भवानी तलवारीचे रहस्य : युसुफ पोष
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी त्याचा काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन हा एकाच हेतू ह्या कथेमागे आहे.
रात्रीचा शेवटचा प्रहर होता. युसुफला नेहमी लवकर झोपणे पसंद होते. त्यातंच बिजापूर त्याला अजिबात पसंद नव्हते, पण शाहचा आदेश होता. ५ हजार स्वारां सोबत तत्काळ बिजापुरला यावे म्हणून शहाने खास शाही दूत पाठवला होता. ५ हजार स्वार म्हणजे होस्पेटची जवळ जवळ अर्धी सेना घेवून २०० मैल कूच करणे खर्चाचे काम होते. मराठ्यांच्या तोरणा किल्ल्यावरचा हल्ला सोडला तर आदिलशाहीला सैन्य गोळा करण्याचे प्रयोजन काय आहे हे त्याला समजले नव्हते. दूताने सुद्धा विशेष काही माहिती आणली नव्हती.
बिजापुरच्या वेशीवर युसुफ चे घोडदळ तळ ठोकून होते. शाह स्वतः तालावर येणार होते, शाही सेवकांनी आधीच येवून तंबू टाकला होता व शाही रक्षकांची वर्दळ चालू होती. युसुफ आपल्या तंबूत आपला सावत्र भावू अब्दुल सोबत बसला होता. जशी जशी रात्र उलटत होती तशी तशी युसूफची बैचेनी सुद्धा वाढत होती. अब्दुल त्या मानाने शांतपणे बसला होता. युसुफने आपल्या हाताचा चामड्याचा मोजा काढला आणि समोरील बैठकीवर ठेवला. अब्दुलने विशष मेहनतीने संपूर्ण आदिलशाहीचा नकाशा छानपणे मांडून ठेवला होता. मुघल सल्तनत आदिलशाहीच्या वर अफाट सागरा प्रमाणे पसरली होती. मध्येच मराठी बंडखोरीची जखम तोरणा किल्याच्या स्वरूपांत लाल रंगात मांडली होती. युसुफने तोरणा किल्याच्या स्थानावर ध्यान दिले, तोरणा नंतर मराठ्यासाठी सर्वांत जवळचा किल्ला होता रोहीडा. रोहिडा किंवा तोरणा दोन्ही किल्ले दुर्गम होते. ५०० लोक सुद्धां किल्ला आठवडा भर लढवू शकत असत. जिंकायचेच झाले तर पायदळ हा महत्वाचा घटक होता. दुर्गाजवळ जायची वाट त्या मानाने वेडी वाकडी होती, जिंकायचाच असेल ५०-५० सैनिकांच्या छोट्या छोट्या तुकड्या सर्व बाजूनी पाठवून किल्याची कोंडी करायची वर नंतर फास आवळायचा हि युद्धनीती शहाला सुद्धा ठावूक असेल हे युसुफ आणि अब्दुल दोघेही जाणून होते. त्यामुळे आपले घोडदळ शाहला पाहिजे तरी का प्रश्न समजून घ्यायचा पर्यंत दोघेही करत होते.
"संपूर्ण आदिलशाहीत युसुफ पोष हा नावाजलेला सरदार आणि सेनापती मानला जातो. आपले घोडदल शहाने मागवले असेल तर नक्कीच काहीतरी मोठी मोहीम असेल. मराठ्यांची बंडखोरी मोडून काढायची होती तर शाह च्या हुकुमाखाली आणखीन सरदार सुद्धां होते. दिलावर सुद्धां जावू शकला असता. आता पुन्हा लवकर घर जाणे शक्य नाही, आपण मनाची तयारी केलेली बरी" अब्दुलने शांतता भंग गेली.
"सैनिकाच्या मनाची तयारी नेहमीचीच असते अब्दुल, घरी परत आम्ही गेलो तर एक तर विजयी म्हणून नाहीतर मृत शरीर म्हणून. तू मात्र घरी नेहमी जिवंतच जाणार. पुस्तकी लोकांना मारायच्या भानगडीत कुणीच पडत नाही." युसुफने अब्दुलला डिवचले.
