बोनी आणि क्लाईड
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

बोनी आणि क्लाईड : बोनी एलिझाबेथ पार्कर

Boni and Clyde is a famous horror story

भुमिका   क्लाईड बैरो

बोनीचा एलिझाबेथ पार्करचा जन्म रोवेना, टेक्सासमधे झाला. तिन्ही भावंडांमधे ती मधली होती. तिचे वडील गवंडी होते जे बोनी चार वर्षांची असतानाच वारले. पुढे तिची आई, एमा पार्कर, पश्चिम डलासमधे तिच्या आई-बाबांबरोबर रहायला लागली. ती शिवणकाम काम करायची. बोनीचे आजोबा जर्मनीचे होते. लहानपणापासून बोनी पार्कर  ' स्टोरी ऑफ सुसाईड साल' आणि ' ट्रेल्स एंड' सारख्या कविता वाचून आपली लेखनाची हौस भागवत होती.

आपल्या उच्चशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षी बोनीची ओळख रॉन थोर्नटनशी झाली. त्या दोघांनी शिक्षण सोडलं आणि बोनीचे वय वर्ष सोळा पूर्ण व्हायच्या दिवस आधीच 25 सप्टेंबर 1926 ला लग्न केलं,पण सतत कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे ते टिकलं नाही.  1929 नंतर ते कधीच भेटले नाहीत पण त्यांचा घटस्फोटही झाला नाही. बोनीने शेवटच्या क्षणापर्यंत थोर्नटनची अंगठी घातली होती. ती मेली तेव्हाही थॉर्नटन तुरूंगातंच होता, तो म्हणाला- "आमचं आयुष्य असं संपतंय याचा मला आनंद आहे. पकडले जाण्यापेक्षा हे अधिक चांगलंय."  १९२९ मधे त्यांचं लग्न मोडल्यावर पार्कर तिच्या आईबरोबर राहिली आणि डलासमधे वेटरचं काम करू लागली.  ती तिच्या डायरीत तिचं एकटेपण, डलासमधलं तिचं आयुष्य, आणि बोलणाऱ्या फोटोंबद्दलच्या तिच्या प्रेमाचा उल्लेख करायची.

. . .