तमाम शुड केस
फिनिक्स Updated: 15 April 2021 07:30 IST

तमाम शुड केस : अधिकाऱ्यांची विधाने

१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केसचा तपास काही प्रमाणात चालू आहे. कोण होता तो? काय आहे रहस्य? कोणी केला होता खून? त्याने आत्महत्या केली होती का? या सगळ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

सोमार्टन मॅन  

तिथले डिटेक्टीव अधीक्षक देस ब्रे हे म्हणाले कि, “बरेच सिद्धांत आणि वाद व दावे आहेत. गेल्या काही वर्षात अनेक सिद्धांतांना पुढे दिशा मिळाली आहे. यातले खरे किती आणि खोटे किती याचा अंदाज लावणे जरा अवघडच आहे. याबद्दल कुणीही काहीही दावे करू शकत नाही.”

“या वर्षात बऱ्याच चर्चा झाल्या त्यात अनेकांना वाटले कि तो मनुष्य कुणी रशियातील हेर आहे तर  काहींना वाटलेकी हा काळाबाजार करणारा आहे, काहींचे असेही अंदाज होते कि, तो एक खलाशी आहे आपले जहाज तुटले असेल व त्याचा मृत्यू झाला असेल. त्यानंतर किनाऱ्यावर त्याचे शव येऊन पडले असावे.” “मागील वर्षात माझ्या गुन्हे अन्वेषण खात्याने किंव्हा पोलीस खात्याने बरेच प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने हि केस सोडवण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत. पण यामध्ये कुणालाही यश मिळाले नाही.”

ब्रे यांनी पुढे असा खुलासा केला कि, “सोमार्टन मॅनची ओळख शोधणे हि एक उत्सुकतेची किंव्हा रहस्त्याची बाब म्हणून त्याच्याकडे पाहणे किंव्हा ती केस सोडवणे महत्वाचे नव्हते तर, कुठेतरी आपण हे हि लक्षात ठेवायला हवे कि मृत व्यक्ती कुणाचातरी मुलगा, वडील, नवरा, आजोबा, काका कुणीही असू शकतो. म्हणून त्यांनी त्याचे नाव आणि ओळख शोधण्यासाठी इतका आटा-पिटा केला होता.”  ब्रे यांनी सांगितले कि, “अॅडिलेडमध्ये आम्हाला माहित असलेले असे काही लोकं आहेत कि त्यांचा संबंध या सोमार्टन मॅनशी आहे आणि निश्चित आम्ही त्यांना उत्तरास पात्र आहोत.”

“तज्ञ डी.एन.ए. प्रोफाइल तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने हे अवशेष फोरेंसिक सायन्स एस.ए. येथे नेले गेले आहेत. या माणसाचा डी.एन.ए. मिळविणे हे एक आव्हानच असेल आणि त्यातून काय मिळु शकते हे नमुने किती प्रमाणात घेतले जातील हे सगळे त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल.” असे ब्रे यांनी सांगितले. फॉरेन्सिक सायन्स एस.ए.च्या सहाय्यक संचालक अॅनी कोक्सन यांनी सांगितले की १९४०च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा या शवाचा शोध लागला तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान हे आत्ता उपलब्ध असलेल्या तंत्रांपेक्षा हलके होते.

"या चाचण्याची पद्धती अनेकदा अत्यंत जटिल असतात आणि त्यास वेळ लागतो." ती म्हणाली.

“तथापि, आम्ही या विस्मयकारक रहस्याचा उलगडा करण्याचा आमचा पर्यटन आहे. लवकरात लवकर हि केस सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक वेगवेगळया आणि शक्य त्या प्रत्येक पद्धती वापरत आहोत.”

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे मुख्य वकील जनरल विकी चॅपमन म्हणाले की, “फॉरेन्सिक सायन्स एस.ए. टीम आव्हानात्मक कार्ये हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. यांनीच हे प्रकरण  बाहेर काढण्यासाठी परवानगी दिली आहे.”

"सत्तर वर्षांहून अधिक वर्षांपासून,  हा माणूस कोण होता?? तो कसा मरण पावला?? याचा आमच्या विभागाची लोकं अंदाज लावत आहेत." चॅपमन म्हणाले.

“मला वाटतं कदाचित हे चिरस्थायी रहस्य आहे पण मला विश्वास आहे की, सरते शेवटी आपण काही उत्तरांवर प्रकाश टाकू शकू.”

हे प्रकरण ऑपरेशन पर्सव्हिअरचा एक भाग आहे. हे खाते दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये सर्व अज्ञात मनुष्यांची नावे शोधण्याचा  प्रयत्न करीत आहे.

ऑस्ट्रेलिअन पोलीस खाते किंव्हा गुन्हे अन्वेषण खात्याला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी पुरावा मिळाला असण्याचे अंदाज आहेत त्याशिवाय कुणीही सत्तर वर्षापूर्वी पुरलेल्या प्रेताचे उत्खनन करायची परवानगी मिळवत नाही.

. . .