भयकथा संग्रह २ Bhutachya Katha
Horror Editor Updated: 15 April 2021 07:30 IST

भयकथा संग्रह २ Bhutachya Katha : दुबई मधील घटना

मराठी भयकथा यांचा संग्रह. Bhutanchya katha ani bhay katha. This are some really good marathi horror stories. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.

पिंपळ रेकॉर्डिंग चेक   भयकथा १

Ajeya Suku Visnhu
By Avinash Pataskar
हि अगदी १००% सत्यकथा आहे
आणि मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभव
घेतला आहे. भूत म्हणजे सडलेले, रक्तबंबाळ,
असे काही असतेच असे नाही असे मला वाटू
लागले. मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर
आहे आणि गेली १२ वर्षे परदेशात मध्य
पूर्वेत कुवेत दुबई मध्ये राहत आलो आहे. इथे
वास्तुदोष भरपूर असतात कारण
परदेशी नागरिकांसाठी घरे
बांधताना मालक कसलाही विचार करत
नाही. मला इकडे बरेच अनुभव आले
त्यातलाच हा दुबईतील एक अनुभव.
मला नवीन नोकरी पगारवाढ मिळून
दुबईत लागली. मला त्यामुळे अजमान वरून
दुबईला राहायला जाणे भाग होते. दुबईत
जागा मिळणे फार अवघड झाले आहे.
जाहिराती बघून फोन करत
होतो जागा पाहत होतो. जवळ
आणि सोयीस्कर अशी जागा मिळत
नव्हती. असली तर भाडे जास्त
किवा जागा गेलेली असे. शेवटी मला व
मुलांना जवळ अशी जागा आहे हे कळले
आणि पाहायला गेलो तर
ती कोणी घेतली नव्हती फक्त एक
प्रोब्लेम होता कि प्लॉट चे तोंड
दक्षिणेला होते. अशा वास्तूत दुष्ट आत्मे
सहज राहतात. नशीब चांगले कि फ्लाटचे
तोंड पश्चिमेला होते, घेण्याशिवाय
पर्यायच नव्हता, कारण १-२ दिवस
राहिले होते जुनी जागा सोडायला.
म्हणून ती घेतली. ते झाले आणि मी,
बायको, आणि मुलगा, मुलगी असे चौघे तिथे
राहायला गेलो. नवीन प्रमोशन
ची नोकरी होती. पण खाजगी नोकरीत
कटकटी फार. तेच सुरु झाले. त्यातच
आजारपणाची भर पडली. असे ८-९ महिने
चालू होते. मी स्वत कुंडली वगैरे बघत visit
my site as avinashpataskar.in असल्याने
एकदा प्रश्नकुंडली मांडली तर त्या वस्तुत
३ अतृप्त आत्म्याचे वास्तव्य असल्याचे
स्पष्ट झाले. माझाही फार विश्वास
नसल्याने मी फार विचार केला नाही. पण
त्या बिल्डींग ला सगळेच लोक नावे ठेवत
असत. कारण नंतर कळले. पुढच्याच
वर्षी मुलीची १० वी असल्याने बायको व
मुले पुण्याला निघाली. आता मी एकटाच
राहत होतो. मधून अधून खाणे पिणे बार
वगैरे चालायचे.

