भयकथा संग्रह २ Bhutachya Katha
Horror Editor Updated: 15 April 2021 07:30 IST

भयकथा संग्रह २ Bhutachya Katha : झपाटलेला वाडा

मराठी भयकथा यांचा संग्रह. Bhutanchya katha ani bhay katha. This are some really good marathi horror stories. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.

गाव पळ   राजापूरची कहाणी

राजकुमार गेल्यानंतर मी त्या गुहेत एकटाच
होतो. अचानक एक सावली माझ्या दिशेने
आली... मी किंचाळलो... मला झोपेतून जाग
आली .पाहील तर मी वाड्यातील माझ्या खोलितच
होतो. रात्रीच्या 12 वाजेचे घड्याळात ठोके
पडत होते. मी वाड्याच्या तळघरात गेलो, तिथे
मला ते पुस्तक मिळाले, मग
मी त्या मुलांच्या मागे
गेलो आणि त्यांनी मला ती आंगठी दिली.... हे
सर्व मी फ़क्त स्वप्नातच पाहील... आणि अस
काहिच घडल नसाव या विचाराने मी गोंधळुन
गेलो होतो. काय खरं आणि काय खोटं हेच उमगत
नव्हत. ..... याचा अर्थ मघाशी मी जे चक्कर
येउन पडलो ते आत्ता उठत आहे. अरे
देवा अश्याने मला वेड लागेल. मी उठुन
खोलीच्या बाहेर गेलो, पाहीलं तर सर्व झोपी गेले
होते. घश्याला कोरड पडली म्हणुन
मी पाणी पिण्यासाठी परत खोलित गेलो.पलंगावर
बसुन पाणी पित असतांना मला जाणवलं
की माझ्या खिश्यात काहितरी आहे म्हणुन
मी खिश्यात हात
घातला आणि मला पुढचा धक्का बसला तो माझ्या हातात
ती स्वप्नातली आंगठी होती.पण ती इथे
कशी नक्की ते स्वप्नच होतं कि अजुन
काही? ...........
या प्रश्नांची उत्तर मला हवी होती.
ती आंगठी माझ्या बोटात घालण्याचा निर्णय
मी केला.आणि जशी ती आंगठी मी बोटात
घातली अचानक मला विविध दृश्य दिसू लागली.
राजकुमार आणि भिमाजी यांच्यातील लढाई,
मेल्यानंतर भटकणारी भिमाजीची आत्मा हे सर्व
जाणवत होतं." अमवास्येच्या आधी सर्व
संपवायला हवे” असा आवाज येत होता.
मी पाहिले की एक तेजाचा झोत आहे
आणि त्यातुन हा आवाज येत
आहे .मी त्याला विचारल माझ्या मित्रांच
आणि शिक्षकांबरोबर काही वाईट तर होणार
नाही ना? यावर तो झोत म्हणाला तु चिंता करु
नकोस, त्यांना काहिही होणार नाही. तु फ़क्त
आपल्या ध्येयावर लक्ष दे. एवढ सांगुन
तो अदृश्य झाला. त्या आंगठीवर लक्ष केद्रित
केलं आणि मी तळघरात पोहचलो.तिथेच
मी भिमाजीला पाहिल. लाल डोळे, मोठे केस,
विद्रुप
चेहरा अगदी गोष्टीतल्या भुतांसारखा होता तो की त्यांच्या पासुनच
गोष्टी तयार झाल्या माहित नाही पण पाहील्या -
पाहील्या व्यक्तिला भितीने चक्कर यावी असाच
दिसत होता तो.त्याच्या भोवती काळ्या शक्तींच
वलय होतं.तो म्हणाला " आज तु माझ्या हातुन
वाचणार नाहिस, बरया बोलाने मी तुला जाण्यास
सांगत होतो पण तु गेला नाहीस
आता आपल्या मरणास सामोरे जा." त्याने
बाजुला पडलेल्या एका लाकडाने माझ्यावर
हल्ला केला. मी तो थांबवला पण त्याने
आपल्या काळ्या जादुचा विळखा माझ्या भोवती घालण्यास
सुरुवात केली. माझ्याकडे ती दिव्य
आंगठी असल्यामुळे मला काहिही झाले नाही.
यामुळे भिमाजी अधिकच
चवताळला तो आपली सर्व ताकद पणाला लाऊन
हल्ले करत होता. माझ्या मनात
माझ्या मित्रांचा विचार आला आणि माझे लक्ष
विचलीत झाले याच संधिचा फ़ायदा त्याने घेतला.
त्या हल्यात मी खाली कोसळलो आणि वेदनेने
कळवळु लागलो. भिमाजी मोठ्याने हसत
होता .त्याला स्वतःच्या शक्तिवर फ़ारच गर्व
होता.मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो.
अत्यंत असाह्य .काहिही करण्यास असमर्थ.
मला स्वतःचाच राग येत होता. पण अंतरंगातुन
आवाज आला उठ - उठ, अस हरुन चालणार
नाही .तु ह्याच कार्यासाठी इथे
आला आहेस .तुझ्यापाठी देवाची शक्ति आणि तुझी पुंण्याई
आहे .उठ.............
या नंतर मात्र माझ्या शरिरात एक वेगळीच
शक्ति आली. मी उठलो आणि देवाचं नाव घेउन
हातात असलेल्या आंगठीला काढल आणि धावत
भिमाजीकडे जाउ लागलो .त्याने
मला अडवण्यासाठी फ़ार प्रयत्न केले पण वाईट
शक्ति कितिही प्रबळ
असली तरी देवाच्या शक्ति समोर काहिच
नाही हेच खरे.. ति आंगठी मी त्याच्या पोटात
खुपसली .तसा तो आक्रोश करु लागला.
मला मारण्याचा प्रयत्न करु लागला, पण
आता फ़ार उशिर झाला होता. तो वाफ़ेप्रमाणे
विरुन गेला.वातावरण शांत आणि निर्मळ जाणवत
होत.वाड्याने मोकळा श्वास घेतल्याची जाणीव
झाली. पण ती आंगठी अजुन तिथेच पडुन होती.
ती आंगठी उचलली आणि माझ्या शरिरावरचे
सर्व घाव भरुन निघाले. दुसरयाच
क्षणी मी वाड्यात होतो. पाहाट होणार
होती .हवा थंड आणि ताजी होती. सुर्य
उगवण्या आधी सर्व आभाळ केशरी झाले
आणि पक्ष्यांचा किलबीलाट
कानी आला.तासाभरात सर्व उठले.
त्यांना या वाड्यात काय घडले
याची काही कल्पनाच नव्हती. पुढचे दोन दिवस
आम्ही कोकणातील खाद्य आणि निसर्ग
यांचा आस्वाद
घेतला आणि आपल्या घरी परतलो.ती आंगठी आजही माझ्या हातात
आहे आणि आजही जर कुठे जायचे असेल तर
माझ्या मनात एक गोष्ट नक्की येते ती म्हणजे
परत आपल्याला अजुन कोणता वाडा मिळणार
नाही ना.कि माझ नशिब मला अजुन कुठे तरी घेउन
जाइल.काहिही घडेल, पण त्या प्रवासात
मला कधीहि न विसरता येणारा अनुभव
आला आणि माझा देवा वरचा विश्वास अजुनच
वाढला. तेव्हा आपण कुठेही असलो तरी देवावर
विश्वास असल्यास आपण सुखरुप
परततो. ......................................
माझी कथा कल्पनिक होती, पण देव
ही कल्पना नाही. कथा वाचणारयांचे आभार.
. . .