अब्दुल युसुफ़्चा मोठा सावत्र भावू अब्दुलची आई एक वेश्या होती पण अब्दुलच्या वडिलांना विशेष प्रिय. अब्दुल अंगाने दुर्बल होता, तलवार बाजी किंवा घोडेस्वारी सुद्धा त्याला जमत नसे पण पुस्तकी ज्ञान मात्र अफाट होते. कुराण हदीत पासून काफिरांचे वेद पर्यंत त्याला समाजत असत. युसुफला तो आधी निर्पयोगी वाटायचा पण वडिलांनी युसुफला सांगितले होते कि निव्वळ तलवार चालवता आली म्हणून राज्य चालवता येत नाही, त्यासाठी बुद्धीची धार सुद्धा तलावारीप्रमाणेच तेज ठेवावी लागते. अब्दुल त्या दृष्टीने फारच लायक होता. युसुफने सध्या मुहीमेचा संपूर्ण खर्च बघण्याची आणि संपूर्ण सैन्याच्या गरज बघण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती.
"शाह कि सवारी आ गयी है " शाह च्या शह सेवकाने तंबूच्या आंत येवून माहिती दिली. युसुफ ने मोजा उचलून पुन्हा हातात परिधान केला. अब्दुल कडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि युसुफ शाह च्या तंबूकडे निघाला. शाहच्या तंबूच्या चारी बाजूने शाही अश्व आणि अंगरक्षक उभे होते. शाही अंगरक्षक समशेर वापरत असत आणि हिरव्या रंगाचे पोलादी कवच परिधान करत असत. इतर सैनिकांच्या तुलनेत त्यांची शान वेगळीच वाटत होती. मुख्य अंगरक्षक सुलेमान युसुफ च्या ओळखीचा होता. तंबूबाहेर त्याने आलिंगन देवून युसुफचे स्वागत केले.
शाह काही वेळांत आपल्या लाजवाम्यासह तंबूत प्रवेश करते झाले. युसुफने मान झुकवून आपल्या स्वामिना कुनिर्सात केला. आदिलशाह ने स्मितहास्य देवून आपले दोन्ही हाथ युसूफच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः त्याचा हाथ धरून त्याला आपल्या बाजूंच्या आसनावर बसविले.
शहाच्या सोबत एक फकीर सुद्धा होता. त्याला पाहून युसूफच्या कपाळावर आठ्या पडल्या असत्या. ब्राह्मण, फकीर, दरवेश, संन्यासी ह्या सर्व प्रकारच्या धार्मिक लोकांची युसुफला थोडी चीड वाटत असे. सैनिक पराक्रम गाजवतात, व्यापारी व्यापार करून सरकारी तिजोरी भरतात पण हे लोक मात्र काहीही उपयोगी काम न करता निव्वळ भाकडकथा सांगून राजे महाराजांच्या मनाला वेड लावतात असे त्याचे मत ह्या लोकांच्या बद्दल होते. आपले शाह तरी असल्या फकिराच्या नादि नाही न लागले असा विचार युसुफ च्या मनात आला पण आपले चेहऱ्यावरचे भाव मात्र त्याने आवरले.
"युसुफ, हे आहेत चिस्ती साहेब. अल्लाह ची खास मेहरबानी आहे ह्यांच्यावर. ह्यांनी माहिती दिली म्हणूनच मी तुला ताबडतोब यायला सांगितले." आदिलशाह ने युसुफला सांगितले. आपले भय खरे ठरले हे पाहून युसुफ मनात थोडासा नाराज झाला.
"आपला जो काही हुकुम असेल तो मानण्यास बंदा हाजीर आहे" युसुफने नम्र पाणे आपली शाहला सांगितले.
"पश्चिमेकडे मराठ्यांची बंडखोरी नि उत्तरे कडे मुघल दोन्ही आदिलशाही संपवण्यासाठी कार्यरत आहेत. चिस्ती साहेबांनी मराठ्यांच्या बंद्खोरीबाबत मला आधीच सूचना दिली होती पण मीच त्याकडे दुर्लक्ष केले. ह्यावेळी मात्र मी तसे होवू देणार नाही " शाह बोलता बोलता उठले आणि तंबूच्या कोन्यात गेले. तेथे एक मेज ठेवले होते आणि त्यावर काही कागदपत्रें.
"आदिलशाहीला काही संकट आहे का? " युसुफने उठून विचारले.
