
दिल्लीतील १० भयावह जागा : मालचा महल
आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.
मालचा महाल दिल्लीच्या दक्षिण भागातील खबदाडीत लपलेला आहे. त्याची निर्मिती आजपासून ७०० वर्षांपूर्वी फिरोज शाह तुघलक याने केली होती. तो याला आपले शिकार गृह म्हणून वापर करत असे. हा महाल हेल्या अनेक शतकांपासून विराण राहून खंडर झाला होता. या खंडर झालेल्या महालात १९८५ साली अवध घराण्याची बेगम विलायत महल आपली दोन मुले, पाच नोकर आणि बारा कुत्रे यांच्यासोबत राहण्यास आली. या महालात आल्यानंतर ती कधीही या महालाच्या बाहेर आली नाही. याच महालात बेगम विलायत खान ने १० सप्टेंबर १९९३ ला आत्महत्या केली होती. असे म्हणतात कि बेगम चा आत्मा आजही त्या महालात भटकतो.