बोनी आणि क्लाईड
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

बोनी आणि क्लाईड : अतिम संस्कार आणि दफनविधी

Boni and Clyde is a famous horror story

मृत्यू   विवाद


बोनी आणि क्लाईडला एकत्र दफन व्हायचं होतं पण श्रीमती पार्कर यांना ते मान्य नव्हतं. त्यांना बोनीची शेवटची ईच्छा पुर्ण करायची होती आणि तिला घरी घेऊन यायचं होतं पण गर्दीमुळे ते शक्य झालं नाही. वीस हजारहून जास्त लोकं अंतयात्रेत आल्याने त्यांना दफनभूमीपर्यंत पोहोचणंही कठीण झालं. पार्करला 26 मे 1934 ला दोन वाजता दफन केलं गेलं. तिला श्रद्धांजली देण्यासाठी सगळीकडून फुलं आली. बोनी आणि क्लाईडच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे एकट्या डलासमधेच पाच लाख पेपर विकले गेले. पार्करला आधी फिशट्रैप कब्रस्तानात दफन केलं होतं, नंतर 1945  मधे तिला डलासच्या क्राऊन हील कब्रस्तानात हलवलं गेलं.  बैरोच्या कुटुंबाने बैरोला डलासच्या स्पर्क्मन होल्जच्या दफनभुमीत दफन करायचं ठरवलं. 25 मे ला सुर्यास्त झाल्यावर लगेच त्याला दफन केलं गेलं. त्याला वेस्टर्न हाईट्स कब्रस्तानात त्याचा भाऊ  मार्विनशेजारी दफन केलं. पोलिसदलाच्या सदस्यांना बक्षीसाच्या रकमेचा सहावा हिस्सा मिळणार होता.

बैरो पार्करच्या चकामकीने 1930 मध्ये 'पब्लिक एनिमी' काळाच्या सांगतेला सुरूवात झाली. याच्याच दोन महिन्यांनतर दिल्लिन्गरला शिकागोत रस्त्यावर घेरून मारण्यात आलं. त्यानंतर दोन महिन्यांनी चार्ल्स आर्थर "प्रीटी बॉय फ्लॉयड" ला ओहायोत गोळी घालून मारण्यात आलं. आणि बरोबर एक महिन्याने लेस्टर गिल्लीसलाही मारण्यात आलं.

. . .