भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : भूमिका

आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...

  रोहतांग पास, मनाली


जेव्हा कधी आपण भारत भ्रमण करण्याचा किंवा भारतात कुठेही सहलीला जाण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या मनात विचार येतात ते संस्कृती, इतिहास यांचे. भारतात कितीतरी अशा आश्चर्यकारक सुंदर जागा आहेत की त्या कोणात्याही पर्यटकाच्या मनाला भुरळ पडतील. भारतात समुद्र किनारे, किल्ले, जंगल, पर्वत यांच्या बरोबरच अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे जायला पर्यटक घाबरतात. तुम्ही एका नवीन साहसाला, एका नव्या आव्हानाला तयार आहात? सादर आहेत भारतात उपस्थित सर्वात धोकादायक ठिकाणांची नावे...

. . .