महिन्यापूर्वी इराकला असताना मी आजारी पडलो व
दुबईत आल्यावर
पित्ताशायाची शस्त्रक्रिया झाली.
त्याचे सगळे परिणाम हळू हळू ओसरू लागले
होते. बरेच त्रास होत होते. मी एकटाच
असल्याने हॉटेलात
राहण्याच्या विचारात होतो. अजून घर
सोडायचे पक्के झाले नव्हते कारण पुढे
मिळणे अवघड असल्याने अजून सोडले नव्हते.
आता सुट्टीच्या दिवशी घर खायला उठे.
दुबईमध्ये ३०-४०% वेश्या राहतात.
माझ्या समोरच्या घरात सुमारे १०
जनी राहत होत्या.
सगळ्या सिरीया इराण, युक्रेन,
रशिया आणि युरोपिअन.
मला याविषयाची थोडीफार
माहिती होती. त्या दिवसभर आराम व
रात्री काम करत.
सुट्टीच्या दिवशी रात्री झोपयला उशीर
झाला कि त्यांचे काय चालते
याची उत्सुकता वाटे. बाहेरून
आवाजही येत. थोडेफार कळत असे. म्हणून
घराच्या पीपहोल मधून बाहेर
पहायचा मोह आवरत नसे.
त्यावेळी अमावास्येला २-३ दिवस होते
आणि मी असाच बाहेर पाहत होतो.
बाहेर पसेज मध्ये मला २-३
साडी घातलेल्या बायका काहीतरी धुणे
धूत असलेया किवा काहीतरी काम करत
असलेल्या दिसल्या. त्यानंतर २ मुले
पळताना दिसली. त्या बायका एकच
हालचाल एकसारख्या करत होत्या.
मुलेही पळत होती. असे ३-४ वेळा झाले,
म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर
काहीच नाही. अगदी शांत! परत झोपलो.
थोड्या वेळाने काही आवाज झाला म्हणून
परत बाहेर पहिले तर तेच दृश्य! आता डोके
आउट झाले. असे त्या रात्री ४-५
वेळा मला दिसले. ती रात्र
कशीतरी गेली.
दुसर्या दिवशी सुट्टी होती म्हणून
जागरणाचे काही वाटले नाही.
झोपताना मी घरात
देवीच्या फोटोखाली झोपत असे.
दुसर्या दिवशी रात्री तोच प्रकार
दिसत होता. त्यात
पासेजच्या कडेला १-२ पुरुष व
स्त्रिया बसलेल्या दिसत होत्या. नंतर
एक उंचापुरा माणूस दरवाज्याच्या बाहेर
घरात येण्याच्या तयारीत उभे
असलेला दिसत होता. मी काही ऑर्डर
दिलेली नव्हती.
बेलसुद्धा वाजली नव्हती मग हा माणूस
आला कुठून? म्हणून मी एकदम दार उघडले.
तर तिथे काहीच नाही.
त्या दिवशी रात्री २-३ पेग लावून
मी झोपलो होतो कदाचित त्यामुळे
डोक्यातील विचार जातील असे वाटत
होते. पण मध्येच जाग आली.
तसा मी जमिनीवर चटई टाकून झोपतो.
बाजूला रिकामी खाट पडली होती.
तिच्याखाली मला हालचाल जाणवली.
म्हणून पहिले तर मांजरासारखे
पिल्लाच्या आकाराचे डोळे चमकत होते. ते
माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होते.
म्हणून त्याला हुसकावण्यासाठी हातात
काहीतरी आले ते फेकले. तेव्हा ते मांजर
खाटेवर चढून बसले. मी उठून लाईट लावून
बघतो तर काहीच नाही. खिडक्या चेक
केल्या तर सगळ्या बंद.
त्याही मोठमोठाल्या अलुमिनिअम
च्या स्लाईड खिडक्या त्यातून ते येन
शक्यच नव्हते. घरात सगळे असताना असे
कधीच झाले नव्हते. माझा मनुष्य गण
असल्याने आणखीनच भीती वाटत होती.
परत आलो आणि झोपलो. थोड्यावेळाने
माझ्या खांद्याला कोणीतरी जोरात
ओढते आहे असा भास झाला. उठून अंधारात
