भयकथा संग्रह २ Bhutachya Katha
Horror Editor Updated: 15 April 2021 07:30 IST

भयकथा संग्रह २ Bhutachya Katha : खविस

मराठी भयकथा यांचा संग्रह. Bhutanchya katha ani bhay katha. This are some really good marathi horror stories. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.

भयकथा १   आजोबांनी सांगितलेली भयकथा

मी रोहित रामचंद्र भामरे
आज मी तुम्हाला खविस बद्दल सांगणार
आहे स म्हणतात की हा खविस जर
कधी आपल्याला दिसला तर
तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्ठीयुद्ध
खेळायला लावतो.
जर आपण जिंकलो तर
तो नेहमी आपला गुलाम होऊन
राहतो किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण
करतो . पण जर आपण त्यात हरलो तर
आपल्याला तो मारून टाकतो .
गावच्या ठिकाणी खाविसाचा वावर जास्त
दिसून येतो . पण कधी कधी जरी आपण
जिंकलो तरीही तो माणसाला मारून टाकतो .
अशीच एक घटना नाशिक मध्ये फार
वर्षापूर्वी घडली होती . कोंडाजी पहिलवान
हे नाशिकमधले नावाजलेले पहिलवान समजले
जात . त्यांनी मोठ
मोठ्या पहिलवानांना कुस्तीत धुळ
चारली होती . त्यामुळे त्यांचा एक
दबदबा कायम झाला होता . ते लवकर
कधीच कोणाची मदत घेत नसत , गर्वाने
नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर
आणि याच जोरावर त्यांनी लहानपणापासुन
कसरत करुन स्वत:च्या कतृत्वाच नाव
या शहरात अजरामर केल. त्यांना एक लहान
मुलगी होती आणि तिच्यावर ते जीवापाड
प्रेम करत असत .
तर झाल अस कि 1 एके दिवशी ते
रात्री कोणा नातेवाईकांकडे गेले होते .
आता पुर्वी काही गाडी वगैरे
नव्हती आणि पुर्वी ज्या माणसाकडे सायकल
असायची तो माणुस श्रीमंत मानला जाई .
पण आता एकढे मोठे कोंडाजी पहिलवान
सायकलला त्यांचा भार
पेलला गेला नसता म्हणुन ते नातेवाईकांकडे
पाई पाई चालत गेले . जेवण वगैरे झाल , ते
म्हणाले चला आता निघतो मी जेम तेम 8
वाजले असतील आता निघालो तर
10-10.30 पर्यंत घरी पोहचेन या हिशोबाने
त्यांनी निघायची तयारी केली . नातेवाईक
म्हणाले दादा थांबा उद्या जावा रात्र
झालीय आणि रस्ता खराब आहे , पण
त्यांना कोणी अडऊ शकल नाही . पहिलवान
निघाले गावाच्या वेशीपासुन थोड लांब एक
जंगल आहे जंगलाच्या जवळ आले
जरा लघुशंका केली चालु लागले तेवढ्यात
त्यांना मागुन आवाज आला काय वस्ताद
कुठे निघाले त्यांनी मागे वळुन बघितल तर
एक भला मोठा माणुस त्याँच्या जवळ
येताना दिसला .
हा नक्की काहितरी विचित्र प्रकार
दिसतोय . ते म्हटले कोण तुम्ही ? समोरुन
आवाज आला कुस्ती खेळणार काय ? जर
जिंकलास तर आयुष्यभर चाकरी करेन तुझी .
कोंडाजी पहिलवानांना आव्हान दिल ते
भडकले आणि लगेच तयार झाले . दोघांमध्ये
चांगली कुस्ती रंगली .
पहिलवानाला माहित नव्हते कि आपण
ज्या गोष्टीचा सामना करतोय ती मानवीय
नाही आहे . तरी पण ते लढत राहिले
आणि आणि शेवटी त्यांनी त्या खाविसाला ह
त्यावर खाविसाने
पहिलवानांना शाबाशकी दिली आणि म्हणाला
पठ्या. इथे वाचलास पण अजून हि लढाई
संपली नाही आहे . एका खाविसाला हरवणे
सोप्पे नसते तेव्हा पाहिल्वानाच्या अंगातून
एक शिरशिरी उठली आणि त्यांना कळून
चुकले हा माणूस नसून खाविस आहे . खाविस
त्यांना बघून हसला आणि त्याने
पेहलवानाला एक अट घातली की जर
घरी जाताना किंवा घरात पोहोचायच्या आत
कोणत्याही परिस्थितीत मागे वळुन पाहिल
तर तुला प्राण गमवावे लागेल .पहिलवान
निघाले कितीही मोठे पहिलवान असले
तरी मनात एक छोटी भिती होतीच गावात
पोहोचले थोडी भिती कमी झाली , घरापर्यंत
गेले अजुन
भिती कमी झाली दरवाजा उघडला जीवात
जीव आला. त्याने
घराचा दरवाजा उघडला आणि पाय टाकणार
तेवढ्यात त्याला मागून
त्याच्या मुलीचा जिच्यावर तो जीवापाड
प्रेम करायचा . तिचा जोरात
रडण्याचा आणि हाक मारण्याचा आवाज
आला . आणि क्षणाचा हि विलंब न
करता त्यांनी मागे वळून पहिले .
आणि जसा तो पेहलवान मागे वळला जागीच
मुंडकी धडापासुन वेगळी होउन जमीनीवर
कोसळली. कारण मुलीच्या आवाजात
खाविसानेच आवाज दिला होता आणि अट
पूर्ण नाही केली म्हणून पेह्ल्वानाला मृत्यू
आला .
अस म्हणतात खविस
जेव्हा एखाद्याला झपाटतो त्या आधी तो त्
लक्ष ठेवून असतो . तो त्यांच्या कुटुंबातील
माणसांचे आवाज आत्मसात करतो .
आणि हाक देताना सुद्धा कुटुंबातील
सदस्याचा आवाज तो काढतो जेणेकरून .
आपण मागे वळून पाहावे . जर
असा कधी अनुभव आला तर एक सावध
गिरी बाळगा कि एक तर
रात्रीच्या वेळी आवाजाला साद देवू
नका मागे वळून पाहू नका . तो तुमच्या पुढे
कधीच येणार नाही जो पर्यंत तुम्ही मागे
वळत नाही .
आणि जरी अश्या शक्तीशी सामना झाला ता
सुर्योदय पर्यंत स्वताला सावरून
ठेवा आणि लढत राहा . कारण
सूर्योदयाच्या वेळी तो निघून
जातो आणि माणसाला आशीर्वाद सुधा
देतो
धन्यवाद

. . .