तमाम शुड केस
फिनिक्स Updated: 15 April 2021 07:30 IST

तमाम शुड केस : द रुबायत ऑफ ओमार खय्याम

१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केसचा तपास काही प्रमाणात चालू आहे. कोण होता तो? काय आहे रहस्य? कोणी केला होता खून? त्याने आत्महत्या केली होती का? या सगळ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

चौकशी   पहिला सुगावा

ह्या केसचा खरा धक्का मात्र जुलै मध्ये आला. जेंव्हा मृत व्यक्तीच्या पायजम्याचे पुन्हा परीक्षण केले तेंव्हा त्याच्या पायजाम्यात एक गुप्त खिसा आढळून आला जो शिवून ठेवला होता. शिवाण उसवल्यानंतर आतून एक छोटासा कागदाचा तुकडा आला जो जणू काही कुठल्या पुस्तकापासून फाडून काढला असावा असे वाटत होते. पोलिसांनी ते कोणते पुस्तक असावे हे शोधून काढले. सदर पुस्तक १८८० साली प्रकाशित करण्यात आलेले आणि न्यूझीलंड मध्ये छापण्यात आलेले उमर खय्याम ह्याचे रुबयीयात हे असावे हे स्पष्ट झाले. जो तुकडा फाडण्यात आला होता ते शेवटच्या पानाचा शेवटचा तुकडा होता ज्यावर "तमाम शुड" अशी अक्षरे होती ज्याचा अर्थ फारसी मध्ये "द एंड" किंवा "समाप्त" असा होतो.

पुस्तकाची ओळख जरी समजली तरी पोलिसांना जे पुस्तक ज्याच्या पासून तो तुकडा फाडला होता ते सापडले नाही पण पोलिसांनी संपूर्ण देशांत त्या पुस्तकाचा शोध घेतला आणि शेवटी एका माणसाने पोलिस स्टेशन मध्ये येवून एक पुस्तक पोलिसांना दिले जे त्या व्यक्तीला आपल्या गाडी मध्ये सापडले होते. सदर व्यातीचे नाव पोलिसांनी सांगितले नाही पण त्याने आपली गाडी त्याच बीचवर ठेवली होती आणि कुणीतरी त्याच्या मागच्या सीटवर हे पुस्तक टाकले होते. नक्की कुठल्या दिवशी ते पुस्तक सापडले हे मात्र स्पष्ट झाले नाही, काही अहवाला प्रमाणे ते पुस्तक मृत व्यक्ती सापडल्यानंतर सापडले होते तर काही अहवाला नुसार ते २ आठवडे आधी त्या गाडीमध्ये सापडले होते.

अनेक शास्त्रज्ञांनी पुस्तक अभ्यासून तो तुकडा त्याच पुस्तकाचा होता हे सिद्ध केलेच त्या शिवाय त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दुसरा कागद ठेवून कुणीतरी काही तरी लिहिले होते हे स्पष्ट झाले आणि त्या अक्षरांची प्रतिकृती शेवटच्या पानावर अलगद उमटली होती.

    WRGOABABD

    MLIAOI

    WTBIMPANETP

    MLIABOAIAQC

    ITTMTSAMSTGAB

सदर अक्षरांचा अर्थ काय होतो हे कुणालाही कळले नाही कदाचित हि काही सांकेतिक लिपी असावी असाच निष्कर्ष त्यातून आला.

. . .