"होय." ह्यवेळी चीस्तीसाहेब बोलले. " कदाचित आदिलशाहीचे शेवटचे दिवस जवळ आले आहेत. मला अल्लाहने स्वतः स्वप्नात दाखवले आहे. काळे काळे ढग आकाशांत जमा झाले आहेत आणि एक रक्ताने माखलेला वाघ विजापुरांत पळत सुटलाय. "
"आणि ह्याचा अर्थ आमच्या सारख्या सामान्य माणसांनी ५०० वर्षें जुन्या आदिलशहिचे शेवटचे दिवस असा घ्यावा काय?" युसुफने उपहासात्मक आवाजांत फकिराला फटकारले.
फकिराच्या चेहऱ्यावर थोडा संताप आला व त्याने आदिलशाह कडे बघितले. कदाचित शाह युसुफला काही सांगतिले अशी चाची अपेक्षा होती पण शाह पूर्णपणे शांत होते. शेवटी चिस्ती फाकीरणे स्वतःच आपला बचाव मांडला. "सामान्य लोकां कडे अल्लाह चे संदेश समजण्याची कुवत नसते बेटा. त्याला माझ्यासारखाच माणूस पाहिजे असतो."
"ठीक आहे" युसुफ बोलला. त्याला फकिराच्या अहंकाराचा थोडा जास्तच राग आला. "केवळ आकाशांत दाटलेल्या ढगांचे स्वप्न कुणा फकिराने पाहिले म्हणून शाह ५००० घोडेस्वारांचे सैन्य नक्कीच नाही मागवणार. एवढ्या प्रमाणात सैन्याची जमवा जमाव सुरु झाली आहे हे मराठ्यांना आणि मुघलांना ठावूक झाले असेलच. एक स्वप्नासाठी आम्ही युद्ध करू ? " युसुफने प्रश्नात्मक दृष्टीने आदिल शाह कडे पहिले.
आदिलशाह ने एक उसासा सोडला आणि आपली डावी तर्जनी वर असलेल्या अंगठी ला उजव्या हाताने हळुवार कुरुवाळले. युसुफला शाहच्या ह्या सवयीबद्दल ठावूक होते. जेंव्हा जेंव्हा शाह काहि तरी खोल विचार करत तेंव्हा तेंव्हा आपल्या अंगठीला कुरुवालायाची त्यांची सवय होती.
"प्रश्न फक्त स्वप्नचा नाही युसुफ. प्रश्न आहे आदिलशाहीच्या भविष्याचा आणि पुढील युद्धाचा. मुघल सलतनत बरोबर आमचा मैत्रीचा करार होता पण नवीन बादशाह तो कायम ठेवण्यास उत्सुक नाही अशी माहिती आहे. आमच्या मुलीची शादी बादशाहच्या छोट्या भावाबरोबर करावी असा प्रस्ताव आम्ही पाठवला होता पण त्यावर काहीही उत्तर आले नाही. शाहिस्तेखान आपल्या ३० हजार सैन्यासह दक्षिणेकडे येतोय अशी बातमी हेरांनी आणली आहे.
"येणारा काळ कठीण आहे आणि तुझ्या सारख्या विश्वासू माणसाची आदिलशाहीला गरज आहे युसुफ" शहा च्या बोलण्यात एक निराशेचा सूर होता. आपल्या शहाला अश्या पद्धतीने हर मानताना त्याने आधी बघितले नव्हते. हे फकीर लोक काय जादूटोणा जाणतात देव जाणे असा विचार त्याच्या मनात आला.
"लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून माफ करा हुजूर, पण आदिलशाही मुघल सल्तनत पेक्षा छोटी असली तरी प्रचंड युद्ध पेक्षां जिंकणे अवघड आहे. उलट पूर्ण दक्खन भाग मुघलांना नवीन आहे. इथल्या जंगल आणि दर्याखोर्यातून वाट काढणे सुद्धा त्यांना अवघड जाईल. आणि मराठ्यांची बंडखोरी मोडून काढणे विशेष सोपे आहे, दिलावर खान सहज तोरणा परत आणू शकेल" युसुफ ने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
आदिलशहाने चिस्ती फकिराकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. फकिराच्या डोळ्यांत एक चमक आली. "एक विशेष घटना घडलीय युसुफ, दिलावर खान सुमारे १०० सैनिक आणि आमच्या काही विशेष व्यापारी लोकां सह फिरंग्याना भेटण्यासाठी गोमंतक प्रांतांत गेला होता. " शहाची चर्या अचानक फारच गंभीर बनली. "आणि ?" युसुफने विचारले.
