
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : स्टोक कांगरी ट्रेक लडाख
आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...
स्टोक कांगरी ही ट्रेकिंग साठी भारतातील सर्वोत्तम जागा मानली जाते. परंतु पहिल्यांदाच ट्रेक करणाऱ्या अननुभवी लोकांसाठी ही जागा योग्य नाही, कारण ही भारतातील सर्वात कठीण चढणीन्पैकी एक आहे. यात कोणतीही शंका नाही की स्टोक कांगरी ही ट्रेकिंग साठी सर्वात सुंदर जागा आहे, पण फार कमी जण ही यात्रा पूर्ण करू शकतात, बहुतेक जण तर अर्ध्यावरूनच परत येतात.
. . .