बोनी आणि क्लाईड
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

बोनी आणि क्लाईड : १९३४ - अंतिम पलायन

Boni and Clyde is a famous horror story

१९३३ - प्लेटे सिटी आणि देक्सफीस्ड पार्क   मृत्यू


१६ जानेवारी १९३४ ला बैरोने ईस्टहोम जेलमधून रोमंड बॅमिल्टन, हेनरी मेथ्विन आणि इतर काही लोकांना पळून जाण्यास मदत केली. यामुळे टेक्ससची खूप बदनामी झाली, असं वाटत होतं की बैरोने त्याचा बदला घेतला होता. जेलमधून पळताना जो पामरने जेल अधिकारी जो क्रोव्सोनला गोळी घातली. जो क्रोव्सोन मरणाशी झुंज देत असताना जेलचे अध्यक्ष ली सिम्मोंस ने त्यांना वचन दिलं की या कटात सहभागी असणाऱ्या प्रत्येक माणसाला शोधून नक्की मारलं जाईल. पण हेनरी मेथ्विन सोडून सगळ्यांना मारण्यात आलं कारण त्याने 'बैरो आणि पार्करला पोलिसांच्या हवाली करण्याचं' वचन दिलं होतं.  एप्रिल १९३४ ला बैरो आणि हेनरी मेथ्विनने ग्रेपवाईन, टेक्ससजवळ दोन पोलिस अधिकारी एच.डी.मर्फी आणि एडवर्ड ब्रेंट व्हीलर यांची गोळ्या घालून हत्या केली.  एका साक्षीदाराने असं सांगितलं की बैरो आणि पार्करने गोळ्या चालवल्यामुळे ही बातमी पसरली, पण हे ही शेवटी खोटं असल्याचं सिद्ध झालं. हेनरी  मेथ्विनने कबुल केलं की बैरो त्या अधिकाऱ्यांना मारू पाहतो आहे असा विचार करून त्याने पहिले गोळी चालवली. त्याने हे ही सांगितलं की पार्करला त्या अधिकाऱ्यांची मदत करायची होती. नंतर बैरोने मर्फीला गोळी घातली. बहुतेक पार्कर तेव्हा मागच्या सीटवर झोपली होती आणि तिचा या हल्ल्यात सहभाग नव्हता.

१९३४ च्या सुरीवातीला झालेले खून सविस्तर जनतेसमोर मांडले गेले ज्यामुळे जनतेची वागणूक बदलली. सगळ्या पेपरमधे एका साक्षीदाराची बातमी छापली गेली ज्याच्यामते त्याने पार्करला मर्फीचं डोकं जमिनीवर पडल्यावर हसताना पाहिलं होतं. काही दिवसांनी मर्फीच्या अंत्यसंस्कारात त्याची होणारी बायको लग्नाचे कपडे परीधान करून आली.  साक्षीदाराची साक्ष नंतर खोटी असल्याचं सिद्ध झालं तरी पार्करच्या विरूद्ध नकारात्मक अभियानाने जनतेची बैरो टोळी संपवण्याची मागणी बळावली.

या सार्वजनिक गोंधळामुळे पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं. गुन्हेगारांवर, विशेष करून बोनीवर, बक्षीस जाहिर केलं, कारण साक्षीदाराच्यामते मर्फीचा खून तिने केला होता.  पाच दिवसांनंतर जेव्हा बैरो आणि मेथ्विनने कॉमर्स, ओक्लाहोमाच्या एका हवालदार असणाऱ्या विधूर वडीलांना, विलीयम कैम्पबल ना, गोळी घातली तेव्हा जनतेचा आक्रोश अजून वाढला.  डलास जर्नलने आपल्या संपादकीय पानावर एक कार्टून छापलं ज्यात टेक्ससची इलेक्ट्रीक खुर्ची रिकामी होती आणि त्यावर 'बोनी आणि क्लाईडसाठी सुरक्षीत' असं लिहीलं होतं.

. . .