दिल्लीतील १० भयावह जागा : जमाली-कमाली का मकबरा आणि मशीद, महरौली
आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.
हि मशीद दिल्लीतील महारौली इथे आहे. इथे सोळाव्या शतकातील सूफी संत जमाली आणि कमाली यांच्या कबरी आहेत. या जागेच्या बाबतीत लोकांचा विश्वास आहे कि इथे भुते राहतात. अनेक लोकांना इथे भीतीदायक अनुभव आले आहेत. सूफी संत जमाली लोधी राजवटीचे राज कवी होते. यानंतर बाबर आणि त्याचा मुलगा हुमायून यांच्या राज्यापर्यंत जमालीला फार मान दिला गेला. मानले जाते कि जमाली च्या मकबऱ्याची निर्मिती हुमायूंच्या राजवटी दरम्याने पूर्ण केली गेली. मकबऱ्यात दोन संगमरवरी कबरी आहेत, एक जमालीची आणि दुसरी कमालीची. जमाली कमाली मशिदीची निर्मिती १५२८-२९ मध्ये झाली होती. हि मशीद लाल दगड आणि संगमरवरापासून बनलेली आहे.