
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : बानगड किल्ला, राजस्थान
आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...
जर तुम्हाला भुताखेतांची भीती वाटत असेल तर तुम्हाला ही जागा सोडून द्यायला हवी. बानगड किल्ला ही भारतातील सर्वांत अधिक भूतबाधिक ठिकाणांपैकी एक आहे. त्याची निर्मिती १७ व्या शतकात झाली होती आणि तो इतका भयानक आहे की तिथल्या हिंसक आत्म्यांना घाबरून गावातील लोकांनी आपली वस्ती गावाच्या वेशीबाहेर हलवली आहे. भारतीय पुरातत्व विभागानुसार रात्रीच्या वेळी कोणालाही या किल्ल्यात जाण्याची परवानगी नाही.
. . .