
अगम्य (गूढ कथा) : दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस
कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर?
दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस
तो कुलकर्णी सरांकडे ट्युशनला जायचा. त्यांचा तो आवडता विद्यार्थी. अनेक मॅथ्स चे प्रमेय तो चुटकीसरशी सोडवायचा. क्लास मधील इतर मुलांनाही तो खुप मदत करत असे. सव्वा सहा वाजले आणि सुजय आला.
तेव्हा कुलकर्णी सर म्हणाले, " अरे, आज उशीर? काय झाले?"
सुजय म्हणाला, "रस्त्यात धुके होते. म्हणून थोडा उशीर झाला."
असे म्हणून तो बाकावर बसला. येतांना त्याने स्वेटर घातलेले होते. पण आता त्याचे अंगावर नव्हते. शेजारी बसलेल्या सुंदर आणि स्मार्ट सुजाताला त्याने हाय हॅलो केले. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र. त्याचे डोके अचानक दुखायला लागले. एक असह्य वेदना.... एका सेकंदाकरता..
तो मनातल्या मनात म्हणाला," मला आता असे का वाटत आहे की मी पळतोय? छे! भास असेल."
कुलकर्णी सरांनी डेरिव्हेटिव्ह् शिकवायला घेतले.
पण, पाचच मिनिटांत कुलकर्णी सरांचा मोबाईल थरथरला...
***