भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया : ज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश

भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.

कामाख्या मंदिर, आसाम   खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश


हिमाचल प्रदेश हे मंदिर आपल्या चमत्कारांसोबत इथे होणाऱ्या तांत्रिक कार्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथे एक कुंड असे आहे, की पाहिल्यावर त्यातले पाणी उकळताना दिसते, परंतु प्रत्यक्षात स्पर्श केल्यास ते पाणी थंड लागते. हे मंदिर पांडवानी शोधून काढले होते येथे देवी सतीची जीभ पडली होती अशी आख्यायिका आहे. येथे देवीचे दर्शन ज्योती स्वरुपात होते

. . .