"दिलावर आणि त्याचा ताफा अचानक गायब झाला. कुणाचाच काहीही पत्ता नाही. फिरंगी पोर्तुगीजांना आम्ही धमकावून विचारले, वाटेवरील सर्व किल्ले, गावे सगळीकडे आम्ही स्वार पाठविले पण कुणीही सापडले नाही. रत्नागिरी भागांत जमा मशिदीत त्यांनी शेवटचा नमाज अदा केला होता. त्यानंर काहीच माहिती नाही" शाह च्या आवाजांत थोडीशी मृदुता आली होती.
"युसुफ पोष, मी आदिलशाह तुला आदिलशाहीचा सेनापती घोषित करत आहे. आज पासून संपूर्ण आदिलशाहीच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे." शहाने आपल्या मेजावरील एक कागद पत्र उचलून युसुफ कडे दिले.
युसुफ् साठी हा फार मोठा धक्का होता. दिलावर खान हा नावाजलेला योद्धा तसेच अतिशय चलाख आणि अनुभवी सेनापती होता. युसुफ आपल्या गुढग्यावर बसला. "हुजूर नि माझ्यावर फार मोठा विश्वास दाखविला आहे. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी जीवाची बाजी लावेन" युसुफ बोलला.
"हीच अपेक्षा आहे" शहाने त्याला उठविले आणि प्रेमपूर्वक आलिंगन दिले.
…..
युसुफचा संपूर्ण दिवस विजापूर च्या महालांत गेला. शाहच्या दरबारांतील प्रत्येक व्यक्तीने युसुफला भेट दिली. प्रत्येकाच्या बोलण्यातून चिस्ती फकिराचा शाह आणि एकूण दरबारावर फारच प्रभाव आहे हे स्पष्ट झाले. आदिलशाहीला धोका आहे हे अजून युसूफच्या मनाला पटत नव्हते पण उत्तरेकडे सीमा सुरक्षित करावी आणि दिलावारचा शोध हि दोन विशेष कामे आता त्याच्या पुढे होती. मराठ्यांचा बिमोड करणे आवश्यक होते. तोरण्या नंतर रोहिडा किंवा राजगड त्यांच्या नजरेत येणे स्वाभाविक होते.
युसुफने सरदार बख्तियार खान आणि अहमद खान ह्यांना बोलावणे पाठविले. बख्तियारला २००० स्वारां सह राजगड तर अहमदला ३००० स्वारां सह सिंहगडला तत्काळ रवाना होण्याचा आदेश दिला. दोन्ही किल्याचे किल्लेदार मुसलमान नसून हिंदू होते, कदाचित ह्यांनी बंडात भाग घेतला तर दोन महत्वाचे किल्ले हातातून जातील ही भीती युसुफला होती. राजगड चे किल्लेदार खंडोजी रंजनेकर होते तर सिंहगडचे किल्लेदार होते चंद्रोबा कासकर. युसुफने एक आदिलशहाच्या नवे एक विशेष आदेश जारी केला होता. दोघी किल्लेदारानं आदेश दिला होता कि त्यांनी आपल्या तोरल्या मुलांना बिजापूर मध्ये दरबारांत पाठवावे. जेथे त्यांना राजकारणातील धडे देण्यात येतील. वडिलांनी काही बंडखोरी केली तर मुलानाचा शिरच्छेद करण्यात येईल हे आदेशात लिहिले नव्हते तरी ते समजण्या इतके शहाणपण दोन्ही किल्लेदारा कडे नक्कीच होते.
आदिलशहाने चिस्ती सारख्या फाकीरावर विश्वास ठेवावा हे युसुफला मनात खटकत होते. काही तरी सकारात्मक घडल्या शिवाय चीस्तीला दरबारातून हाकलता येणे मुश्किल आहे हे स्पष्ट होते. मराठ्यांची बंडखोरी पूर्णपणे मोडून काडणे आणि आदिलशाहीला ललकारणार्याचे काय हाल होतात हे स्पष्ट केले तर आत्मविश्वास निर्माण करणे शक्य होते. शाहिस्तेखान जर खरोखरच दक्षिणेला चालून येत असेल तर ३०००० सैन्याला तोंड देवू शकेल असे लष्कर उभे करणे हे दुसरे आव्हान युसुफ पुढे होते.