पहिले तर माझ्या जवळ एक पुरुष पूर्ण
उघडा माझ्याकडे पाठ करून
बसलेला होता. लाईट लावल्या तर
काहीच नव्हते. परत झोपलो. पण झोप येत
नव्हती. छताकडे बघत बसलो. तर
सिलिंगवर एक मुस्लिम पुरुष व
काही बायका बोलत असल्याचे
चित्रपटासारखे दिसत होते. असे ३-४
वेळा झाले. मी देवीच्या फोटोसमोर
झोपत असे त्यामुळे मला काही होणार
नाही याची खात्री होती. थोडा वेळ
गेला आणि एक चमकणारा पांढरा उंदीर
भिंतीवर पळत होता. मी दुबईमध्ये उंदीर
कधिच पहिला नव्हता. शेवटी वैतागून
बेडरूम मधून हॉल मध्ये येउन बसलो.
हॉलला पूर्ण काचेचा दरवाजा होता व
त्याला गोगल ग्लास होती. त्यात आतले
प्रतिबिंब स्पष्ट दिसत असे. त्या काचेत
बघितले तर एक तरुण व एक वयस्कर बाई
उभ्या राहून बोलताना दिसत होत्या. ते
प्रतिबिंब माझ्याच घरातले होते. पण
घरात तर माझ्याशिवाय
या बायका आल्या कुठून? परत पीप होल
मधून पहिले तर तेच लोक, स्त्रिया, मुले
बाहेर खेळत होती. आता परत काचेत
बघितले तरी तेच चित्र दिसत होते. मग
पलीकडे बघायचा प्रयत्न केला तर एक
पांढरे कपडे घातलेला माणूस खुर्च्चीवर
बसावा असा बसला होता. खरे तर बाहेर
मोकळे मैदान आहे तिथे कुठे आला माणूस?
सगळेच अघटीत घडत होते. शेवटी येवून
झोपलो. काय होईल
तो होवो असा विचार केला.
आणि कधी डोळा लागला ते कळलाच
नाही. दुसर्या दिवशी मित्राला फोन
केला आणि माझ्याकडे राहायला ये तब्येत
बरी नाही अशी विनंती केली.
त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तो आला.
त्याला मी काहीच सांगितले नाही. पण
जशी जशी रात्र होऊ लागली तसे ते चक्र
पुन्हा सुरु झाले. मला जे दिसत होते
त्यातले त्याला काहीही दिसत नव्हते.
सगळे तेच भास होत होते. त्याने मला वेहम
आहे म्हणून सोडून दे असे सांगितले. पण
मला ते सगळे सहन होत नव्हते शेवटी १
आठवड्याची रजा घेऊन
मी पुण्याला निघालो. जेवढे समान भरून
घेता येईल ते घेतले. बाकीचे पाठवून दिले
आणि मोठी कपाटे तशीच सोडून दिली.
मित्र बरोबर होता म्हणून सगळे करू
शकलो. पुण्यात
पोचलो आणि घरमालकाला घर सोडणार
असल्याचे कळवले. तसेही माझे अग्रिमेण्ट
संपलेच होते. अजून १५ दिवस राहिले होते.
पुण्यात जर रीलाक्स झालो आणि परत
जायचे ठरले. अजून मोठे समान विकायचे
होते त्यासाठी परत त्याच घरात
राहायचा निर्णय घेतला आणि तिथे
पोचलो. यावेळी देवीचा अंगारा घेऊन
गेलो होतो. पण दरवाजातच बिल्डींग
मनेजरने अडवले. आता तुम्ही इथे राहू शकत
नाही असे सांगितले. मला हॉटेलमध्ये जाने
भाग होते. कदाचित नशीब चांगले असावे.
मी रात्री १२ वाजता हॉटेलला गेलो.
नंतर येजा करून समान विकले. नोकरी करत
होतो. पण आता तसला अनुभव काही येत
नव्हता. पण आत्ताही त्या घराची आठवण
झाली कि अंगावर शहारा येतो. इकडे
अरबी लोक
त्यांच्या नोकरांना कसेही वागवतात,
इतकेच काय जनावरासारखे जीवही घेतात.
त्यामुळे कदाचित असे आत्मे भटकत असावेत.

. . .