बोनी आणि क्लाईड
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

बोनी आणि क्लाईड : मृत्यू

Boni and Clyde is a famous horror story

१९३४ - अंतिम पलायन   अतिम संस्कार आणि दफनविधी

 बैरो आणि पार्करला २३ मे १९३४ ला घेरून बेंविल्ले परीश, लुसिआनाच्या एका ग्रामिण रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. ही जोडी दिवसा गाडीने बाहेर जात होते आणि त्यांच्यावर गोळी चालवणाऱ्यामध्ये चार टेक्सस अधिकारी (फ्रेंक हैंर, बी.एम.मन्नी गाल्ट, बॉब अल्कोर्ण आणि टेड हिंटन) आणि दोन लुसिआनाचे अधिकारी(हेन्देसर्न जॉर्डन आणि प्रेंटीस मोरेल ओअक्ले) होते. हमेर या गटाचं नेतृत्व करत होते जे १२ फेब्रुवारी १९३४ पासून बैरो टोळीवर नजर ठेवून होते. २१ मे १९३४ ला दलच्या टेक्ससचे ४ सदस्य श्रेवेपोर्टमधे असताना त्यांना बैरो आणि पार्कर मेथ्विनबरोबर त्यादिवशी बेंविल्ले पेरीशला जाणार असल्याचं समजलं. बैरोने वेगळे झाल्यावर मेथ्विनच्या घरी भेटायचं असं सांगितलं आणि खरंच ते वेगळे झाले. पोलिसांचं पूर्ण दल २१ मे च्या रात्रीपासून तिथे त्यांची वाट पहात होतं पण दुसऱ्या दिवसापर्यंत त्या जोडीची काहीच चिन्हं नव्हती. २३ मे ला सकाळी जेव्हा पोलिसदलाचा विश्वास कमी होऊ लागला तेव्हाच त्यांना बैरोने चोरलेली गाडी वेगात येताना दिसली. बैरो तिथे मेथ्विनच्या वडीलांशी बोलण्यासाठी थांबला ज्यांना पोलिसांनी मुद्दाम याच उद्देशाने तिथे उभं केलं होतं की ते बैरोला पोलिसदलाच्या जवळ घेऊन येईल. पोलिसांनी गोळ्या चालवायला सुरूवात केली आणि १३० राऊंड्स चालवले ज्यात बैरो आणि पार्करचा मृत्यू झाला. पोलिसांनी सगळ्याच्या सगळ्या गोळ्या चालवल्या ज्यातली कुठलीही गोळी बैरो आणि पार्करच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकत होती. क्षोधकर्त्यांच्या मते बैरो आणि पार्करवर कमीतकमी पन्नासवेळा गोळ्या चालल्या. नंतर अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी करून सांगितलं की त्यात शॉटगन, हॅन्डगनसारखी हत्यारं, भरपूर दारूगोळा आणि अनेक राज्यांच्या चोरलेल्या नंबरप्लेट्स होत्या. आपल्या मुलाची बॉ़डी ओळखल्यानंतर वडिल हेनरी बैरो एका खुर्चीत बसून खूप रडले.
. . .