बख्तियारला वापस येताना तोरण्याच्या आजूबाजूच्या गावांचा विध्वंस करण्याचा आदेश युसुफने दिला. जे कुणी बंडखोर आणि खोट्या मराठी महाराजाला कर देण्याची हिम्मत करतील त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत आग लावण्यात येईल असे हुकुम गावोगावी पाठवण्यासाठी बख्तियारला युसुफने बजावले. घोडदळाला टक्कर देण्या इतकी ताकद अजून पर्यंत मराठ्यांत नव्हती हे युसुफ जाणून होता. तोरणा सोडून जर ते बाहेर आले तर त्यांचा धुव्वा उडविणे फारच सोपे होते.
त्या शिवाई तोरण्याला वेध घालण्यासाठी ५००० पायदळ तयार करण्यासाठी युसुफने अब्दुल ला पाठविले. दिलावार खान अचानक गायब झाल्यामुळे सैनिकांत अनेक प्रकारचे तर्क वितर्क सुरु झाले होते. हे वेळीच बंद करणे आवश्यक होते. ४०० मैलांची पायपीट करून तोरण्याकडे कूच करणे हा एक चांगला तोडगा होता.
त्याशिवाय संपूर्ण रायतेतून येणारे हेरगिरीचे संदेश, कर गोळा करणार्या मनसबदाराकडून रक्षण करण्याच्या विनंत्या अशी अनेक कामे युसुफने दिवसभर हात वेगलिए केली. संध्याकाळ झाली, युसुफने नमाज अदा केला, सेवकाने आणलेले अन्न तो ग्रहण करणार इतक्यांत बाहेरील रक्षकाने त्याची तंद्री भंग केली. "क्षमा असावी हुजूर. पण फकीर चिस्ती साहेब आपणाला भेटण्यास आले आहेत." सात फुट लांब असलेल्या त्या भरदार रक्षकाच्या आवाजांत फकीर बद्दलची भीती स्पष्ट जाणवत होती.
युसुफला अजिबात त्या फकिराला भेटायचे मनात नव्हते पण त्याचा नाईलाज होता. फकीर आंत आला. युसुफ ने त्याला आदर पूर्वक आसन ग्रहण करण्याचा इशारा केला पण फकिराने त्याकडे दुर्लक्ष केले.

"तू इमान वाला माणूस वाटतोस, मीच शहाला तुला सेनापती बनवायला सांगितले होते. येणाऱ्या युद्धांत तुझ्याशिवाय आणखी कोणीच जिंकू शकत नाही. मला स्वतः अल्लाहने स्वप्नांत दाखवले आहे. होस्पेटचा युसुफ पोष अंगार्याच्या घोड्यावर बसून मराठी सैनिकांचा धुव्वा उडविताना बघितले आहे मी." फकीर ने नेहमीच्या नाटकीय स्वरूपांत युसुफला सांगितले.
फाकीर लोक काहीतरी खायला घालून जादू करतात हे युसुफने ऐकले होते पण हा फकीर पट्टीचा राजकारणी वाटत होता. थोडक्यांत युसुफचे पद हे आपली देन आहे असे भासविण्याचा खटाटोप त्याचा आहे हे युसुफ बघू शकत होता.
"मराठ्यांचा धुव्वा उडविणे ह्या साठी दैवी मदतीची आम्हाला गरज नाही फकीर साहेब. युद्धे रक्ताची किमंत देवून जिंकली जातात आणि आम्ही ती जिंकूच. त्यासाठी तुमच्या स्वप्नाची मला गरज नाही." युसुफने आपले मन मोकळे केले.
"त्या पोराला कमी नकोस लेखूस. त्याच्या सारखे रक्त लाखांत एखाद्याचेच असते. शेकडो वर्षांत तसा एकाच पुरुष जन्माला येतो. त्याला मारणे सोपे नाही. तुझा भलेही नसेल विश्वास स्वप्नावर पण एक सेनापती म्हणून त्याला कमी नकोस लेखु." फाकीर युसूफच्या जवळ आला.
