पूर्ण अर्धा तास हे चालू होत.
माझ
समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकड
लक्ष गेल तर त्यात १२ वाजले होते ,
पूर्ण तीन तासाचा फरक होता.
सगळ शांत झाल्यावर फक्त तोंडावर
घेऊन पडलो होतो एक तासभर
झाला असेल
त्या तिघांपैकी कोणीतरी उठलेल होत
मी तोंडावरच पांघरून बाजूला करून
पाहिलं तर अमित
होता त्या वेळेला मी परत ते घड्याळ
पाहिलं तर त्यात बरोबर चार वाजले
होते घड्याळ बरोबर वेळ दाखवत होत,
सकाळी सगळ्यांना मी घडलेलं सगळ
सांगितलं तेव्हा अमितने मला विचारलं
कि तु बाहेरची लाईट लावलीस
तेव्हा लागली होती का? हा प्रश्न
कशासाठी होता मला कळलं नाही,
त्याने मला बाहेर नेऊन एक गोष्ट
दाखवली ती बघून तर मला धक्काच
बसला, बाहेरच्या होल्डर मधला बल्ब
८ दिवसांपूर्वीच फुटला होता,
त्या दिवशी साहित्य घेऊन सगळे
तिथून आलोय ते आज पर्यंत तिथं
गेलो नाही.