"फकीर साहेब, मी मागील २० वर्षांत ४४ युद्धे जिंकली आहेत. फातेहखान च्या २० हजार सैन्याला मी युद्धभूमीवर जहन्नुम मध्ये पाठविले, मल्हारगडाला ३ दिवसांत पूर्णपणे काबीज केले. दिलावरखानाने उत्तरेत हर मानली तेंव्हा मी मुघल सैन्याला मागे पाठविले. आज पर्यंत ३० हजार पेक्षां जास्त लोकांनी माझ्या युद्धांत जीव दिलाय. त्या मराठी पोराने असला काय पराक्रम गाजवलाय कि मी त्याला भिक घालावी ? चिस्ती साहेब ?" युसुफ ने शांत स्वरांत पण जरबेत चिस्ती फकिराला विचारले.
फकिराने बराच वेळ युसूफच्या डोळ्यांत पहिले. युसुफने पहिल्यांदाच फकिराच्या पेहेरावाकडे ध्यान दिले. डोळ्यांत सुरमा, डोक्यावर काळी टोपी आणि कला झगा असा त्याचा वेश होता. गळ्यांत काहीतरी मण्याची मला होती आणि कमरेला एक चामड्याची पिशवी.
फकीर ने आपली चामड्याच्या पीशवित हात टाकला आणि एक कावळ्याचे पीस बाहेर काढले. काहीतरी बडबडत तो फकीर आपली तंद्री लावू लागला. युसुफ चे मन विचलित झाले आणि त्याने आपल्या कमरेच्या कट्यारी वर हाथ ठेवला. पण फकीराने तोंड फिरविले आणि तो दूरच्या कोन्यात गेला. कोन्यात तांब्याची एक समई पेटत होती. त्याने ते कावळ्याचे पीस सामायीचाय ज्योतीवर पेटविले. निळसर प्रकाश देत त्या पिसाने पेट घेतला. निळसर प्रकाश बघत बघत लाल, पिवळा आणि हिरव्या रंगत बदलला. पिसातून एक पंधरा धूर हवेंत पसरला.
युसुफ लक्षपूर्वक पाहत होता. नक्की काय करावे हे त्याला समाजात नव्हते. जादूतोंड्यावर त्याचा विश्वास नव्हता. पण धुराचा रंग हळू हळू जास्तच पांढरा व्हायला लागला. क्षणभर युसूफची संपूर्ण खोली त्याने भरून गेली आणि दुसर्याच क्षणी धूर गायब झाला. समोर त्याची खोली गायब झाली होती. युसुफ ने हलण्याचा प्रयत्न केला पण त्याचे अंग जखडून गेले होते. एक फुत्कार त्याला ऐकू आला आणि पुढे एक महा भयानक आणि प्रचंड साप हिरवा फणा पसरवून उभा होता. त्याचे डोळे पिवळ्या रंगाचे होते. त्या भुजंगच्या आजू बाजूला आदिलसहीचा ध्वज तुकडे तुकडे होवून पडला होता. युसुफला ये दृश्य पाहून घाम फुटला पण तो सर्प काही हालचाल करेल इतक्यांत एका वाघाने त्याच्यावर झेप घेतली, वाघ आणि सर्प ह्यांची लढाई सुरु झाली. नक्की कोण जिंकेल हे सांगणे शक्य नव्हते पण इतक्यांत एक काळे धुके हवेत भरले आणि दुसर्याच क्षणी युसुफ आपल्या खोलीत होता. मघाची समयी विझलेली होती आणि फकीर गायब होता.
युसुफने विचलित होवून रक्षकाला हाक दिली. "चिस्ती साहेब कधी बाहेर गेले?" युसुफ ने त्याला विचारले.
रक्षकाने गोंधळलेल्या नजरेने युसुफ कडे बघितले आणि उत्तर दिले " एक घंटा तरी झाला असेल हुजुर".
युसुफने त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि डोळे बंद करून आपल्या आसनावरच झोपण्याचा पर्यंत केला. लवकर झोपण्याची त्याची सवय बिजापूर मध्ये कायम ठेवणे तूर्तास तरी शक्य वाटत नव्हते.
पुढील भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होयिल. इमेल द्वारे पुढील भाग प्राप्त करण्यासाठी आमचे "BookStruck" हे Android App टाका. App काढून टाकले तर तुम्हाला इमेल मिळणार नाही.